काल एका मित्राचा फोन आला होता. त्याने त्याच्या एका नातेवाईकाला कसे Tit For Tat केले याच रसभरीत वर्णन तो देत होता. बरेच दिवसांनी हा विषय निघाला होता आणि मला एक श्रोता सापडला होता .. माझा जगावेगळा फंडा सांगायला.
आपण "जसाश तसे" म्हणतो खरे पण हे सगळी कडे करता येत नाही. हा म्हणजे कुणी आपली खोडी केली, आपल्याला दुखावलं तर आपण तसाच पलटवार करायचा. हे करण तसं सोपंच ना. म्हणजे वाईट वागण म्हणजे फक्त नक्कल करणे. आणि मुळात वाईट गोष्टींची नक्कल आपण लहानपणा पासून लवकर करत आलोय. त्यामुळे समोरचा जस वागतोय त्याला उत्तर देण तितकंसं कठीण नाही.
पण खरी पंचाईत तेव्हा होते जेव्हा समोरची व्यक्ती चांगली वागते. आपण कितीही ठरवले तरी ठरवून चांगले वागणे तेवढे सोप्प नाही. त्यासाठी मुळातच चांगल असावं लागत. पण वाईट वागायला अस काही बंधन नाही. पटत नसेल तर एक सोप्प उदाहरण बघा - आई .. ती किती चांगली वागले आपल्याशी पण तीच्या सारख आपण नाही ना वागू शकत. छोट्या छोट्या गोष्टींची इतकी काळजी घेण जमेल का आपल्याला ??
अगदी मनापासून करायचं ठरवलं तरी पण जमणार नाही. तसच कुणी दुसरी व्यक्ती छान वागली की आपल्याला ते रिफ्लेक्ट करता आलं पाहिजे. करण्यासाठी आपल्या मनाचा आरसा स्वच्ह असायला हवा. म्हणजे आता अस बघा ना एखादा सरकारी ऑफिस मधला अथवा बँकेतला कर्मचारी , बसचा कॅन्दाक्तर किंवा तत्सम पंथातले लोक ( लोकायुक्ताच्या कक्षेतले ) जर छान वागले तर एकदम धक्काच .बसतो आणि तोंडातून Thank you सुद्धा निघत नाही. तो अपेक्षाभंगच एवढा मोठ्ठा असतो.
परवा एका बँकेत गेलो तर घड्याळाचा काटा पाच वर गेला होता तेह्वा मनाची तयारी केली होती की काम तर होणार नाही पण एक-दोन मिनिटे थांबू या असे वाटले. नंतर तो अधिकारी आला आणि भिंतीवरचे अथवा हातातले घड्याळ न बघता त्याने माझे ऐकून घेतले आणि मला सांगितले कि पुढे काय करायचे. तो धक्का इतका मोठा होता कि मला माझे काम झाल्यासारखे वाटले. बाहेर जावून गाडी स्टार्ट करतांना आठवलं मी त्याचे धन्यवाद सुद्धा मानले नाहीत. पण त्यापेक्षा सगळे सरकारी कर्मचारी एक सारखे असतात हा समज ( कि गैरसमज ) मनातून काढणे हे त्याला धन्यवाद म्हणण्या सारखेच ना !
मतितार्थ हाच की कुणाशी चांगल वागण हे आपल्यावर अवलंबून असत, कुणी तरी चांगला वागला म्हणून आपण तसाच वागू शकत नाही. कुणाला रिफ्लेक्ट कारण तितकस सोप्प नाही. काही आरसे प्रतिबिंब उंच दाखवतात काही त्याला जाड दाखवतात पण स्वच्छ आरसा हा सुंदर प्रतिमा रेखाटतो. म्हणूनच प्रत्येकाला आपण आरश्यात सुंदर दिसतो. कारण आरसा फक्त मनातले विचार दाखवतो.
म्हणजे काय तर, जर आपण कुणाच चांगल वागण रिफ्लेक्ट करू शकत नाही तर मग वाईट वागण्यावर कशाला प्रतिक्रिया द्यायची. दुसऱ्या कुणाला त्या व्यक्तीच्या वागण्याचे नाही तर तुमच्या वागण्याचे आश्यर्य वाटेल.
तर मग Tit For Tat तेह्वाच करा जेह्वा आपण एखाद्या चागल्या गोष्टीची पण नक्कल करू शकू आणि ती पण मनापासून !!
आणि मग वाईट गोष्टींसाठी पण Tit For Tat नका करू ... आपण आहोत तसेच वागू या आणि या पेक्षा छान होण्याचा प्रयत्न करू या...
अमित जहागीरदार
पुणे ८ ऑगस्ट २०११
TIT for TAT var chan chintan kele aahe...
उत्तर द्याहटवाChanglya goshtincha TIT for TAT karayache.. wa wa chan concept aahe...