गुरुवार, १० नोव्हेंबर, २०११

प्रपोज करण्याचे प्रकार -भाग 1


प्रत्येक चेहऱ्या मागे एक कथा असते.. ती ऐकतांना छान गंमत येते आणि त्याहून मजा असते जर ती प्रेम कथा असेल तर.
त्याला ती कुठे भेटली, त्यांनी कधी आणि कसे एकमेकांना "सांगितले" हे ऐकायला जेवढा उत्साह आपल्याला असतो त्याहीपेक्षा ज्यांची कथा असते त्यांना सांगण्यात  असतो. अशीच एक कथा मला कळली ....

बस मधल्या प्रवासात सहप्रवाश्यासोबत बोलायची गरज मला कधीच वाटत नाही. खिडकीतले प्रत्येक पेंटिंग हे आकाशातल्या पिकासोचा एक अविष्कार असतो आणि तो आपल्याला निशुल्क बघायला मिळतो असं मला वाटत. एखाद्या प्रवाश्याने आपल्या अस्तित्वाची वेगळी दाखल घेण्यास भाग पडले तर कधी नजर फिरते.
मागल्या वेळी मुंबईला जाताना,  जेव्हा डोळे निसर्गाचे एका सेकंदाला बदलणारे wallpaper  बघत होते तेह्वा कानावर समोरच्या मुलाचे बोलणे पडत होते.
" अरे हो ना ! सगळ खूप भराभर झाल."
"----"
"कोणालाच विश्वास बसत नव्हता कि सहा महिन्यात माझं status  फक्त single  वरुन committed होईल"

आत्ता मी पण थोडा बिथरलो होतो. काहीतरी छान ऐकायला मिळेल ह्या अपेक्षेने मी या संभाषणात रस घेवू लागलो.
पण हवे ते मिळण जरा कठीण असत पण चहाचा शोध हा बहुदा यासाठीच झाला असावा. लोणावळ्यात गाडी थांबल्यावर त्या सहप्रवाश्याला खिंडीत गाठलं आणि हळू हळू विषयाला आणि चहाच्या कपाला हात घातला.

ती गोष्ट त्यच्या लग्नाची नव्हती तर एका proposal ची होती. एका स्मित हास्याने त्याने सुरुवात केली. त्याच नाव सुहास आणि ती समिधा.  Facebook नावाच्या पान नसलेल्या पुस्तकाच्या  संकेत स्थळावर त्यांची ओळख झाली.
सुहास नुकताच एक छोट्या अपघातून बाहेर पडला होता आणि सुट्टी घेतलाय मुळे facebook ची पान जरा जास्त चाळत होता. एका  common  friend कडून ओळख झाली होती म्हणजे समिधाने common  frined कडे चौकशी करून  सुहासची Friendship request approve केली होती.


कोण्या एका दिवशी सकाळी सकाळी त्याने facebook वर login केल आणि online असलेल्या लोकांची यादी बघितली. समिधा त्यात होती.  १० मिनिटे नुसत Hi लिहून send करू की नाही हा विचार तो करत बसला.  मग send केल्यावर  तिचा पण response लगेच आला आणि मग नाव, गाव, पत्ता, छंद यांची देवाण-घेवाण झाली. सकाळी ९ ला चालू झालीली हि online चिव-चिव ११ वाजे पर्यंत चालू होती.
 


दुपारच्या विश्रांती नंतर पुन्हा  chat चालू झाल होत आणि मग त्यांना खूप जुने मित्र भेटल्या सारखे  वाटत होत.
एकमेकांना ओळखत नसल्यामुळे अगदी मनसोक्त गप्पा मारता आल्यात. सुहासने त्याच्या  आयुष्यातल्या महत्वाच्या घटना, जगण्याचा त्याचा मंत्र आणि हो त्याचे मित्रांवरच जीवपाड प्रेम तिला सांगितलं. सामिधाने जीवन या संकल्पने वरचा आपला विश्वास मागल्या काही घटनांवरून अधोरेखित केला. आता ते एकदम छान मित्र झाले होते.
मग नवीन गप्पांच फड रंगला .. आवडीची पुस्तके, पिकनिक स्पोटस, लेखक आणि अभ्यासाचे विषय यावर चर्चा झाली.
सहमती आणि असहमती यावर एकमत झालं  आणि मग एकदा बोलण्याची आतुरता स्क्रीन वरच्या शब्दांमध्ये  सुद्धा दिसू लागली आणि मग mobile चे नंबर शेअर केलेत.
सामिधाने office मधून लवकर निघायचे ठरवले पण जमणे कठीण होते पण तिच्या मनातल्या चातकाला थांबणे शक्य नव्हते.रात्री ९ वाजता office  मधले काम संपवून तिने फोन केला. पण hello इतकाच आवाज आला आणि फोन बंद झाला. एरवी छोट्या गोष्टींना वैतागून त्यांचा पिच्छा  सोडणारी समिधा पळत पळत जावून  फोन मध्ये टाकायला एक नवे sim card घेवून आली. ते activate व्हायला  लागणारा २ तासांचा  वेळ कसाबसा काढला. तिकडे सुहास चे हाल हाल झालेत. तिचा आवाज ऐकायला मिळणार या अपेक्षेने receive केलेला तिचा फोन network च्या मायाजालात गडप झाला होता. बहुदा एक कहाणी अशीच संपेल असा विचार पण मनात आला. पण फोन आल्यावर काय काय बोलायचे यात शब्द आणि भावनाचे जुंपले.


पण रात्री ११.३० ला तिचा फोन आला. ते खूप बोलले. २ तासानंतर फोन ठेवला पण .... पुह्ना तिने फोन केला आणि .....
ज्याच्या सोबत मी इतक्या मनमोकळ्यापणे सगळ सगळ बोलू शकते त्याच्यासोबत आयुष्य किती सुंदर जाईन ..
मला माझं आयुष्य तुझ्या सोबत घालवायच आहे ! नाही त्यातला एक एक क्षण जगायचा आहे.


त्याला असे वाटले कि माझ्या मनातले विचार हिला कळले कुठून?? शब्दांची जुळवा जुळाव करण्यापेक्षा त्याने फक्त हो म्हटले.


नेट मुळे आमची ओळख  झाली आम्ही  भेटलो, मग प्रेम झाल  असं सांगणारे खूप भेटतात. त्या कथा ऐकण आणि अनुभवणे भले हि
exciting असेन पण सकाळी ९ वाजता झालेली ओळख रात्री १ वाजे पर्यंत आयुष्यभराच्या सोबतीत बदलेली बघून हा  Instant  चा  जमाना आहे हे पटत. त्याहीपेक्षा प्रेमाची खोली मोजण्याचे माप अजून बनले नाही.. दिवसांची ओळख, जुळणाऱ्या आवडी आणि छंद याही पुढे प्रेमाचे काही वेगळेच धागे आहेत जे वरतून हलवले जातात .

काही महिन्यापूर्वी सुहास- सामिधाच्या लग्नाला जावून आलो.. लग्न छान झालं दोघे खुश दिसत होते. छान बेत होता मेजवानीचा पण मला तिथे instant coffee मिळाली असती तर छान झालं असत असं वाटल.




.... Instant coffee ला सागितलं असत कि अजून काय काय  Instant आणि तेवढंच टेस्टी असू शकत !!!!!!!!


- अमित जहागीरदार
   पुणे, १० नोव्हे.  २०११


( मूळ सत्यघटनेमध्ये काही सोयीस्कर आणि चमचमीत बदल केले आहेत. नावं मिळती जुळती आहेत पण propose करण्याची संकल्पना आणि speeed तीच आहे. )

३ टिप्पण्या: