जवळची मैत्रीण
वेळ संध्याकाळची होती. आकाशात ढग दाटले होते पण सकाळी या असल्या वातावरणाची पुसटशी देखील कल्पना नव्हती. सकाळी स्वच्छ ऊन पडून एका दिवसाचा जन्म झाला होता पण दुपारी ढगांनी गर्दी करून अवेळी पावसाची वर्दी दिली होती. आवेश रोज च्या प्रमाणे office मधून निघायची तयारी ७ वाजल्या पासून करत होता पण कामाच्या गर्दी मुळे त्याला निघायला उशीर होत होता. बाहेर पडे पर्यंत पावसाने त्याचे स्वागत केल. घरी जायला गाडी असल्यामुळे पावसात भिजायला मिळणार नाही याच त्याला खरतर दु:ख वाटत होत. खरच किती कमाल असते - ज्या वेळी आवेश दुचाकीने फिरायचा तेव्हा पावसात भिजण्याचा कंटाळा यायचा आणि त्याला नेहमी वाटायचं कि चारीचाकी कधी घेईन आणि या भिजण्यापासून मुक्त होईन. पण आज अचानक त्याला आठवले कि पावसाचा स्पर्श किती दिवसाने झालाय . ज्याला आपण मोठे होणे म्हणतो ते कधी कधी आयुष्यातल्य छोट्या छोट्या गोष्टी पासून आपल्याला खूप दूर नेत.
या विचारामधून बाहेर पाडण्यासाठी एक कारण म्हणून गाडीने काही तरी आवाज काढला. गाडीची काच खाली करून आवेश बाहेर बघू लागला. त्याच्या लक्षात आल कि समोरचं चाक पंक्चर झालाय !! म्हणजे आवेश ला आज पावसाचा आनंद जबरदस्ती घ्यावा लागणार !! बस stop च्या आडोशाला गाडी घेवून तो बाहेर निघाला पावसाचा जोर थोडा कमी झाला होता त्यामुळे भिजण्याची भीती नव्हती.
गाडीचे काम करता करता त्याच्या लक्षात आले कि bus stop वर एक सुंदर मुलगी उभी होती. पावसापासून स्वताला वाचवत होती आणि बसच्या प्रतिक्षेत असलेली ती अजून सुंदर दिसत होती. आवेश ने स्वताला सावरल आणि विचारातून बाहेर आला आणि गाडीच्या कामात लक्ष देवू लागला. पण त्याच्या मनात वेगळाच विचार आला. इतक्या पावसात आणि इतक्या उशिरा बिचारी एकटीच थांबली अहे.
गाडीचे काम करून त्याने एक कटाक्ष तिच्यावर टाकला. ती अजूनही भांबावलेली दिसत होती आणि थोडी चिंतातूर हि. आवेश ने थोडी हिम्मत केली आणि तिला विचारले कि तुमची हरकत नसेल तर मी सोडून देतो.
एकदम अनोळखी माणसासोबत कस जायचं हा विचार तिच्यापण मनात येईल हे हेरून आवेश ने तिला कंपनीचे आइ कार्ड दाखवले आणि मोबाईल नंबर पण दिला . माझा फोटो काढून घराच्या कोणातरी पाठवून द्या हि कल्पना आपल्याला सुचली याच आवेशला कौतुक वाटलं. पण सुचेता ला हे सगळ ऐकून हसू येत होत. हो तीच नाव सुचेता होत . ती अवेशच्या गाडीत बसली आणि आपला फोन बंद झाल्यामुळे तिने आवेशाच्या मोबाईल वरून नवऱ्याला फोन केला. होय नवऱ्याला !!
आवेश थोडा हिरमुसला आणि मग त्याला आठवल कि आपण हि घरी फोन करून सांगाव कि निघालो म्हणून !!
काहीपण असो पावसात एक छान मुलगी आपल्या गाडीत बसली आहे याचा त्याला उगाच अभिमान वाटत होता . नाव, गाव, पत्ते, कामच ठिकाण आणि स्वरूप याची देवाण घेवाण झाली आणि ४० मिनिटांचा तो प्रवास संपला. सुचेताला तिच्या घराजवळ सोडून आवेश घरी आला. बायकोला सगळी हकीकत सांगितली सुचेता सहित ! फक्त ती गाडीत बसल्यावर झालेला आनंद सांगितला नाही पण त्याच्या बायकोने त्याला चिडवले कि लग्नानंतर तसाही तुला दुसऱ्या कुणाला लिफ्ट देण्याची गरज पडली नाही.
आवेशने अवंतीला सगळ सांगितलं काही लपवल नाही.
सुचेता आणि आवेश आता नियमित पणे भेटू लागले, कधी दुपारचे जेवण तरी कधी संध्याकाळची coffee !! कधी office गप्पा तर कधी आवडीचे विषय छंद सगळे बोलून झाले मग घराच्या गोष्टी !! नवऱ्याबद्दल अगदी आदराने बोलणारी सुचेता हळू हळू त्याच्या स्वभावातले कंगोरे उघडपणे दर्शवू लागली. आवेश आणि सुचेता ला हि जाणीव जरूर होती कि आपण फार जवळ आलोय पण यात प्रेम वगैरे काही नव्हत म्हणजे आवेश तर त्यांच्या भेटीतल्या सगळ्या गोष्टी अवंती ला सांगत असे. त्यांनी कधी असले बंधन ठेवले नाही
सुचेताने मात्र कधी आवेश आणि त्याच्या सोबतच्या भेटींचे कुठलेच तपशील नवऱ्याला सांगितले नाहीत.
बोलता बोलता हि गोष्ट जेव्हा आवेशला कळली तर त्याने तिला विचारले सुद्धा तू त्याला काहीच का सांगितले नाही.
सुचेताने त्याला समजावले कि एका लग्न झालेल्या मुलीने दुसऱ्या कुणाशी केलेली मैत्री समजावून घेण्या इतके त्याचे मन मोठे नाही आणि त्यासाठी मी तुझ्या सोबत ची मैत्री सोडू शकत नव्हते. आपल्या मैत्रीत कसलीही अशुद्धता नव्हती म्हणून मी पण त्याला उगाच सांगण्याच्या आणि समजावण्याच्या चक्रात अडकले नाही.
ते बोलणे तसेच सोडून आवेश घरी आला, कामात गढून गेलेल्या अवंतीला मिठीत घेतले आणि म्हणाला कि, " सगळ्यात छान आणि जवळची मैत्रीण तर तू आहेस !!"
- अमित जहागीरदार
८ मे २०१६

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा