लहानपणी जरा समजायला लागल्यापासुन आणि डोक्यावरील केस कापणासारखे झाल्यापासून मला सलून या ठिकाणाचं खूप अप्रूप आहे. माझ्या स्वभावासारख्याच सरळ वळणांच्या केसांमुळे मला कुठलेही केशकर्तनालय चालायचे.
पण तिथे गेल्यावरच माझ आकर्षण थंड पाण्याचा फवारा नसुन भला मोठा आरसा असतो. एक दोनदा मानेचे अवघड कोन करुन झालेत की बाकीचा पूर्ण वेळ आरश्यात बघायला मिळत.
पुरुषांच्या नशिबी हे भाग्य फार कमी वेळा येतं.
पण मला ते १५-२० मिनीटं खूप मोलाचे वाटतात. कुणीही टोकणार नाही, कुणी आरश्यासमोर बसलाय म्हणून चिडवणार नाही. हक्काचे क्षण ज्यावर फक्त आपलाच अधिकार आहे.
मला तिथे स्वतः कडे बघून मनातले भाव वाचायला आवडत. नव्या आयुष्यातल्या बेतांवर चर्चा करायला आवडत. आपण पुढल्या आयुष्यात कुठे असु काय करु याचे मनोरथ बांधायला आवडतात.
कधी कधी पडीकडला माणूस अनोळखी पण वाटतो. हा सगळा अगाध विचार करायला ती १५-२० मिनीट पुरी असतात. कधी एखादा प्रगल्भ व्यक्ती अथवा बालिश बालक पण दिसतो.
स्वतःकडे खुप निरखून , ओळखीच्या वा अनोळखी नजरेन बघण्याची ती संधी आसते. स्मार्ट तर दिसणारच थोडे परिचीत पण वाटाल स्वतः लाच!!!!
-अमित जहागीरदार
२० मे २०१५
मुंबई
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा