पहिली मैत्री(ण)
मला सगळे तपशील देता येतील याची शाश्वती नाही. हि गोष्ट माझ्या college च्या वेळेची. मुलींशी मैत्री हा माझ्यासाठी "तेव्हा" कठीण विषय होता. मला जमले पण नाही आणि मी वेळ घालवला पण नाही . असली मजल मित्रांनी पण कधी मारली नाही तेव्हा आमचा द्रुष्टी"कोन " एकच होता.
शमा साहनी !! नाव आज पण लक्ख आठवत. तसं सगळच आठवत पण कथा ह्या एका गोष्टीचीच होऊ शकते. थोडीशी modern, खडूस, दिसायला smart पण नुसत्या रंगांच्या नाही तर ढंगाच्या जोरावर मनाला भिडणार व्यक्तिमत्व !! आमची मजल कधी बोलण्या पर्यंत गेलीच नाही आणि आम्ही इतके प्रसिद्ध नव्हतो कि स्वताहून कोणी बोलायला येइल. आमच्या ख्यातीच्या गप्पा इथे नकोच मुळी.
शमा आणि माझी गाठ parking मध्ये पडली. तिच्या गाडीवर बसून ( ती तिथे नसतांना) आम्ही टिंगल टवाळी करत होतो. तिच्या अचानक तिथे येण्याने आम्ही शांत झालो आणि तिने आमच्यावर काहीतरी joke केला. आमच्यातले तेज जागृत व्हायला तेवढ पुरेस होत. मग ठरलं कि आता या कन्येला थोड seriously घ्यायचं. त्या नंतर तिच्या घराचा पत्ता, येण्याच्या-बाहेर पडण्याच्या वेळा, यांची तपशीलवार माहिती गोळा करण्यात आली. तिचा पाठलाग करण्याचे plan आखण्यात आलेत. अश्याच एका महत्वाच्या मोहिमेची तयारी करतांना माझे आणि माझ्या परम मित्राचे बोलणे माझ्या "आजीने" ऐकले. आजी म्हणजे- बहिण. पण असले विषय असले कि आणि माझ्यावर लक्ष ठेवणे हा मुद्दा असेल तर मी तिला आजी म्हणणे पसंत करतो.
आम्ही code words मधेच बोलत होतो. जहाज, सावज, पाठलाग, मोहीम, मुहूर्त वगैरे वगैरे. पण समवयस्क असल्यामुळे आणि माझी सगळी जवाबदारी तिच्यावर सोडून आई बाबा office ला जात असल्यामुळे तिला हे सगळ कळायला जास्त वेळ लागला नाही. पुन्हा घरात आल्यावर मी अगदी निष्पाप मनाने माझी कामं करायला लागलो. बराच वेळ मला धास्ती होती कि तो विषय निघेल पण तसे झाले नाही. संध्याकाळी मी terrace वर गेलो तेव्हा ती चोरपावलांनी मागे आली. आता हा विषय निघणार आणि सगळा अहवाल जेवणाआधीच आई-बाबांपर्यंत पोहोचणार. मला संध्याकाळी जेवण मिळणार नाही अस मला वाटलं. नंतर तो long term म्हणतात तसा विचार केला तर घरातून बाहेर घालवणारा आघात पण होवू शकतो. मी सरळ जावून ताईला सगळ सांगणार होतो पण थोडी कूटनीती ते काय असते ना करूया असा विचार आला.
सगळेच बोधामृताचे धडे आयुष्य घडवण्यासाठी नसतात काही आयुष्य सुंदर बनवितात. आणि मैत्री शिवाय सुंदर गोष्ट नाही. मैत्री आयुष्यभर पुरते !!
आता हा blog वाचल्यावर माझे सगळे मित्र माझ्यावर धावून येणार. म्हणजे आम्ही तुझ्यासाठी मैत्रीच्या व्याख्येमधे बसत नाही का? आणि फक्त मैत्रिणीवर तुला लिहिता येत !! पण खुलासा आधीच केलेला बरा. मित्रांनो, तुमच्याशी झालेली मैत्री ठरवून केली नाही. अगदी तुम्हाला पण कळल नाही कि आपण कधी मित्र झालो आणि तेही इतके जवळचे !!असो मूळ गोष्ट मैत्रिणीची आहे. त्यामुळे तिकडे वळू या.
मला सगळे तपशील देता येतील याची शाश्वती नाही. हि गोष्ट माझ्या college च्या वेळेची. मुलींशी मैत्री हा माझ्यासाठी "तेव्हा" कठीण विषय होता. मला जमले पण नाही आणि मी वेळ घालवला पण नाही . असली मजल मित्रांनी पण कधी मारली नाही तेव्हा आमचा द्रुष्टी"कोन " एकच होता.
शमा साहनी !! नाव आज पण लक्ख आठवत. तसं सगळच आठवत पण कथा ह्या एका गोष्टीचीच होऊ शकते. थोडीशी modern, खडूस, दिसायला smart पण नुसत्या रंगांच्या नाही तर ढंगाच्या जोरावर मनाला भिडणार व्यक्तिमत्व !! आमची मजल कधी बोलण्या पर्यंत गेलीच नाही आणि आम्ही इतके प्रसिद्ध नव्हतो कि स्वताहून कोणी बोलायला येइल. आमच्या ख्यातीच्या गप्पा इथे नकोच मुळी.
शमा आणि माझी गाठ parking मध्ये पडली. तिच्या गाडीवर बसून ( ती तिथे नसतांना) आम्ही टिंगल टवाळी करत होतो. तिच्या अचानक तिथे येण्याने आम्ही शांत झालो आणि तिने आमच्यावर काहीतरी joke केला. आमच्यातले तेज जागृत व्हायला तेवढ पुरेस होत. मग ठरलं कि आता या कन्येला थोड seriously घ्यायचं. त्या नंतर तिच्या घराचा पत्ता, येण्याच्या-बाहेर पडण्याच्या वेळा, यांची तपशीलवार माहिती गोळा करण्यात आली. तिचा पाठलाग करण्याचे plan आखण्यात आलेत. अश्याच एका महत्वाच्या मोहिमेची तयारी करतांना माझे आणि माझ्या परम मित्राचे बोलणे माझ्या "आजीने" ऐकले. आजी म्हणजे- बहिण. पण असले विषय असले कि आणि माझ्यावर लक्ष ठेवणे हा मुद्दा असेल तर मी तिला आजी म्हणणे पसंत करतो.
आम्ही code words मधेच बोलत होतो. जहाज, सावज, पाठलाग, मोहीम, मुहूर्त वगैरे वगैरे. पण समवयस्क असल्यामुळे आणि माझी सगळी जवाबदारी तिच्यावर सोडून आई बाबा office ला जात असल्यामुळे तिला हे सगळ कळायला जास्त वेळ लागला नाही. पुन्हा घरात आल्यावर मी अगदी निष्पाप मनाने माझी कामं करायला लागलो. बराच वेळ मला धास्ती होती कि तो विषय निघेल पण तसे झाले नाही. संध्याकाळी मी terrace वर गेलो तेव्हा ती चोरपावलांनी मागे आली. आता हा विषय निघणार आणि सगळा अहवाल जेवणाआधीच आई-बाबांपर्यंत पोहोचणार. मला संध्याकाळी जेवण मिळणार नाही अस मला वाटलं. नंतर तो long term म्हणतात तसा विचार केला तर घरातून बाहेर घालवणारा आघात पण होवू शकतो. मी सरळ जावून ताईला सगळ सांगणार होतो पण थोडी कूटनीती ते काय असते ना करूया असा विचार आला.
"तू दुपारी मित्राशी काय बोलत होतास ?"
"काही नाही. असेच college चे विषय होते."
"काय सावज?मोहिम?"
मी खिंडीत तर सापडलोच होतोच पण रस्ता अरूंद आणि निसरडा होत चालला होता.
ताईने आत्मविश्वासाने पुढला आरोप केला.
"पोरीचा विषय वाटतोय."
मी अजुनही पळवाटा शोधत होतो. मी काहि उत्तर देणार त्याआधीच दुसरा प्रश्नाचा वाग्बाण भात्यातून निघाला होता. शरपंजरीवर किती बाणांवर निद्रीस्त व्हायच हाच विकल्प माझ्यासमोर होता. माझ्या मनात असेच जडत्वाचे विचार येत होते.
तू काय केलेस माहित नाही. मी तुला याबद्दल दोष पण देणार नाही. या वयात अस वाटण स्वाभाविक आहे. पण हे प्रेम आहे की नुसत attraction ? की फक्त एखादी शर्यत किंवा अजुन काही. याला काही अंत आहे आहे का? एकदा मैत्री म्हणून जे छान नात असत तुही try कर. सगळीकडे फक्त एकच ध्येय नको.
पटवून पटवून किती पटवशिल?- १,२,३.....मैत्री मधे असे बंधन नाही. तुटण्याची भीती नाही. Impression मारायची गरज नाही. छान स्वच्छ निष्पाप मैत्री !!!

हा असला विचार माझ्यासाठी नवा होता. पचायला पण कठीण होता. मी अवाक झालो होतो.
काही दिवसांनी college चा एक समारंभात निवेदक म्हणून माझी निवड झाली आणि मुलींकडून शमा होती. तिला तो पार्किंग मधला प्रसंग आठवला नाही पण माझ्या मनात त्या प्रसंगाच सावट अजूनही होत. कार्यक्रमाची तयारी नीट झाली, आमचं coordination पण छान होत. सगळ्यांनी त्याच कौतुक केल. मी जरा सांभाळून बोलत होतो आणि मी वागण्यात कधीच तिला impress करण्याचा प्रयत्न केला नाही. मग college च्या गप्पा, छंद, घराच्या गोष्टी बरच काही share केल. त्यातलं सारख आणि वेगळ यावर चर्चा झाल्यात. भेटी वाढल्या आणि जवळीक वाढली. सोबतचे सगळे चिडवायला लागले पण माझ्यावर त्याचा फरक पडला नाही. अशीच एक अफवा तिच्या कानावर आली आणि मग ती खूप चिडली. पण जेव्हा मी तिला पटवून दिले कि मी फक्त तुझ्याकडे मैत्रीण म्हणून बघतोय आणि बघणार मग तिला पटले. आमची मैत्री फुलली आणि दिवसागणिक बहरली.
मग नंतर एकदा शमा मला भेटायला घरी आली होती तेव्हा ताईने सहज विचारल प्रगती काय पूढे? मी तिला सांगितलं हो आहे ना ! आम्ही खूप चांगले मित्र आहोत. ती माझी शुद्ध मैत्रीण आहे ! पहिली मैत्रीण ! Thanks ताई. तु चार खडे बोल सुनावले म्हणून मी खूप वेगळा विचार केला. यानंतर कुठली पण छान मैत्री फुलली कि मी ताईला फोन करून सांगतो. त्यावेळी जर ताई मैत्रीण होवून वागली असती तर मला या विषयात मदत केली असती. पुढली story ने कुठले वळण घेतले असते माहित नाही. पण ताईने वेगळा पर्याय सुचवला. त्याने माझा द्रुष्टीकोन बदलला.
सगळेच बोधामृताचे धडे आयुष्य घडवण्यासाठी नसतात काही आयुष्य सुंदर बनवितात. आणि मैत्री शिवाय सुंदर गोष्ट नाही. मैत्री आयुष्यभर पुरते !!
(ताईने दिलेला "डोस" आणि एक शुद्ध मैत्री(ण ) हे खर आहे बाकी संदर्भ नावासहित जुळवले आहेत. शोध घेवू नका. आताच्या ढीगभर मैत्रिणींमध्ये मधून शोधता येणार नाही.)
अमित जहागिरदार
२७-०६-२०१५
मुंबई -पुणे प्रगती एक्सप्रेस्
ता क - माझ्या बायकोला हि गोष्ट अजून detail मध्ये माहित आहे म्हणून तिला काही विचारू नये !!

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा