तो अजून लहान आहे !
खूप दिवसांनी चिंचवडच्या (जुन्या) घराकडे चक्कर मारली आणि तिथे घालवलेले दिवस आठवले. बऱ्याच वेळ आठवणींच्या जंगलात स्वैर फेरफटका मारल्यावर काही मजेशीर गोष्टी पण आठवल्या. हे हि आठवलं कि ते घर विकतांना काय काय गमती झाल्या होत्या.
आणि अचानक आठवले साने काका ! flat घेताना आलेल्या सर्व लोकांमधले हे special होते. फार चाललं व्यक्तिमत्व म्हणून नाही तर त्यांची एक गोष्ट मला नेहमी आठवते.
पहिलं म्हणजे ते कोल्हापुरचे होते म्हणून माझा त्यांच्यावर एकदम विश्वास बसला. कारण तीन वर्ष सांगली मध्ये राहून मला जे काही माणसं भेटलेत त्यासगळ्यां मध्ये कोल्हापूरच्या माणसांनी मनात नेहमीसाठी घर केलं. रांगड्या स्वभावाचे आणि राकट भाषेचे असले तरी मनाने स्वच्छ असतात. सरळ वागलात तर तुमच्यावर दुप्पट प्रेम करतील जीव लावतील पण वाकड्यात जाल तर चौपट हाल.
साने काका एक-दोन वेळा घर बघून गेलेत आणि त्यांना घर आवडलं असा निरोप त्यांनी ठेवला. माझी आणि त्यांची भेट व्हायला थोडा वेळ लागला पण पहिल्या भेटीत मला ते विश्वासाचे वाटले. पुण्यात नोकरीनिमित्त आलेल्या त्यांच्या मुलासाठी ते flat विकत घेत होते. त्यांचा मुलगा या सगळ्यात शांत बसून श्रवणभक्तीच करत होता. मला वाटलं काका सोबत आहेत आणि सगळं तेच बोलतात म्हणून ते चिरंजीव शांत असतील. एवढं विश्वासानं सगळं बोलत होते कि मला वाटलं काका आता flat घेणार. पितृपक्ष संपल्यावर व्यवहार करू अशी त्यांनी कल्पना दिली आणि मी मला आवडलेल्या flatच्या मालकाला तसा शब्द देऊन आलो.
साने काकांची गम्मत म्हणजे हि नाही कि त्यांनी मला अगदी शेवटी सांगितलं कि मला हा व्यवहार करायचा नाही तर हे सांगतांना जी कारण दिलीय ती मजेशीर होती.
तो flat मी २००४ मध्ये विकत घेतला होता . office मधले आह्मी ७-८ जण त्यावेळी फ्लॅट शोधात होतो. घरी फक्त कल्पना दिली होती कि आम्ही सगळे घर घेतोय. अकोल्यावरून कोणी येऊन यात मदत करेल अशी अपेक्षा नव्हती आणि आमच्या ७-८ जणांची जी team होती त्यात कुणाचेच पालक नव्हते. मला तर असली मदत कधीच मिळाली नाही असे म्हणू शकतो . अमरावतीमध्ये नातेवाईकांकडे होतो म्हणून मदतीची गरज भासली नाही आणि सांगली इतकं दूर होत कि तिथे कुणाची मदत मिळणे शक्य नव्हतं .
एखादा फ्लॅट select केला कि मी लोकल गार्डीयन म्हणून काकांना सांगायचो पण decision घेण्याच्या प्रक्रियेमध्ये सल्ला देण्याचं काम त्यांनी केलं. सगळं पटल्या नंतर आई बाबा येऊन बघून गेलेत पण सांगायचं मुद्दा हाच कि मी तो फ्लॅट घेतांना चा पूर्ण व्यवहार स्वतः केला. आता हे का सांगतोय ??
साने काका फ्लॅट आवडला आणि घेणार असे म्हणून कोल्हापूरला गेलेत आणि मग त्याची एक एक सबबी चालू झाल्यात. कुणी आजारी मग कुणी पाहुणे आलेले. शाश्वती म्हणून मला फक्त एक token amount हवी होती बाकी काहीच नाही. त्यामुळे मला पुढचा व्यवहार करणं जमलं असत. मी मग माझ्या एका कोल्हापूरच्या मित्राला सांगितलं कि काका reachable नाहीत तर त्या पठ्ठ्याने काकाच्या घराचा पत्ता हुडकून त्यांच्याकडे एक चक्कर पण मारली. (मी सांगितलं होत ना कोल्हापूरचे लोक चांगले असतात म्हणून!!).
शेवटी मी वैतागून काकांना एक पर्याय सुचवलं कि तुमचा मुलगा चिंचवडलाच राहतो तर त्याला एक cheque घेऊन पाठवा. काका मोठ्या दिमाखात म्हणाले कि त्याला जमणार नाही तो अजून लहान आहे. २६ वर्षाचा तो मुलगा साने काकांना लहान वाटत होता इतका लहान कि तो एक cheque पण हाताळु शकत नाही.ऑफिस मधून ८-९ वाजता येतो तेव्हा थकलेला असतो हे पण त्यात काकांनी सांगितलं. तो तेव्हा आमच्या घरापासून फक्त ५ मिनिटांच्या अंतरावर राहत असे. IT कंपनीत काम करणारा इतका कसा थकतो हा मला पडलेला प्रश्न मी साने काकांना विचारला नाही .मग मला कळलं की काका आता पलटणार आहेत. मी त्यांच्या पिच्छा सोडला आणि मोर्चा दुसरीकडे वळवला.
अजूनही काकांच्या त्या किस्स्यांची आठवण येते आणि हसू येत. पण प्रकरण हसण्यावर नेण्याचं नाहीय. शिक्षण, नोकरी लग्न या असल्या टप्प्यांमध्ये येणाऱ्या जवाबदाऱ्या स्वतः पेलण्याची ताकद आणावी लागते आणि हे काम दोघांचं असत. खुद्द जवाबदारी पेलणाऱ्याच आणि त्याच्या पालकांचं. ऑफिस मधलं काम भलेही तुम्ही करत असत पण बाकीच्या जवाबदाऱ्यांपासून पाळता येणं शक्य नाही. आई बाबा सगळीकडे पुरत नाहीत.
हि गोष्ट आठवतांना माझ्या सोबत BE ला असलेला एक मुलगा पण नेहमी आठवतो. त्याच्या वडिलांनी त्याच्या जवळ ३-४ पोस्टकार्ड ठेवले होते- अगदी घराचा पत्ता लिहून. हा आमचा मित्र त्यांच्याकडची कुठलिही वस्तू ( साबण. तेल, इत्यादी) संपले कि तसे लिहून पाठवायचा आणि ते पत्र post करायचा. पत्र मिळाले कि त्याचे वडील शनिवार किंवा रविवारी आमच्या hostel वर येवून त्यासगळ्या वस्तू त्याला सुपूर्त करायचे. हा असला प्रकार इंजिनीरिंगच्या तिन्ही वर्ष चालला होता. तसा विचार केला तर काळजी किंवा प्रेम म्हणता येईल पण त्याचा अतिरेक झाला होता हे नक्की.
या दोन्ही गोष्टींमध्ये चूक कुणाची आहे हे महत्वाचं नाही तर त्याचे काय परिणाम काय होतात याच भान दोघांनाही नसत. मुलांना सांभाळायचा असत पण किती आणि कधी पर्यंत ? साने काका काय आणि या मित्राचे वडील दोघेही हे विसरतात कि असल्या सांभाळ्याने मुले मोठी न होता मानसिक द्रुष्ट्या एकाद्या लहान मुला एवढेच राहतात. आयुष्याच्या पुढल्या वळणावर येणाच्या अडचणींची झुंज देताना हि असली मुले फार एकाकी पडतात. आपण निर्णय घेऊ शकत नाहीत याच फार मोठं दडपण त्यांना जाणवत पण खूप उशीर झाला असतो.
सांगायची गोष्ट हीच कि जपणं आणि जगायला शिकवणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. कुठे तरी वाचल्याचं आठवत कि मोठ्या झाडाखाली झुडुपं देखील वाढत नाही, ऊन आणि पाऊस झेलल्याशिवाय झाड मोठं होत नाही !!
अमित जहागीरदार
२९ मार्च २०१८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा