कणखर मना
अगदी पक्क झालंय आता. माझा अंदाज इतका चुकायचा नाही. रुचिताच ती ! आमच्या शाळेत होती. एकदम हुशार, प्रत्येक कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये भाग घेणारी अशी चुणचुणीत मुलगी. इतक्या वर्षानंतर ती मला भेटली होती पण ती इथे कशी याचा विचार आला कारण घरावर वेगळ्याच नावाची पाटी होती.

मी ज्यांच्याकडे मागल्या आठवड्यातच राहायला आलो होतो, त्या काकूंकडे चौकशी केली आणि कळले कि रुचिता लग्न करून समोरच्या परांजपे कुटुंबात काही महिन्यांपूर्वी दाखल झाली होती. सकाळच्या धामधुमीत जाण्यापेक्षा संध्याकाळी भेटावे असा विचार करून मी बाहेर पडलो. पण दिवसभर मला तिच्याच गोष्टी आठवत होत्या. तिचा अभ्यासातल्या प्रगतीचा आलेख, भाषणातला आवेग आणि वाद-विवाद स्पर्धान्माधला आवेश सगळाच. शाळेत मस्त्या करतांना पकडल्यावर कित्याकदा तिच्या प्रगतीचे दाखले देवून आमचा सत्कार व्हायचा- घरी सुद्धा !!
कामाच्या व्यापात संध्याकाळ झाली. घरी येवून कधी तिला भेटतो असे झाले होते. शाळेच्या मित्र मैत्रिणींना भेटायची मजा काही और असते. आपल वय काहीही असो पण शाळेतले विषय निघाले कि अगदी लहान झाल्यासारखं वाटत.
रुचिताच्या घरी गेल्यावर तिच्या सासऱ्यांनी दार उघडल चौकशी केली आणि रुचिताचा वर्गमित्र म्हणून बाकीच्यांशी ओळख करून दिली. माझा अंदाज चुकला होता , ती आणि तिचा नवरा बाहेर गेले होते. १०-१५ मिनिटात येतील असा कयास करून माझ्यासाठी चहा करण्यात आला. तिच्या सासरच्या मंडळींनी तीच खूप कौतुक केल. शाळेतल्या तिच्या पराक्रमाचे मी पण पाढे वाचलेत. अस बघायला मिळत नाही कि मुलीच्या पात्रतेची दाखल तिच्या सासरचे पण घेतात !!
माझा हा विचार कोता आहे हे मी ठरवण्याच्या आताच तो दोघे आलीत. रुचिता मला बघून गोंधळून गेली कारण तिला लक्षात राहावे असले marks मला कधी पडले नव्हते. मग मी तिला ओळख दिली आणि ती एकदम फुलली. शाळेच्या गप्पा झाल्यात, शिक्षकांची विचारपूस, घरच्यांचे हालहवाल सगळे झालेत. तिचा नवरा अनिकेत जास्त बोलत नव्हता, कदाचित थकला असेल !! पण आमच्या गप्पा चालूच होत्या. अनिकेतच्या आईने आग्रह केला तर मला जेवणाचे निमंत्रण नाकारता आले नाही. जितकी हुशार अभ्यासात तितकीच ती घर manage करण्यात तरबेज होती हे मला कळायला जास्त वेळ नाही लागला. एकंदरीत सगळा व्याप तिने सांभाळला होता. नोकरी करून हे सगळ ती सांभाळायची याच कौतुक माझ्या पेक्षा तिच्या घरच्यांना होत हीच मोठ्ठी गोष्ट !!
अनिकेत मात्र शांत होता मला त्याचा स्वभाव काळात नव्हता. बायकोचा मित्र म्हणून मला चाचपून बघतोय का असा संशय येत नव्हता. पण मी त्याला जास्त seriously घ्यायचं नाही अस ठरवलं. तसही मैत्रिणीच्या नवऱ्याच व्यक्तिमत्व खूप जास्त छाप पाडू शकत नसत !!
जेवण झाल, निरोप झालेत, रुचीताच्या सासू आणि सासऱ्याने पुन्हा येण्याच आमंत्रण दिलं. फाटका जवळच्या गप्पा पण झाल्यात, रुचिता म्हणाली कि तुला भेटून शाळेतले दिवस आठवले आणि मी अगदी लहान झाले. मी तिला पुन्हा चिडवले कि ते आठवून आम्हाला वाटत कि आमचे काय हाल होत होते तुझ्या प्रगतीपुस्ताकामुळे !! एकदम प्रफुल्लीत झालेला तिचा चेहरा पडला पण मला कळायच्या आत तिने विषय बदलला.
मग येण वाढल, गप्पा वाढल्या, रुचिता कळली, तिचे प्रोब्लेम्स कळलेत. अनिकेत हा एक परावलंबी माणूस आहे हे कळल. फक्त ऑफिस मध्ये जावून पगार आणतो कारण शिकलाय ! बाकी व्यवहार नाही कि शिष्टाचार नाही काही काही त्याला जमत नाही. आधी आईच्या म्हणण्यानुसार सगळ करायचा आता बायकोच्या फक्त त्याच्या घरच्यांना तो बायकोच ऐकतो यावर आक्षेप नाही कारण त्याचा निभाव लागतोय हे समाधान !!
मी तिला विचारले," तू सहन कस करतेस ? सगळी काम तुझ्यावर पडतात."
ती म्हणाली, " काय करणार? त्याच्याशी बोलणार तरी काय ? त्याला विचार करायची सवयच नाहीय. त्याने पण कधी करून घेतली नाही . निभावलं ते निभल बाकीच माझ्या नशिबी !!"
"काही दिवसांपूर्वी माझ एक operation झाल. तपशील देवू शकत नाही सगळे पण एकच गोष्ट सांगते मला आधार देण्या ऐवजी हा स्वत: रडत बसला होता."
मी त्याला बोलले देखील कि -
"लग्न म्हणजे एखाद खेळणं नाहीय. आधी तीन चाकी मग दोन चाकी cycle घेण्यासारखं अगदी वयाला साजेस !!फक्त वडिलांची ऎपत आहे म्हणून तुला खूप गोंडस खेळण मिळेल अस नाहीय आणि मिळालं तरी तुला त्याचं जतन करायची जवाबदारी झटकता येणार नाही . . जवाबदारी . . बाप रे काय कठीण आहे तुझ्यासाठी !!!
एका समजूतदार व्यक्ती सोबत राहण्याचा हक्क आहे मला ! गळ्यात हार घातले ते कुठल्याची परिस्थितीत हार न मानण्यासाठी !! अस भेकडासारख रडण्या साठी नाही . .
हे सगळे बोलले रे मी पण …. पण त्यामुळे फक्त त्याची रडण्याची गती वाढली, maturity नाही !!"
" काय कराव तेच कळतच नाही ? स्व:ताच्या पायावर उभी राहिलेली मी असला अधू नवरा घेवून जगावं लागणार या विचाराने कोमुजून जाते. आणि शरीराने अधू असता तर खपून घेतलं असत रे पण मनाने कमकुवत असलेल्याला किती आणि काय धीर देवू. मी खचले तर आमच घरच बुडून जाईन."
मला तिला समजावणे कठीण झाले होते. काहीच सुचत नव्हते, काही बोलायला जमत नव्हत ! काय सांगू तिला ? काही हि न बोलता निघून आलो.
थोड्या वेळात आईचा फोन आला कि कधी office मधून आलास ?जेवलास का ? थकलास का ?? तब्येतीला जप हा !! मी तिला दिनक्रम सांगितला आणि म्हणालो कि इतकी काळजी नको करून. तू मला स्वावलंबी बनवलं आहेस.
"हो ते तर आहेच तुझ्या तब्येतीची काळजी वाटते मनाने तर तू आमच्यापेक्षा सक्षम आहेस, कणखर आहेस!!"
मी फक्त thanks म्हणालो आणि फोन ठेवून रडू लागलो.
- अमित जहागीरदार
८ मे २०१६
Mother's Day
(काल्पनिक कथा आणि पात्र - कथेशी, कुणाचाही संबंध नाहीय. असला तरी बोलून दाखवू नका !)