गुरुवार, १० नोव्हेंबर, २०११

प्रपोज करण्याचे प्रकार -भाग 1


प्रत्येक चेहऱ्या मागे एक कथा असते.. ती ऐकतांना छान गंमत येते आणि त्याहून मजा असते जर ती प्रेम कथा असेल तर.
त्याला ती कुठे भेटली, त्यांनी कधी आणि कसे एकमेकांना "सांगितले" हे ऐकायला जेवढा उत्साह आपल्याला असतो त्याहीपेक्षा ज्यांची कथा असते त्यांना सांगण्यात  असतो. अशीच एक कथा मला कळली ....

बस मधल्या प्रवासात सहप्रवाश्यासोबत बोलायची गरज मला कधीच वाटत नाही. खिडकीतले प्रत्येक पेंटिंग हे आकाशातल्या पिकासोचा एक अविष्कार असतो आणि तो आपल्याला निशुल्क बघायला मिळतो असं मला वाटत. एखाद्या प्रवाश्याने आपल्या अस्तित्वाची वेगळी दाखल घेण्यास भाग पडले तर कधी नजर फिरते.
मागल्या वेळी मुंबईला जाताना,  जेव्हा डोळे निसर्गाचे एका सेकंदाला बदलणारे wallpaper  बघत होते तेह्वा कानावर समोरच्या मुलाचे बोलणे पडत होते.
" अरे हो ना ! सगळ खूप भराभर झाल."
"----"
"कोणालाच विश्वास बसत नव्हता कि सहा महिन्यात माझं status  फक्त single  वरुन committed होईल"

आत्ता मी पण थोडा बिथरलो होतो. काहीतरी छान ऐकायला मिळेल ह्या अपेक्षेने मी या संभाषणात रस घेवू लागलो.
पण हवे ते मिळण जरा कठीण असत पण चहाचा शोध हा बहुदा यासाठीच झाला असावा. लोणावळ्यात गाडी थांबल्यावर त्या सहप्रवाश्याला खिंडीत गाठलं आणि हळू हळू विषयाला आणि चहाच्या कपाला हात घातला.

ती गोष्ट त्यच्या लग्नाची नव्हती तर एका proposal ची होती. एका स्मित हास्याने त्याने सुरुवात केली. त्याच नाव सुहास आणि ती समिधा.  Facebook नावाच्या पान नसलेल्या पुस्तकाच्या  संकेत स्थळावर त्यांची ओळख झाली.
सुहास नुकताच एक छोट्या अपघातून बाहेर पडला होता आणि सुट्टी घेतलाय मुळे facebook ची पान जरा जास्त चाळत होता. एका  common  friend कडून ओळख झाली होती म्हणजे समिधाने common  frined कडे चौकशी करून  सुहासची Friendship request approve केली होती.


कोण्या एका दिवशी सकाळी सकाळी त्याने facebook वर login केल आणि online असलेल्या लोकांची यादी बघितली. समिधा त्यात होती.  १० मिनिटे नुसत Hi लिहून send करू की नाही हा विचार तो करत बसला.  मग send केल्यावर  तिचा पण response लगेच आला आणि मग नाव, गाव, पत्ता, छंद यांची देवाण-घेवाण झाली. सकाळी ९ ला चालू झालीली हि online चिव-चिव ११ वाजे पर्यंत चालू होती.
 


दुपारच्या विश्रांती नंतर पुन्हा  chat चालू झाल होत आणि मग त्यांना खूप जुने मित्र भेटल्या सारखे  वाटत होत.
एकमेकांना ओळखत नसल्यामुळे अगदी मनसोक्त गप्पा मारता आल्यात. सुहासने त्याच्या  आयुष्यातल्या महत्वाच्या घटना, जगण्याचा त्याचा मंत्र आणि हो त्याचे मित्रांवरच जीवपाड प्रेम तिला सांगितलं. सामिधाने जीवन या संकल्पने वरचा आपला विश्वास मागल्या काही घटनांवरून अधोरेखित केला. आता ते एकदम छान मित्र झाले होते.
मग नवीन गप्पांच फड रंगला .. आवडीची पुस्तके, पिकनिक स्पोटस, लेखक आणि अभ्यासाचे विषय यावर चर्चा झाली.
सहमती आणि असहमती यावर एकमत झालं  आणि मग एकदा बोलण्याची आतुरता स्क्रीन वरच्या शब्दांमध्ये  सुद्धा दिसू लागली आणि मग mobile चे नंबर शेअर केलेत.
सामिधाने office मधून लवकर निघायचे ठरवले पण जमणे कठीण होते पण तिच्या मनातल्या चातकाला थांबणे शक्य नव्हते.रात्री ९ वाजता office  मधले काम संपवून तिने फोन केला. पण hello इतकाच आवाज आला आणि फोन बंद झाला. एरवी छोट्या गोष्टींना वैतागून त्यांचा पिच्छा  सोडणारी समिधा पळत पळत जावून  फोन मध्ये टाकायला एक नवे sim card घेवून आली. ते activate व्हायला  लागणारा २ तासांचा  वेळ कसाबसा काढला. तिकडे सुहास चे हाल हाल झालेत. तिचा आवाज ऐकायला मिळणार या अपेक्षेने receive केलेला तिचा फोन network च्या मायाजालात गडप झाला होता. बहुदा एक कहाणी अशीच संपेल असा विचार पण मनात आला. पण फोन आल्यावर काय काय बोलायचे यात शब्द आणि भावनाचे जुंपले.


पण रात्री ११.३० ला तिचा फोन आला. ते खूप बोलले. २ तासानंतर फोन ठेवला पण .... पुह्ना तिने फोन केला आणि .....
ज्याच्या सोबत मी इतक्या मनमोकळ्यापणे सगळ सगळ बोलू शकते त्याच्यासोबत आयुष्य किती सुंदर जाईन ..
मला माझं आयुष्य तुझ्या सोबत घालवायच आहे ! नाही त्यातला एक एक क्षण जगायचा आहे.


त्याला असे वाटले कि माझ्या मनातले विचार हिला कळले कुठून?? शब्दांची जुळवा जुळाव करण्यापेक्षा त्याने फक्त हो म्हटले.


नेट मुळे आमची ओळख  झाली आम्ही  भेटलो, मग प्रेम झाल  असं सांगणारे खूप भेटतात. त्या कथा ऐकण आणि अनुभवणे भले हि
exciting असेन पण सकाळी ९ वाजता झालेली ओळख रात्री १ वाजे पर्यंत आयुष्यभराच्या सोबतीत बदलेली बघून हा  Instant  चा  जमाना आहे हे पटत. त्याहीपेक्षा प्रेमाची खोली मोजण्याचे माप अजून बनले नाही.. दिवसांची ओळख, जुळणाऱ्या आवडी आणि छंद याही पुढे प्रेमाचे काही वेगळेच धागे आहेत जे वरतून हलवले जातात .

काही महिन्यापूर्वी सुहास- सामिधाच्या लग्नाला जावून आलो.. लग्न छान झालं दोघे खुश दिसत होते. छान बेत होता मेजवानीचा पण मला तिथे instant coffee मिळाली असती तर छान झालं असत असं वाटल.




.... Instant coffee ला सागितलं असत कि अजून काय काय  Instant आणि तेवढंच टेस्टी असू शकत !!!!!!!!


- अमित जहागीरदार
   पुणे, १० नोव्हे.  २०११


( मूळ सत्यघटनेमध्ये काही सोयीस्कर आणि चमचमीत बदल केले आहेत. नावं मिळती जुळती आहेत पण propose करण्याची संकल्पना आणि speeed तीच आहे. )

मंगळवार, १६ ऑगस्ट, २०११

प्रपोज करण्याचे प्रकार -भाग 3---- Bhasha

भाषा --- मानवाच्या संस्कृतीचे आणि उन्नतीचे प्रतिक. पण प्रेमाला भाषा नसते.  डोळ्यातल्या प्रेमाला वाचायला तसेच भाव असलेले दोन डोळे पुरेसे असतात. आधी मला  पण असेच वाटायचे पण जेव्हा कावेरी ची गोष्ट कळली तेव्हा कळले कि भाषा खूप महत्वाची असते .. अगदी प्रेमात सुद्धा......................


