कठिण आहे ! ठरवलं कधी आणि करतोय कधी . मागल्या वर्षी जेव्हा womans day चे posts वाचलेत आणि वाटलं कि आपण कुठलीतरी शेकडो वेळा सगळीकडे फिरलेली पोस्ट टाकण्यापेक्षा काहीतरी लिहावं. आणि ते लिहिणं म्हणजे नुसतं महिलांप्रति असलेला आदर किंवा त्याची होत असलेली कुचंबना दाखवणारं नको. त्यावर पोट भरणाऱ्या लेखकांचा उत्साह कशाला कमी करायचा. पण सांगायचं असेल तर हेच सांगावं कि किती अप्रतिम व्यक्तिमत्व आपल्याला भेटलेत आणि सामान्य वाटता वाटता त्यांचं अस्तित्व असामान्य कसं भासलं . अश्या असाधारण व्यक्ती प्रसिद्ध असल्याचं पाहिजे असेही नाही. फक्त त्यांचा तुमच्यावरचा प्रभाव महत्वाचा. कित्येकदा आपल्या जवळपास अशी एखादी "हिरकणी " असते !! शोध घ्यायचा तो आपण !
आता सुरुवात कुठल्या व्यक्ती पासून करू हाच प्रश्न आहे .
माई धर्माधिकारी
- मी माझ्या आत्याकडे राहायचो तेव्हा आत्याची सासू - माई आजी पण तिथे होत्या. त्यावेळी आत्याचा पुतण्या पण तिथे शिक्षणासाठी आला होता. आजीच्या आयुष्यवर खरंतर एक कादंबरी लिहू शकतो - कितीतरी लोकांना केलीली मदत, जमवलेली लग्न ( अगदी लग्नाच्या तयारी पासून संसार थाटून देई पर्यंत ), शिक्षणासाठी घरी राहिलेली मंडळी !! अशी फार मोठी यादी होईल. पण मला भावलेली गोष्ट फार वेगळी आहे. आत्याच्या घरासमोर एक बंगाली कुटुंब राहायचं ज्यांना कितीतरी दिवस हे माहित नव्हतं कि आत्याच्या सासरचा कोण माहेरचा कोण ? तमाम हिंदी picture मधले प्रसंग आठवले कि लक्षात येत कि कुणाच्या घरी राहिल की फार छळ होतो (?) पण असे कुठले हि अनुभव आले नाहीत. पण असा आगळा वेगळा परिवार फक्त बघायला नाही मिळाला तर त्यांच्या मनातील सामूहिक स्नेहात डुम्ब भिजणे अनुभवाला मिळाला. हा मायेचा ओढा जिथून उगम पावला त्या माई आजींना त्रिवार नमस्कार !!
मीना आत्या, वसुधा काकू आणि शुभांगी मामी
याच विषयाला धरून पुढे गेलो तर माझ्या शिक्षणाचे तीन महत्वाचे वर्ष मी आत्याकडे, काकांकडे आणि मामाकडे राहिलो . या तिन्ही वर्षांमध्ये अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकलो कारण या तिघींनी मला घरापासून दूर असल्याची जाणीव कधीच होऊ दिली नाही. उलटपक्षी मला घरीतरी कधी काम करावी लागायची पण या तिघींनी माझ्या अभ्यासाची काळजी घेतली आणि आज मी जे काही मिळवलं ते या तीन वर्षातल्या मेहनती मुळेच... गरम गरम पोळी असल्याशिवाय मला जेवण जायचे नाही ( college च्या mess मध्ये जाईपर्यंत ) हि सवय लागली आणि जोपासल्या गेली ती या तिघींमुळे . गोष्ट साधी आणि सोप्पी असते पण त्यामागची भावना महत्वाची असते .
