मंगळवार, २६ जुलै, २०११

पहिला ब्लोग !!   सगळ्या पहिल्या गोष्टी खूप चमत्कारी असतात आणि आठवतात सुद्धा ! पहिला पाउस, पहिला शाळेचा दिवस ( तो आईला जास्त लक्षात राहतो) , पहिली परीक्षा , पहिला हातातला हात !! आणि बरच काही.

पहिल्या गोष्टींची जादू बराच काळ राहते. आठवल्यावर तसेच शहारे येतात.
माझा पहिला ब्लोग Special असावा असं मला वाटत पण त्यापेक्षा तो माझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी स्पष्ट करणारा असावा. तसे लिहिण्याची सवय आता तुटली पण एक विश्वास आहे कि मनातल लिहील कि मनाला नक्कीच भिडत.
त्यामुळे इतक्या दिवसांनी लेखणी ( आता keyboard म्हणायला हव) हातात घेतली तर थोडी भीती वाटतेय.

बघू या एक प्रयत्न नक्कीच करायला हवा. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात छान काहीतरी डोळ्यांना वाचायला मिळण ही गरज झाली आहे, आणि जर ते मनाला भिडून डोळे उघडणार असेल तर मग सगळ्यांना आवडत सुद्धा !
असे काही विचार मनासाठी वंगण ठरतात आणि रुटीन मध्ये थोड प्रोटीन येत !!
दिवसातला एक मिनिट स्वतासाठी द्यावा अस म्हणायचं पण खरा प्रश्न हा असतो की स्वत: साठी काय करायचं?  हे पण कधी कधी कळत नाही आणि मग मनात गोंधळ सुरु होतो !
आपल्याला नक्की काय हवंय हे कळणच खूप कठीण असत. मी कोण आहे?  हा   प्रश्न विचारण किंवा मनात येण  फार गंभीर होईल पण मला काय हवंय हे माहित असायला हव ना ! म्हणजे आयुष्याच्या शर्यतीत पाळायला मज्जा येईल.

पहिल्यांदा इतक लिहील तेच पुरे. आता बघू या कसं वाटत वाचल्यावर !

Good Day !!


अमित जहागीरदार ,
पुणे ,
२५ जुलै २०११