कावेरी सांगली मध्ये  शिक्षण आटपून पुण्यात नोकरीसाठी आली. चांगल्या नोकरी सोबत  एखाद्या
foreign  langauge ची जोड म्हणून German शिकायचे ठरवले.
कुठल्याही भाषेचा अभ्यास करण्यासाठी सोप्पा मार्ग म्हणजे त्या भाषेतल्या  साहित्याचा अभ्यास करणे. कावेरीला german शिकवणाऱ्या madam ला हि गोष्ट अगदी व्यवस्तीत ठावूक होती. म्हणून त्यांनी क्लासमधल्या सगळ्यांना वाचायला german  साहित्य दिलं. काही कविता, काही नाटकं   madam नी  विद्यार्थांच्या ग्रुपस ला दिलीत म्हणजे त्यांना ते वाचता वाचता भाषेचा अभ्यास पण करता येईल. कावेरीला एक छानस romatic नाटकं मिळाल अगदी रोमेओ-जुलीअत सारख !! आणि मनीष सारखा एक पार्टनर मिळाला ज्याचा ढंग फार निराळा होता. ती खूप serious होती तर तो just एक वेगळा अनुभव म्हणून शिकायला आला होता. पण तिच्या  उत्साहाकडे बघून त्याने पण मन लावून german शिकायचं ठरवलं.
नाटकामध्ये कित्येक प्रसंग हे प्रेमाच्या उत्कट  भावनाची वीण असलेल्या  विचारांवर आधारित होते. दोघेही तसे प्रेमाच्या प्रांतात नवीन होते. किंबहुना त्यांनी फक्त फिल्म अथवा कादंबरीतून प्रेमाचा गंध घेतला होता.. ( स्वाद नाही)  प्रेमाच्या त्या ओळींच्या ओलाव्यात भिजत नाटकाचा अर्थ समजावून घेता घेता काही थेंब अंगावर  नक्कीच पडत होते....पण दोघेही खूप focused होते म्हणून शब्दातले भाव फक्त मेंदूपर्यत पोहोचत होते मनाला भिडत नव्हते.

तिकडे नाटकाचा एक छोटा भाग सदर करण्यासाठी प्रत्यक्ष प्रेम सोडून प्रेमासारख सगळच कराव लागल. हातात हात घालून प्रेमाच्या आणा भाका पण घेतल्या गेल्या.
टाळ्यांच्या कडकडाटात मिळाली दाद हि नाटकाला अथवा आपल्या सादरीकरणाला होती असा समाज करून दोघेहि मनातल्या खऱ्या भावनांकडे बघेनासे झालेत. पण तो पर्यंत त्यांच्यामध्ये छान मैत्री फुललेली होती. 
कावेरी त्याच्याकडे एक अन एक गोष्ट share करू लागली. नोकरीची निवड, आई बाबांसाठी चे गिफ्ट्स आणि तिच्या  ड्रेसचे रंग सगळे सगळे मनीषच्या आवडीचे. तो पण त्याचा व्यवसायातून वेळ काढून तिला भेटायला  मुंबईतून पुण्यात येवू  लागला.
कावेरीच्या नोकरीच सगळ सुरळीत झाल्यावर तिच्या घरच्यांनी रिती प्रमाणे तिच्या  लग्नाची गोष्ट तिच्यासमोरच काढली. एरवी स्पष्ट आणि मोकळ्या मानाने बोलणारी कावेरी या विषयावर काहीच बोलायची नाही. तिला फक्त अस्वस्थ वाटायचं आणि नाटकातले एक दोन प्रसंग डोळ्या समोर यायचेत. लग्न आणि त्याच्यातल्या बाकी गोष्टींपेक्षा तीला प्रेमाच आकर्षण जाणवू लागल . मनात प्रश्न येवू लागले कि हे काय असत आपण जे अनुभवलं होत अगदी तसाच असत का ??
 पण या सगळ्यांचा अर्थ काही कळत नव्हता.
 एव्हाना मनीषच्या पुण्यातल्या  चकरा वाढल्या होत्या. असाच एकदा तो आला असतांना मनीष समोर हा विषय निघाला आणि  कावेरीने घरच्यांचे plans त्याला सांगितले . मनीषने  सुद्धा याच  भावनांच्या  गुंत्यात आपणही अडकलो आहोत याचा खुलासा केला. याचा अर्थ काय हे प्रश्न दोघांना पडले.. लग्नाचा विषय निघाला कि मनीषच्या डोळ्यासमोरचे  तेच नाटकातले येत होते आणि त्याला एकाच प्रसंग आठवत होता - त्याच्या हातात येणारे  कावेरीचे  हात.

काही दिवसांनी मनीष पुह्ना पुण्यात आला. दोघेही  नुसते अर्थ कळून घेण्यापेक्षा या अनुभवाचे येणाऱ्या उद्याशी काही संबंध जोडला येतील का असा प्रश्न मनीषने केला आणि कावेरीला त्या वेळी इतक्या दिवसांमधल्या पडलेल्या प्रश्नांचे उत्तर मिलाले. 

साठे madam च्या शिकवण्याचा वेगळ्या पद्धतीचे फायदे समजायला नाटकाची तेव्हा केलेली  पारायण आणि नंतरच्या दिवसांमधले त्याचे उमगलेले अर्थ आज फलित झालेत.. मनातले  बोलायला त्यांना जास्त वेळ लागला नाही. मनीषने तिला नाटकाच्या प्रसंगाचा आधार घेवून german भाषेत विचारले कि तू माझ्या सोबत तुझ पूर्ण आयुष्य घालवशील का ?? 




नाटकातले सगळे संवाद जिभेच्या टोकावर नाचत असतांना तिने प्रेमाच्या सगळ्यात पहिल्या भाषेचा आधार घेतला.. डोळ्याच्या भाषेचा ... मनीषला कळले...


प्रेमाला जरी भाषेची गरज लागत नसेल तरी पण भाषेच्या सपोर्टची गरज नक्कीच असते........................


अमित जहागीरदार
२०११

शनिवार, १३ ऑगस्ट, २०११

Samanya ani asamanya

पुष्कळदा काही असामान्य लोकांकडे बघून वाटत की ही लोकं नक्की काय वेगळ करत असावी. त्यांच्याबद्दल  हेवा, द्वेष, मत्सर, कुतूहल, प्रेम काही पण जोडीला असलं तरी असामान्य लोकांना बघून हा प्रश्न येतोच. आणि मग तर कुणाच आत्मचरित्र वैगैरे वाचलं की लक्षात येत ते पण आपल्यासारखेच सामान्य आयुष्य जगणारे  असतात..... मग वेगळ असत तरी काय??

मला वाटत वेगळा असतो तो त्यांचा विचार करण्याचा pattern . म्हणजे आपल्या पण आयुष्यात तश्याच घटना घडत सुद्धा असतात पण आपण त्याला ज्या पद्धतीने react होतो तीच बहुदा ठरवते आपला सामान्यापणा !!

A P J च्या लहानपणाची गोष्ट वाचली कि ते एका झाडावर चढले होते काही मित्र मैत्रींनी सोबत आणि अचानक जोराचा वारा  सुटला. बाकी मुलांचे पालक त्यांना सांगत होते कि झाडाला पकड नाही तर पडशील !! पण APJ  च्या वडिलांनी सागितले कि तू जर नीट झाडाला पकडले तर पडणार नाहीस......

Positive  गोष्टींचा परिणाम खूप मोठ्ठा असतो आणि मनावर खोलवर बिंबवल्या जातो... असे केले नाही तर हे होणार नाही या गोष्टींचा लहानपणा पासून भडीमार होत असतो ... अभ्यास केला तर पास होशील म्हणणारा मला भेटलेला नाही.
नाही केलास तर नापास होशील हि भीती प्रत्येकाने दाखवली... 

जर आपण मुळातच positive  विचार करत नाही तर मग नंतर कुठून येणार.. मोठी मोठी पुस्तके वाचून ?? त्यात फक्त rapper छान आणि देखण कसं करता येत ते सांगतात.   

असामान्य माणसाचं वैशिष्ठ त्यांच्या परिस्थिती पासून वेगळाच संदेश घेण्यात असतं.
आपण ज्या गोष्टी मध्ये काहीच शोधू शकत नाही त्याच ते खूप मोठे अर्थ शोधतात.  त्यांच्या आयुष्यातले प्रसंग म्हणजे एक Metaphore असतात .. बोधपूर्ण ! पण बोध शोधावा लागतो. आपल्याला प्रत्येक कथेच्या मागे कृती काय हे सांगाव लागत.
नाही तर आपण दासबोधासारखे पारायण करतो पण आचरणात आणण्यासारख काहीच नसते....

मला एक प्रसंग आठवतो.. माझ्या जुन्या कंपनी मधला ! ऑफिसला  जाताना थोडा उशीर झाला म्हणून मी एक दोन turns वर माझ्या वेगाचे प्रात्यक्षिक दाखवत  पार्किंग मध्ये दाखल झालो. HR चे एक मोठ्ठे अधिकारी माझ्या दिशेने चालत येत होते . punching  ला किती मिनिटे बाकी आहेत याच गणित मनात चालू असतांना त्या अधिकाऱ्या  कडून काय काय आणि किती वेळ ऐकावं लागणार याचा मी हिशेब मांडत होतो. कोण? कुठला? dept  कोणते? हि चौकशी झाल्यावर त्यांनी directly  घरी कोण कोण असते हा प्रश्न विचारला. तुला काही झाले तर त्यांना काय वाटेल ? किती त्रास होईल? असले प्रश्न मला अपेक्षित नव्हते . कंपनीच्या नुकसानच एखाद कोष्टक मला देतील अस वाटल पण हा विचार खूप वेगळा होता. माझ्या संकुचित विचारांच्या झेपेपलीकडचा !!

मला विचार करायला लावणारे ते शद्ब तसे रोजचे पण वाटले असते पण तिथे थांबल्या मुळे मला एक असामान्य विचार गवसला. 

आजूबाजूला घडणारया साध्या गोष्टींमध्ये काही नवे क्रांतिकारी विचार दडलेले असू शकतात .. अश्या छोट्या छोट्या गोष्टींमधून आपल्याला सुद्धा एखादा असामान्य विचार भेटू शकतो ! फक्त आपल्याला डोळे आणि डोकं ओपन करून फिरावं लागेल.



अमित जहागीरदार
पुणे
११ ऑगस्ट २०११

मंगळवार, ९ ऑगस्ट, २०११

Tit for Tat.... new perspective

काल एका मित्राचा फोन आला होता. त्याने त्याच्या एका नातेवाईकाला कसे Tit For Tat  केले याच रसभरीत वर्णन तो देत होता. बरेच दिवसांनी हा विषय निघाला होता आणि मला एक श्रोता सापडला होता .. माझा जगावेगळा फंडा सांगायला.

आपण "जसाश तसे" म्हणतो खरे पण हे सगळी कडे करता येत नाही. हा म्हणजे कुणी आपली खोडी केली, आपल्याला दुखावलं तर आपण तसाच पलटवार करायचा. हे करण तसं सोपंच ना. म्हणजे  वाईट वागण म्हणजे फक्त नक्कल करणे. आणि मुळात वाईट गोष्टींची नक्कल आपण लहानपणा पासून लवकर करत आलोय. त्यामुळे समोरचा जस वागतोय त्याला उत्तर देण तितकंसं कठीण नाही.
पण खरी पंचाईत तेव्हा होते जेव्हा समोरची व्यक्ती चांगली वागते. आपण कितीही ठरवले तरी ठरवून  चांगले वागणे तेवढे सोप्प नाही. त्यासाठी मुळातच चांगल असावं लागत. पण वाईट वागायला अस काही बंधन नाही. पटत नसेल तर एक सोप्प उदाहरण बघा - आई .. ती किती चांगली वागले आपल्याशी पण तीच्या सारख आपण नाही ना वागू शकत. छोट्या छोट्या गोष्टींची इतकी काळजी घेण जमेल का आपल्याला ??
अगदी मनापासून करायचं ठरवलं तरी पण जमणार नाही. तसच कुणी दुसरी व्यक्ती छान वागली की आपल्याला ते रिफ्लेक्ट करता आलं पाहिजे. करण्यासाठी आपल्या मनाचा आरसा स्वच्ह असायला हवा. म्हणजे आता अस बघा ना एखादा सरकारी ऑफिस मधला अथवा  बँकेतला  कर्मचारी , बसचा कॅन्दाक्तर किंवा तत्सम पंथातले लोक ( लोकायुक्ताच्या कक्षेतले ) जर छान वागले तर एकदम धक्काच .बसतो आणि तोंडातून Thank you सुद्धा निघत नाही. तो अपेक्षाभंगच एवढा मोठ्ठा असतो.

परवा एका बँकेत गेलो तर घड्याळाचा काटा पाच वर गेला होता तेह्वा मनाची तयारी केली होती की काम तर होणार नाही पण एक-दोन मिनिटे थांबू या असे वाटले.  नंतर तो अधिकारी आला  आणि भिंतीवरचे अथवा हातातले घड्याळ न बघता त्याने माझे ऐकून घेतले आणि मला सांगितले कि पुढे काय करायचे. तो धक्का इतका मोठा होता कि मला माझे काम झाल्यासारखे वाटले. बाहेर जावून गाडी स्टार्ट करतांना आठवलं मी त्याचे  धन्यवाद सुद्धा मानले  नाहीत. पण त्यापेक्षा सगळे सरकारी कर्मचारी एक सारखे असतात हा समज ( कि गैरसमज  ) मनातून काढणे हे त्याला धन्यवाद म्हणण्या सारखेच ना !

मतितार्थ हाच की कुणाशी चांगल वागण हे आपल्यावर अवलंबून असत, कुणी तरी चांगला वागला म्हणून आपण तसाच वागू शकत नाही. कुणाला रिफ्लेक्ट कारण तितकस सोप्प नाही. काही आरसे प्रतिबिंब उंच दाखवतात काही त्याला जाड दाखवतात पण स्वच्छ आरसा हा  सुंदर प्रतिमा रेखाटतो. म्हणूनच प्रत्येकाला आपण आरश्यात सुंदर दिसतो. कारण आरसा फक्त मनातले विचार दाखवतो.

म्हणजे काय तर, जर आपण कुणाच चांगल वागण रिफ्लेक्ट करू शकत नाही तर मग वाईट वागण्यावर कशाला प्रतिक्रिया द्यायची. दुसऱ्या कुणाला त्या व्यक्तीच्या वागण्याचे नाही तर तुमच्या वागण्याचे आश्यर्य वाटेल.
तर मग  Tit For Tat  तेह्वाच करा जेह्वा आपण एखाद्या चागल्या गोष्टीची पण नक्कल करू शकू आणि ती पण मनापासून !!
आणि मग वाईट गोष्टींसाठी पण Tit For Tat  नका करू ... आपण आहोत तसेच वागू या आणि या पेक्षा छान होण्याचा प्रयत्न करू या...


अमित जहागीरदार
पुणे ८ ऑगस्ट २०११

मंगळवार, २६ जुलै, २०११

पहिला ब्लोग !!   सगळ्या पहिल्या गोष्टी खूप चमत्कारी असतात आणि आठवतात सुद्धा ! पहिला पाउस, पहिला शाळेचा दिवस ( तो आईला जास्त लक्षात राहतो) , पहिली परीक्षा , पहिला हातातला हात !! आणि बरच काही.

पहिल्या गोष्टींची जादू बराच काळ राहते. आठवल्यावर तसेच शहारे येतात.
माझा पहिला ब्लोग Special असावा असं मला वाटत पण त्यापेक्षा तो माझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी स्पष्ट करणारा असावा. तसे लिहिण्याची सवय आता तुटली पण एक विश्वास आहे कि मनातल लिहील कि मनाला नक्कीच भिडत.
त्यामुळे इतक्या दिवसांनी लेखणी ( आता keyboard म्हणायला हव) हातात घेतली तर थोडी भीती वाटतेय.

बघू या एक प्रयत्न नक्कीच करायला हवा. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात छान काहीतरी डोळ्यांना वाचायला मिळण ही गरज झाली आहे, आणि जर ते मनाला भिडून डोळे उघडणार असेल तर मग सगळ्यांना आवडत सुद्धा !
असे काही विचार मनासाठी वंगण ठरतात आणि रुटीन मध्ये थोड प्रोटीन येत !!
दिवसातला एक मिनिट स्वतासाठी द्यावा अस म्हणायचं पण खरा प्रश्न हा असतो की स्वत: साठी काय करायचं?  हे पण कधी कधी कळत नाही आणि मग मनात गोंधळ सुरु होतो !
आपल्याला नक्की काय हवंय हे कळणच खूप कठीण असत. मी कोण आहे?  हा   प्रश्न विचारण किंवा मनात येण  फार गंभीर होईल पण मला काय हवंय हे माहित असायला हव ना ! म्हणजे आयुष्याच्या शर्यतीत पाळायला मज्जा येईल.

पहिल्यांदा इतक लिहील तेच पुरे. आता बघू या कसं वाटत वाचल्यावर !

Good Day !!


अमित जहागीरदार ,
पुणे ,
२५ जुलै २०११