गुरुपौर्णिमा
काही दिवसांपूर्वी एका कामानिमित्त बाहेरगावी गेलो होतो. सकाळी चहा घेण्यासाठी मी आणि माझे एक वरिष्ठ अधिकारी हॉटेल मध्ये भेटलो. मोठ्या हॉटेलच्या काही खास गमती असतात त्यापैकी एक चहा. गरम पाणी , वेगवेळ्या प्रकारचे आणि ब्रॅण्ड्सचे चहा आणि साखरेचे पुडके घेऊन वेटर आला. चहा बनवण्याची जवाबदारी आमच्यावर होती.
गप्पा मारता मारता चहा तयार देखील झाला. चहाचा पहिला घोट घेतला आणि मला याच समाधान वाटलं कि चहा छान झाला होता. पण माझ्या सोबतच्या त्या अधिकाऱ्याचे तोंड बघण्यासारखे होते. त्याने स्वतः चहा बनवल्यामुळे त्याला जास्त मोकळेपणाने चहाच्या चवीवर टीका करता येत नव्हती. पण दुसरा घोट घेऊन त्यांना आपल्या पातकाची कबुली दिली. आणि समोर मी मोठ्या चवीने चहा पीत असल्यामुळे तो आता थोडा वैतागला होता.
"तुम्हारा चाय अच्छा बना क्या ?"
" एकद्दम बढिया" ( मी नागपुरी खाक्यात सांगितले)
" अजिब बात है?"
" शायद आपने पाणी मे शक्कर, दूध मिलाया और फिर टी bag !! सही ??"
" हा बराबर !"
मी किंचित हसलो, आणि पहिले कपात फक्त गरम पाणी घेतले, पहिले टि बॅग त्यात बुडवून चहाचा गडद रंग पाण्याला येई पर्यंत त्या टि बॅगला पाण्यात मनसोक्त विहार करू दिला. मग बाकिचे घटक त्यात टाकले आणि चहा तयार झाला.
चहा घेतल्या नंतर कितीतरी वेळ त्या गृहस्थाने माझे कौतुक चालूच ठेवले. मला मात्र आठवण आली ती देसाई सरांची.
भारत विद्यालय अकोला येथे कित्येक वर्षे त्यांनी त्यांनी Chemistry , Maths असले विषय शिकवले. त्यावेळी आह्माला नेहमी प्रश्न पडायचा की यातलं पुढल्या आयुष्यात काय कामास पडेल? पण असले प्रश्न मनात किंवा मित्रांच्या मेळाव्यात बोलण्या पुरतेच असायचे. घरी शाळेत किंवा नातेवाइकांसमोर हे असले प्रश्न विचारण्याचे धाडस कुणी करायचे नाही. पण देसाई सरांची शिकवण्याची पद्धत खूप निराळी होती म्हणून त्यांच्या विषयांच्या बाबतीत असले प्रश्न मनात देखील यायचे नाहीत.
पण आत्ता त्यांची आणि त्यांनी शिकवलेल्या गोष्टींची आठवण कारण वेगळं होत. त्यांनी Chemistryच्या क्लास मध्ये एक शिकवलेला एक funda आठवला - Solute , Solvent , Solution & Solubility
जे विरघळते ते Solute
ज्यात विरघळते ते Solvent
आणि जे यातून तयार होते ते solution.
आणि या सोलुशन मध्ये किती solute तुम्ही टाकू शकता याची क्षमता म्हणजे solubilioty .
अजूनही लक्ख आठवते फक्त मलाच नाही तर माझ्या सोबत शाळेत शिकलेल्या कित्येक विद्यार्थ्यांना !! याच श्रेय फक्त देसाई सरांना !!
मी फक्त हे लक्षात ठेवलं नव्हे ते त्यांनी इतक्या सहजपणे शिकवले कि विसरणे शक्य नव्हतं. एखादी गोष्ट समजली आणि आचरणात/ वापरात आणली कि लक्षात राहते. मी चहा बनवतांना हे नेहमी पाळतो की कडक चहा हवा असेल तर फक्त पाणी घ्यायचे गरम करायचे आणि मग त्यात चहा टाकून त्याचा रंग पाण्यात उताराला कि मग बाकीचे पदार्थ त्याला टाकायचे.
एक अजून funda - solvent जर गरम केलं तर त्यात जास्त Solute टाकू शकता . साखरेचा पाक करतो तेव्हा हाच उपाय वापरल्या जातो.
कुठल्या शिकलेल्या विषयाचा प्रत्येय किंवा उपयोग कसा होईल सांगता येत नाही. डॊळे उघडे आणि डोक सतर्क ठेवले तर खूप काही शिकायला मिळेल. या असल्या सिद्धांतांचा उपयोग नेहमीच्या आयुष्यात ही कमी येतो. आता हेच पहा ना. पाणी (Solvent) गरम केलं तर त्यात चहा आणि बाकीचे पदार्थ जास्त विरघळतात. आयुष्यातल्या चढ उतारांमधून खडतर जीवन काढून परिस्थितीने होरपलेली माणसे आपल्यात सगळ्यांना सामावून घेतात. केमिस्ट्रीचा नियम आयुष्याच्या एकाद्या वळणावर वेगळ्या स्वरूपात भेटतो. फक्त शिकवायला देसाई सरच हवेत. !!
गुरु पौर्णिमे निमित्य त्यांना आणि अश्याच काही खास लोकांना शतशः प्रणाम !!
अमित जहागीरदार
२६ जुलै २०१८
पुणे
(काही भाग १६ जूनला पुणे- अकोला या प्रवासात लिहिला पण आज पूर्ण झाला )