प्रपोज करण्याचे प्रकार -भाग 6- चाचू मुझे पसीने क्यू आ रहे है
एखाद्या ठिकाणी आपण वर्षोन वर्षे राहतो पण परत तिथे आलो कि वाटत कि ते दिवस किती वेगळे होते. आता माझ असाच झाल. अमरावतीतल्या त्या भागामध्ये मी २-३ वर्ष राहिलो तेव्हा वाटल कि ह्या आठवणी मनात साठवतोय पण या कधीच मनातून जायच्या नाहीत. पण आज जवळपास १० वर्षाने इथे आलो तेव्हा लक्षात आल कि फक्त काही गोष्टीच नेहमीसाठी मनाच्या कप्प्यात राहतात, बाकीच्या गोष्टी काळानुसार हवेत विरून जातात.
मी राहायचो तिथे एक भास्कर वतनदार राहायचे. त्यांचे घर अजून तिथेच आणि तसेच होते म्हणून मी त्यांच्याकडे जाण्याचे ठरवले. तसाही माझा जास्त वेळ मी माझ्या घरी आणि त्यांच्या घरीच घालवायचो. कारण विभा ताई -त्यांची मुलगी ! ती माझ्यापेक्षा 3 वर्षाने मोठी होती. पण अभ्यासात खूप हुशार होती आणि जवळपासच्या मुलांना अभ्यासात थोडी गोडी यावी म्हणून classes घ्यायची. त्यामुळे मी पण तिला ताई म्हणायचो. तिचे लग्न आमच्याच घरासमोर एक अधिकारी कुटुंब राहायचं त्यांच्या स्वानंदशी झालय.
मी सहज गेलो तर काय नशीब ! विभा आणि स्वानंद दोघेही आले होते. मग गप्पांच फड रंगला. पहिले मी विभाताई आणि काकाच होतो गप्पा मारत आणि मग स्वानंदपण आला आमच्या मधे .
काका लगेच उठले आणि त्यांनी पंखा चालू केला -
जावई बाप्पुंना घाम येईन . असे म्हणून दोघे ही हसले. मी याच्या आधीपण काकांनी असा विनोद करतांना बघितलं होत. मी काकांना विचारलं सुद्धा हे पंख्याच काय प्रकरण आहे. तुह्मी स्वानंदला एक दोन वेळा पंख्यावरून आणि घामावरून चिडवले हे माझ्या लक्षात आहे. काका आणि स्वानंदला बाहेर जायचं होत म्हणून ते गडबडीत निघालेत. विभाताई आणि मी बऱ्याच वेळ गप्पा मारत बसलो. माझी नोकरी, नव शहर यासगळ्या गोष्टी चर्चून झाल्यात पण मला अजूनही याच उत्तर मिळालं नाही कि ती पंख्याची आणि घामाची गोष्ट काय आहे. विभाताईने माझ्या चेहर्यावरून माझ्या मनातल्या प्रश्नांची कल्पना आली असावी.
विभाताई हसली आणि गोष्ट सांगू लागली
अधिकारी कुटुंब आपल्या भागात shift झालेत, आमच्या घरच्यांशी ओळख झाली येण- जाण चालू झाल, परीचय वाढला मग कळल कि अधिकारी काका पत्रिका बघायचे आणि लग्न जुळवायचेत. त्यावेळी माझ लग्न करायचं अस चालल होत. स्वानंदशी ओळख झाली होती पण माझ्यासाठी तो एक शेजारी होता पण आजकाल तो जास्त वेळा भेटत होता. माझ्यासाठी आलेल्या प्रत्येक "ठिकाणा" ची माहिती आली कि बाबा ती अधिकारी काकांकडे पाठवायची. काका ती माहिती आणि पत्रिका बऱ्याचदा स्वानंदच्या हातून पाठवायचे . मग एखादी माहिती पडताळण्यासाठी अधिकारी काका कधी कधी स्वानंदलाच पाठवायचे. प्रत्येक वेळी स्वानंद घरी यायचा तेव्हा घामाने लदबदलेला असायचा. स्वानंद घरात आल्याबरोबर पहिले पंखा लावावा लागायचा. आम्ही सगळे आतल्या खोलीमधून त्याची हि गम्मत बघायचो आणि हसायचो. एक दोनदा तर बाबा घरी नसल्यामुळे मी एकटीच त्याच्या बऱ्याच श्या प्रश्नांची उत्तरे द्यायची. एकदा मी त्याला विचारले पण कि अरे तुला इतका घाम का येतो ??
काही न बोलता घाम पुसत निघून जायचा.
BSc नंतर मला पुढे शिकायचं होत . बाबांनी खुप आग्रह नव्हता धरला पण जमायला 1-2 वर्ष लागतात अस ग्रुहित धरून मी देखील होकार दिला. पण लगेच ठरू नये असे मनात पक्क केल होतं. आलेल्या स्थळाला नकार देण्यासाठी मला काहीना काही कारण मिळायचं आणि मी प्रत्येक वेळी लग्नाला नकार द्यायची.

मी सांगितलेल्या सगळ्या सबबी माझ्यावर एकदा उलटल्या. आता अधिकारी काकांनाही कळले होते कि मी कोणती proposal नाकारते मग त्यांनी ती सगळी जुळवा जुळव करून एक अस स्थळ सुचवाल कि नाही म्हणायला scope नाही.
सगळे तपशील स्वानंद ला सांगून काकांनी त्याला आमच्याकडे पाठवले. डिसेंबरचे दिवस होते आणि कडाक्याची थंडी होती पण स्वानंद घरी आला तेव्हा घामाने न्हावून निघाला होता. मी आश्चर्य चकीत झाले होते घरात दुसर कोणीच नाहीय हे त्याला माहित नव्हत म्हणून तो बिचारा मला सगळ सांगू लागला कि हे स्थळ खूप चांगल आहे आणि पत्रिका पण जुळते. मी थोडी लाजली . स्वानंद घामाने माखला होता आणि मला काय करावे ते सुचत नव्हते त्याच्या बोलण्यामागे भीती पण होती की ह्या स्थळाला नकार देता येणार नाही असे अधिकारी काका म्हणत होते.
मी सवयीने पंखा लावला आणि स्वानंदसाठी पाणी आणले. मला त्याला विचारायची इच्छा होती की तुला घाम का येतो रे पण आज तो जरा गंभीर दिसत होता. मी पण तो समोर बसलाय हे विसरून स्वतः शी बोलत बसले, "किती विचीत्र आहे. नाही? पत्रिका बघून, जुजबी माहिती पडताळून कुणाला सोबत आयुष्य घालवायच. आणि या process वर विश्वास ठेवायचा कारण आपल्या आई-बाबा , आजी- आजोबा सगळ्यांनी हेच केल .
यात कुठेच प्रेम, जिव्हाळा एकमेकांना ओळखणे ?? हे सगळ मिथ्थ्या वाटत.
बोलता बोलता माझ्या लक्षात आल कि स्वानंद तिथेच शांतपणे सगळ ऐकत होता. आणि त्याचा घाम देखील सुकला होता !!
तो म्हणाला कि कधी कधी प्रेम अगदी जवळपास असत पण आपल्याला दिसत नाही, जाणवत नाही.
तो म्हणाला कि कधी कधी प्रेम समोर असत पण आपल्याला दिसत नाही, कळत नाही. मी त्याच्या असल्या बोलण्याने अवाक् झाली होती.
त्याने बहुदा माझा चेहरा वाचला हवा आणि बोलला कि आता हेच बघ ना तुझ्या लग्न आता जुळणारच असा बाबांना विश्वास असतो आणि तू मात्र काही ना काही कारण काढते. मला जाम वैताग येतो पण वाटत एकदा मी हिंमत करेन आणि एकदा माझी पत्रिका पण जुळते का ते बघेन पण शब्द बाहेर येण राहिल बाजुला नुसता घामच येतो.
मला हसू पण येतो होत आणि आश्चर्य याचं वाटत होत कि त्याने ते सगळ बोलुन पण दाखवल. मला impress व्हायला आणि थोडा लाजायला हे पुरेसे होत . तो तेवढ बोलून निघून गेला आणि मी बाबांची वाट बघत बसले. त्यांना कधी सांगते अस झालं होत मला. पुढे सगळ्या गोष्टी जुळून आल्यात. आमच लग्न ठरलं आणि झाल देखील.
पण अजूनही स्वानंद आला कि आम्ही त्याला घाम आणि पंख्यावरून चिडवतो.
अशी ती आगळी वेगळी गोष्ट विभा - स्वानंदची !!
पण अजूनही स्वानंद आला कि आम्ही त्याला घाम आणि पंख्यावरून चिडवतो.
अशी ती आगळी वेगळी गोष्ट विभा - स्वानंदची !!
१५ ऑक्टोबर २०१५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा