पुष्कळदा काही असामान्य लोकांकडे बघून वाटत की ही लोकं नक्की काय वेगळ करत असावी. त्यांच्याबद्दल हेवा, द्वेष, मत्सर, कुतूहल, प्रेम काही पण जोडीला असलं तरी असामान्य लोकांना बघून हा प्रश्न येतोच. आणि मग तर कुणाच आत्मचरित्र वैगैरे वाचलं की लक्षात येत ते पण आपल्यासारखेच सामान्य आयुष्य जगणारे असतात..... मग वेगळ असत तरी काय??
मला वाटत वेगळा असतो तो त्यांचा विचार करण्याचा pattern . म्हणजे आपल्या पण आयुष्यात तश्याच घटना घडत सुद्धा असतात पण आपण त्याला ज्या पद्धतीने react होतो तीच बहुदा ठरवते आपला सामान्यापणा !!
A P J च्या लहानपणाची गोष्ट वाचली कि ते एका झाडावर चढले होते काही मित्र मैत्रींनी सोबत आणि अचानक जोराचा वारा सुटला. बाकी मुलांचे पालक त्यांना सांगत होते कि झाडाला पकड नाही तर पडशील !! पण APJ च्या वडिलांनी सागितले कि तू जर नीट झाडाला पकडले तर पडणार नाहीस......
Positive गोष्टींचा परिणाम खूप मोठ्ठा असतो आणि मनावर खोलवर बिंबवल्या जातो... असे केले नाही तर हे होणार नाही या गोष्टींचा लहानपणा पासून भडीमार होत असतो ... अभ्यास केला तर पास होशील म्हणणारा मला भेटलेला नाही.
नाही केलास तर नापास होशील हि भीती प्रत्येकाने दाखवली...
जर आपण मुळातच positive विचार करत नाही तर मग नंतर कुठून येणार.. मोठी मोठी पुस्तके वाचून ?? त्यात फक्त rapper छान आणि देखण कसं करता येत ते सांगतात.
असामान्य माणसाचं वैशिष्ठ त्यांच्या परिस्थिती पासून वेगळाच संदेश घेण्यात असतं.
आपण ज्या गोष्टी मध्ये काहीच शोधू शकत नाही त्याच ते खूप मोठे अर्थ शोधतात. त्यांच्या आयुष्यातले प्रसंग म्हणजे एक Metaphore असतात .. बोधपूर्ण ! पण बोध शोधावा लागतो. आपल्याला प्रत्येक कथेच्या मागे कृती काय हे सांगाव लागत.
नाही तर आपण दासबोधासारखे पारायण करतो पण आचरणात आणण्यासारख काहीच नसते....
मला एक प्रसंग आठवतो.. माझ्या जुन्या कंपनी मधला ! ऑफिसला जाताना थोडा उशीर झाला म्हणून मी एक दोन turns वर माझ्या वेगाचे प्रात्यक्षिक दाखवत पार्किंग मध्ये दाखल झालो. HR चे एक मोठ्ठे अधिकारी माझ्या दिशेने चालत येत होते . punching ला किती मिनिटे बाकी आहेत याच गणित मनात चालू असतांना त्या अधिकाऱ्या कडून काय काय आणि किती वेळ ऐकावं लागणार याचा मी हिशेब मांडत होतो. कोण? कुठला? dept कोणते? हि चौकशी झाल्यावर त्यांनी directly घरी कोण कोण असते हा प्रश्न विचारला. तुला काही झाले तर त्यांना काय वाटेल ? किती त्रास होईल? असले प्रश्न मला अपेक्षित नव्हते . कंपनीच्या नुकसानच एखाद कोष्टक मला देतील अस वाटल पण हा विचार खूप वेगळा होता. माझ्या संकुचित विचारांच्या झेपेपलीकडचा !!
मला विचार करायला लावणारे ते शद्ब तसे रोजचे पण वाटले असते पण तिथे थांबल्या मुळे मला एक असामान्य विचार गवसला.
आजूबाजूला घडणारया साध्या गोष्टींमध्ये काही नवे क्रांतिकारी विचार दडलेले असू शकतात .. अश्या छोट्या छोट्या गोष्टींमधून आपल्याला सुद्धा एखादा असामान्य विचार भेटू शकतो ! फक्त आपल्याला डोळे आणि डोकं ओपन करून फिरावं लागेल.
अमित जहागीरदार
पुणे
११ ऑगस्ट २०११
Nice blog Amit...hope you will post such a good blogs regularly for us :-)
उत्तर द्याहटवा