आजी
माझ्या आईची आई - आजी हे एक वेगळं व्यक्तिमत्व. एखाद्या आजी सारखं प्रेम आणि लाड हि काही विशेष गोष्ट नाही. तिने केलेले अपार कष्ट आणि अति भीषण परिस्थितीशी दिलेला सामना हा बऱ्याच वेळी एक नव धाडस देऊन जातो. साठच्या दशकात तिने तीन मुलांची जवाबदारी नुसती पेलली नाही तर त्याकाळात नागपूरला एकटी राहून training घेऊन नोकरी केली. आजवर तिला कधी हि स्वतःच्या दुःखाचा पाढा वाचतांना ऐकले नाही. आयुष्याच्या शेगडीवर भाजलेले अनुभव कधी जास्त जळून त्यात कधी जळकेपणा जाणवला नाही. शिकायचं असेल तर एक मोठी अनुभवाची पेटी अथवा नुसती जाड पोथी - झोपण्या आधी वाचण्यासाठी. मी किती तरी गोष्टी तिच्या कडून ऐकल्या. लहानपणी फक्त गोष्टी म्हणून ऐकलेल्या कथांमधला अर्थ अनुभव आणि शिकवण कळायला बराच काळ आणि परिपक्वता हवी हे मात्र नक्की.
पहिली मैत्रीण
खरं तर तीच नाव लिहिता आलं असत तर वेगळी गोष्ट पण ती सध्या जिथे आहे तिथे तिचा केलेला उल्लेख रुचणार नाही. पण म्हणून तिचा अनुल्लेख चालणार नाही. मैत्रीची एक वेगळी व्याख्या तिने मला दिली आणि जागवली सुद्धा. मुलींकडे मैत्रिणीच्या नजरेने बघण्याची आणि त्या मैत्रीतला गोडवा काळाला तो फक्त तिच्यामुळे . मुलींचे विश्व आणि त्याच्यातली गुंतागुंत या पहिल्या मैत्रिणींमुळे कळली आणि आयुष्यभर ते शिक्षण कामी पडलं
गौरी रत्नपारखी
माझ्या मित्राची बहीण जी संपर्कात आली आणि एक विशेष व्यक्ती म्हणून भेटली. आलेल्या कठीण प्रसंगाला तोंड देण्याची तिची जद्द भल्या भल्या लोकांना थक्क करून जाते . optimism ची परिसीमा म्हणून मी नेहमीच तिच्या कडे बघतो. समस्या येतात आणि जातात सुद्धा हे इतक्या सहजपणे पटवणे फक्त तिलाच जमते.
सपना हंचाटे
कुठले बंध कसे जुळतात आणि कधी घट्ट होतात हे काळात नाही. सपना म्हणजे college मध्ये ओळख झालेली आणि पुण्यात नोकरी करणाऱ्या अनेक batchmates पैकी एक. ती वारंवार भेटायला लागली पण ओळख वाढण्यापलीकडे जास्त फरक पडला नाही, आज किती हि आठवायचा प्रयत्न केला तर आठवणार नाही कि त्या ओळखीचं रूपांतर एक सुंदर मैत्री मध्ये कस झालं. समोर आलेल्या प्रसंगामधले कितीतरी प्रसंग सोडवण्यासाठी अथवा त्यांना सामोरे जाण्यासाठी लागणार पाठबळ तिने अगदी सहज दिल. अरे अमित असाच असत बघ . इतका विचार नसतो करायचा असं म्हणून मी आणलेल्या समस्यांवर क्षणात तोडगा काढण्याची तिची पद्धत विलक्षण होती.
अंजु (ताई) /वीणा (ताई)/ सीमा (ताई ) जहागीरदार / पूजा देशपांडे
बहीण म्हणून अगदी बहिणींसारख्या, थोडी मैत्री पण !! तरी देखील सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिने दिलेला आधार आणि काही आयुष्यातले धडे. मला अभ्यासाची गोडी होतीच पण पद्धत शिकवली ती वीणाताई ने आणि मेहनत करण्याची जिद्द मिळाली ती सीमाताई मुळे. यांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत. आज पण कुठल्या गोष्टींमुळे मनावर ताण आला तर एकीशी जरी ५ मिनिटे बोललो तर आलेला मनाचा थकवा काही क्षणात जातो.
सीमाताई बद्दल एक गोष्ट नमूद करावीशी वाटते - (मुलीसोबतच्या) मैत्री अनुभवण्यासाठी वेळीच दिलेला सल्ला आजही मला पदोपदी आठवतो.
गौरी पांडे / नम्रता धर्माधिकारी
जेव्हा आपण फक्त मागल्या पिढीकडे बघत असतो तेव्हा पुढच्या पिढीमधल्या काही फुले अंगणात फुललेली असतात . आपल्या अंगा-खांद्यावर खेळलेल्या या मुली स्वतःच नव अस्तित्व आणि जग निर्माण करताहेत. यांच्याकडून शिकण्यासारखं खूप आहे आणि महत्वाचं म्हणजे त्याची संवाद साधण्याची कला. आजी असो वा ( मामा ( मी यांचा मामा! ) यांच्याकडे बोलायला विषयपण आणि उत्साह सुद्धा. हे गुण त्यांच्या वयातल्या मुलांकडे पण सापडत नाहीत. तुलना म्हणून नाही पण प्रगती म्हणजे खेळ अभ्यास यात मोजायची असते असं नाही. बोल्डनेस म्हणजे आधुनिक कपडे नाही पण विचार सुद्धा जे काळानुरुप प्रघल्प होतात.
अनुजा देशमुख
तिची ओळख अनुजा जहागीरदार अशी पण करता आली असती पण तिच्यातलं वेगळेपण तिथूनच चालू होत. सहचारिणी म्हणजे नुसती आपली सावली नसून एक भक्कम आधार आणि एक वेगळं अस्तित्व असते याची जाणीव होणं जास्त महत्वाचं . आमच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक वादळाचा सामना करण्यासाठी तिने दिलेल भरभक्कम पाठबळ यावर तर एखाद वेगळं पुस्तक लिहावं लागेल ते अनुभव हि विलक्षण होते आणि त्यामधून बाहेर पडण्याच्या वाट पण तितक्याच किचकट. या सगळ्यात नुसती सोबत नाही तर अंगात आलेलं किती तर बळ हे तिच्या धीराच्या आधारामुळे यायचं.
रेखा जहागीरदार
आई म्हणून ओळख करून दिली असती तर कुठल्याही आई प्रमाणे मुलांसाठी केलेले काबाडकष्ट यावर लिहावं लागेल. अर्थात हे सगळं ओघाने आलच. पण हे सगळे कष्ट ज्या परिस्थितीत घेतले आणि जे स्वप्न उराशी बाळगले ते फार निराळं होत. तरीपण नमूद करावीशी वाटते ती गोष्ट म्हणजे चेहऱ्यावरचे समाधान !! हि बाब माझ्या ध्यानात यायला वेळ लागला. पण मला हे माझ्या काही जवळच्या नातेवाईकांच्या बोलण्यातून प्रकर्षाने जाणवले कि सगळ्यात वेगळी गोष्ट हि आहे कि कुठल्याही परिस्थिती समाधानी राहण्याचा स्वभाव ! हि एक असामान्य गोष्ट आहे जी फक्त सवयीमुळे होत नाही तर त्यासाठी ते रक्तात असावी लागत. कित्येक वेळा तिच्या या स्वभावामुळे एखादा समोर उभा राहिलेला प्रश्न सोडवणे सोप्प होत.
अश्या काही विशेष व्यक्तिमत्वाची आज दखल घ्यावीशी वाटली ती फक्त woman 's day च्या निमित्ताने.
अगदी असच काही मोठं लिहिण्याची गरज पण नाही. पण अश्या ज्या कोणी great महिला/मुली असतील त्यांना phone करून थँक्स नक्कीच म्हणू शकता ( उगाच forwarded पोस्ट टाकण्यापेक्षा )
हैप्पी वूमन्स डे !!!!
अमित जहागीरदार
८ मार्च २०१७

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा