तेरा साथ है तो ….
शामलचा फोन आला जेव्हा आवेश meeting मध्ये होतो आणि मोठ्या तावातावाने काहीतरी बोलत होता. पण शामलचा फोन बऱ्याच दिवसांनी आला त्यामुळे त्याला घ्यावा लागला.
"तुला भेटायचं होत . संध्याकाळी office सुटल्यावर येते !"
"अग माझी meeting चालू होती आणि मी माझ वाक्य सुद्धा अर्धवट सोडून आलो. सगळ्यांना वाटत कि बायकोला हा इतका घाबरतो आणि बघतो तर तुझा फोन " आवेश जरा चिडून बोलला
"जावू दे रे ! मैत्रिणीचा फोन घेतला तर इतका काय चिडतो ? आणि तशी पण मी तुला जवळ पास ३-४ आठवड्यांनी फोन करतेय"
"काम काय आहे ते सांगा madam !"
"ते संध्याकाळी बोलू ना यार !!"
"आता फोन ठेव आणि हो ऑफिस मधल्या वेळेतच ये ग बाई !!"
"बर साहेब "
शामलची त्याला तशी बऱ्याच दिवसांनी भेटणार होती. आवेश आणि शामल एकाच college मधले. काही common मित्रांच्या ओळखीने त्यांची भेट झाली होती. अभ्यासाचे विषय वेगळे, college च्या वेळा वेगळ्या आणि दोघांमध्ये हुशार कोण याची परीक्षा नसल्यामुळे ते बऱ्याच गप्पा मारायचेत . डिग्रीचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर आवेश पुण्याला नोकरीसाठी आला. शामल काही महिन्यांनी नोकरी शोधण्यासाठी आली आणि पुन्हा भेटी होऊ लागल्या. काही वर्षात तीच लग्न झाल पण नशिबाने तिचा नवरा पुण्याचाच होता. त्यांच्या भेटींची frequency कमी झाली पण mail ने काही न काही तरी संवाद व्हायचा.
संध्याकाळी शामल आली तेव्हा ती दोघे जवळच्या एका coffee shop मध्ये गेले . गप्पांचा फड रंगणार कि लग्न झालेली मैत्रीण तिच्या संसारातल्या अडचणी सांगणार कि सासू चे गाऱ्हाणे सांगणार ? पण इतक्या दिवसांनी भेटणार असल्यामुळे काही तरी serious असणार असा विचार आवेश ने केला .
शामल आली आणि बोलत सुटली. तिच्या बोलण्याच्या छंदापायी कधी कधी वाटत कि शामल ला जर limited talktime मिळाला असेल बोलण्याचा तर हा तिचा तिसरा lifetime recharge असेल.
office चे तीन चार विषय चघळून झाल्यावर तिला आवेश ने आठवण करून दिली कि काही तरी महत्वाच बोलाण्यासाठी ती आलीय.
" तुला आठवत का आपण लास्ट टाईम कुठल्या नाटकाला गेलो होतो? किंवा एखादा गाण्याचा program ??
सांगलीला असतांना किती enjoy करायचो ना आपण . नाटक काय, गाण्याचेप्रोग्राम काय, कवितांच्या मैफिली काय ? नुसती धम्माल. लग्नानंतर एकदा गेलो तर माझा नवरा तर आलाच नव्हता आणि तुझ्या बायकोने एका गाण्यामध्ये १०० रुपये याप्रमाणे तुझ्याकडून २३०० रुपयांची shopping करून घेतली .
हे अगदी खर होत त्यामुळे आवेश पण थोडा ओशाळल्या सारखा झाला. आवेशच्या बायकोला संगीताचा गंध नाही. मग तिने हा असा सौदा केला होता. पण आवेश ला या विषयावर बोलायचे नव्हते.
"बर हा विषय आहे का आपल्या भेटीचा?? "
"नाही रे !! कधी कधी वाटत किती सोप्प असत ना सगळ ?? माझ्या नवऱ्याला यातलं काहीच आवडत नाही म्हणून तो माझ्या सोबत कधीच येत नाही. मी एकटी हे enjoy करू शकत नाही म्हणून मला जायलाच मिळत नाही . साथीदार म्हणून त्याची साथ फक्त संकटात नाही तर आपल्याला जे मनापासून आवडत ते करण्यात पण मिळावी ना. माझी हि अपेक्षा नाही कि त्याने माझ्या level ला येवून ते enjoy कराव पण कमीत कमी सोबत असावं. मला कविता आवडतात म्हणून एक कवितांच छान पुस्तक द्यावं, गाण्याच्या program चे तिकीट काढून छान रविवारचा बेत करावा पण नाही. "
आवेश मनातल्या मनात विचार करत होता कि आज बहुदा नवरा या विषयावर मोठ्ठ पुराण लिहिल्या जाणार. पण शेवटी ती बोलणार तरी कुणाकडे . असले विषय नातेवाईकांमध्ये काढता येत नाहीत. उगाच बोभाटा होतो. मैत्रिणी असल्या कथा kitty पार्टी मध्ये सौस ला लावून खातात त्यामुळे आवेशसारखा नुरुपद्रावी मित्र बरा नवऱ्याचे गाऱ्हाणे सांगायला. पण आज शामल जास्त जोमाने बोलत होती. तिच्या मनावरचा घाव तर जास्त खोल होता अथवा संसारातल्या नेहमीच्या घडणीचा घाव असावा . एकाच ठिकाणी वर्षोन वर्षे टोचणारी सुई एवढे वार कधी कधी एकाद्या चाकूच्या जखमे समोर जास्त वाटतात.
आवेशने गंभीर व्हायचं ठरवलं आणि तीच बोलण ऐकू लागला.
"तुझ्या नवऱ्याला माहित आहे तू इकडे आलीस ते ??"
"हो मग मी सांगून आलेय आणि कदाचित त्याला कल्पना पण असेन कि मी हेच बोलणार आहे!"
"अरे व्वा , म्हणजे आग already लागलीय आम्ही फक्त बंब घेवून जायचं !! शामल , तुला जे हवाय ते रास्त आहे नवऱ्याने तुझ्या सोबत यायला हव अगदी नाटकाला सुद्धा. मला मान्य आहे अग पण त्याला ते enjoy पण करता अल पाहिजे ना. त्याच मन त्या सगळ्या मध्ये गुंतलं पाहिजे ना."
"अरे पण माझ्या साठी आला तर काय बिघडत ?"
"शामल विषय त्याच्या आवडीचा आहे आहे त्याच्या वेळेचा नाही. आणि तुला आठवत असेल तो आला पण होता आपण दोघे एका कविता वाचनाच्या कार्यक्रमाला त्याला घेवून गेलो होतो. काहीही गंध नसतांना तो आला होता आणि त्याने पूर्ण वेळ तुला दिला होता
पण कार्यक्रम संपल्यानंतर तुला बोलला होता कि हा कदाचित शेवटचा प्रोग्राम असेल माझा. आणि घरी येतांना त्याने माझी खूप थट्टा पण केली होती .
"शामल, साहित्य हा त्याच्या आवडीचा विषय नाहीय हे तुला काबुल कराव लागेल पण त्यानंतर आपण एक दोन कार्यक्रम attend केलेत तो आपल्यासोबत आला नाही पण त्याने तुला कधी अडवलं पण नाही. हो पण आता तुझा हा हट्ट असेल कि त्याने याव आणि सोबत बसून स्वतावर अत्याचार करून घावे तर मग हा अन्याय आहे ना. आणि त्याने तुला कधी थांबवले नाही ना !!"
शामल शांत झाली होती तरी पण तिच्या मनातले विचारांचे वादळ शांत झाले नव्हते.
आवेशने मी उगाच तिला चिडवण्यासाठी बोलत होतो, " काय मग आज काल facebook ची profile कुठली ??
आणि हो आज च्या आपल्या coffee चे update नको हा टाकुस fb वर. मला घरी explaination द्यावं लागत.
" काही पण ? मी तुझ्या बायको ला ओळखते. तिला सांग न मी आले होते भेटायला म्हणून. "
अग बाई अस काही करू नको. मी तिला सांगितलं नाहीय कि मी तुला भेटायला आलोय. "
खर तर आवेशाला स्पष्ट सांगितलं सांगायचं होत कि त्याच्या बायकोला शामलशी तिच्याशी अथवा कोणताही मैत्रिणीला भेटायला आवडत नाही. आवेशने विचार केला कि एक चांगली comparison पण सापडली.
"शामल, कधी अभयने तुला अडवलं का ग माझ्या शी भेटायला ?? मला आठवत कि लग्न झाल्यावर पहिल्यांदा तुम्ही दोघे माझ्याकडे आले होते. अभयने भरपूर गप्पा मारल्या होत्या अगदी मनमोकळ्या. त्याला काहीच प्रोब्लेम नव्हता या गोष्टी चा कि मी तुझा मित्र आहे. त्याला आपण कितीतरी गोष्टी सांगितल्या - आपण बघितलेले pictures , नाटकं, गाण्याचे प्रोग्राम्स, shopping…. पण कुठेही अभयच्या चेहऱ्यावरून वाटल नाही कि त्याला या कशात काही वावग वाटत होत."
"--"
"अग कधीतरी हा पण विचार करून बघ कि जर अभयला हे सगळ पटल नसत मग तू काय केल असत ?? लग्ननंतर त्याने जर मित्रांशी बोलण, त्यांच्या contact मध्ये राहू नकोस असले नियम केले असते तर तू काय केल असत. आणि direct त्याने नाही म्हटलं असत तर वेगळी गोष्ट पण मनातल्या मनात हे ठेवून तो फक्त तुला judge करत बसला असता तर तू काय केल असत. मी हे म्हणत नाहीय कि असा स्वभाव असणे हि चांगली गोष्ट आहे पण फक्त या कारणासाठी तुमचे releations बनायला वेळ लागला असता. अभय तसा नाहीय ही खूप चांगली गोष्ट आहे . तू त्याला सांगून मला भेटायला येवू शकते, माझ्यासोबत नाटकाला जावू शकते या गोष्टी कडे बघ. तो तुझ्या सोबत नाटकाला येत नाही हा प्रोब्लेम नाहीय."
"मी असा विचार कधी केला नाही "
"मला माझ्या बायकोला सांगता पण येत नाही कि मी आत्ता तुझ्या सोबत आहे. तिला संशय येईल फक्त हि भीती नाहीय पण ती अस्वस्थ होते तिला सगळ सांगाव लागत मग तिला थोडं हायस वाटत. याला प्रेम पण म्हणता येईल किंवा मला मिळणाऱ्या स्पेस बद्दल दु :ख पण करता येईल. मुख्य प्रश्न तिच्या comfort चा आहे. "
एक प्रकारे आवेशच पण मन मोकळ झाल. शामल शांत झाली होती. अभय सोबत येत नाही पण आपले छंद जोपासायचे स्वातंत्र त्याने आपल्याला दिलाय याची जाणीव तीला पहिल्यांदा झाली. आणि या एका गोष्टीसाठी अभय वाईट किंवा चुकीचा ठरत नाही. आवेश तर त्याला space मिळत नसताना सुद्धा कधी complaint करतांना दिसत नाही. ती विचारात गढून गेली आणि वाफाळलेली coffee त्यांनी cold coffee म्हणून घेतली.
बऱ्याचदा आपण फक्त याचा विचार करतो कि आपला जोडीदार कसा नाहीय ? तो अजून काय करू शकतो ज्याने आपल्याला छान वाटेल पण जिकडे आपण compare करतो त्या प्रांतांत कमी पडणारा आपला जोडीदार एकाद्या वेगळ्या प्रांतात मोठ्ठी मजल मारतो. फक्त आपल्याला कळत नाही. विश्वास ठेवावा लागतो आणि वेळ पण द्यावा लागतो. थोडीशी possesive वाटणारी बायको पण घरच्या जवाबदार्या आणि तिची नोकरी सांभाळते. आणि बरेच काहि. प्रश्न हा आहे कि बायकोवर अपेक्षांचं ओझ लादाव कि जे ओझ ती आधीच वाहतेय त्यात तिला मदत करावी ?? आपले छंद जोपासता येतात याचा आनंद मानावा कि त्यावेळी आपला जोडीदार सोबत असावा , मग अगदी त्याला ते आवडो अथवा न आवडो !! हट्ट कशाचा करावा हा प्रश्न आहे.
प्रश्न फक्त आवेश आणि शामलचा आहे का ???
अमित जहागीरदार
२६ जुलै २०१५
पुणे
( संपूर्ण काल्पनिक कथा )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा