रविवार, ८ मे, २०१६

कणखर मना

कणखर मना 

अगदी पक्क झालंय आता. माझा अंदाज इतका चुकायचा नाही. रुचिताच ती ! आमच्या शाळेत होती. एकदम हुशार, प्रत्येक कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये भाग घेणारी अशी चुणचुणीत मुलगी.  इतक्या  वर्षानंतर ती मला भेटली होती पण ती इथे कशी याचा विचार आला कारण घरावर वेगळ्याच नावाची पाटी होती.

मी ज्यांच्याकडे मागल्या आठवड्यातच राहायला आलो होतो,  त्या काकूंकडे चौकशी केली आणि कळले कि रुचिता लग्न करून समोरच्या परांजपे कुटुंबात काही महिन्यांपूर्वी दाखल झाली होती. सकाळच्या धामधुमीत जाण्यापेक्षा संध्याकाळी भेटावे असा विचार करून मी बाहेर पडलो. पण दिवसभर मला तिच्याच गोष्टी आठवत होत्या. तिचा अभ्यासातल्या प्रगतीचा आलेख, भाषणातला आवेग आणि वाद-विवाद स्पर्धान्माधला आवेश सगळाच. शाळेत मस्त्या करतांना पकडल्यावर कित्याकदा तिच्या प्रगतीचे दाखले देवून आमचा सत्कार व्हायचा- घरी सुद्धा !!

कामाच्या व्यापात संध्याकाळ झाली.  घरी येवून कधी तिला भेटतो असे झाले होते. शाळेच्या मित्र मैत्रिणींना भेटायची मजा  काही और असते. आपल वय काहीही असो पण शाळेतले विषय निघाले कि अगदी लहान झाल्यासारखं वाटत.

रुचिताच्या घरी गेल्यावर तिच्या सासऱ्यांनी दार उघडल चौकशी केली आणि रुचिताचा वर्गमित्र म्हणून बाकीच्यांशी ओळख करून दिली. माझा अंदाज चुकला होता , ती आणि तिचा नवरा बाहेर गेले होते. १०-१५ मिनिटात येतील असा कयास करून माझ्यासाठी चहा करण्यात आला. तिच्या सासरच्या मंडळींनी तीच खूप कौतुक केल. शाळेतल्या तिच्या पराक्रमाचे मी पण पाढे वाचलेत. अस बघायला मिळत नाही कि मुलीच्या पात्रतेची दाखल तिच्या सासरचे पण घेतात !!

माझा हा विचार कोता आहे हे मी ठरवण्याच्या आताच तो दोघे आलीत. रुचिता  मला बघून गोंधळून गेली कारण तिला लक्षात राहावे असले marks  मला कधी पडले नव्हते. मग मी तिला ओळख दिली आणि ती एकदम फुलली. शाळेच्या गप्पा झाल्यात, शिक्षकांची विचारपूस, घरच्यांचे हालहवाल सगळे झालेत. तिचा नवरा अनिकेत जास्त बोलत नव्हता, कदाचित थकला असेल !! पण आमच्या गप्पा चालूच होत्या.  अनिकेतच्या आईने आग्रह केला तर मला जेवणाचे निमंत्रण नाकारता आले  नाही. जितकी हुशार अभ्यासात तितकीच ती घर manage करण्यात तरबेज होती हे मला कळायला जास्त वेळ नाही लागला. एकंदरीत सगळा व्याप तिने सांभाळला होता. नोकरी करून हे सगळ ती सांभाळायची याच कौतुक माझ्या पेक्षा तिच्या घरच्यांना होत हीच मोठ्ठी गोष्ट !!

अनिकेत मात्र शांत होता मला त्याचा स्वभाव काळात नव्हता. बायकोचा मित्र म्हणून मला चाचपून बघतोय का असा संशय येत नव्हता. पण मी त्याला जास्त seriously घ्यायचं नाही अस ठरवलं. तसही मैत्रिणीच्या नवऱ्याच व्यक्तिमत्व खूप जास्त छाप पाडू शकत नसत !!
जेवण झाल, निरोप झालेत, रुचीताच्या सासू आणि सासऱ्याने पुन्हा येण्याच आमंत्रण दिलं. फाटका  जवळच्या गप्पा पण झाल्यात, रुचिता म्हणाली कि तुला भेटून शाळेतले दिवस आठवले आणि मी अगदी लहान झाले. मी तिला पुन्हा चिडवले कि ते आठवून आम्हाला वाटत कि आमचे काय हाल होत होते तुझ्या प्रगतीपुस्ताकामुळे !! एकदम प्रफुल्लीत झालेला तिचा चेहरा पडला पण मला कळायच्या आत तिने विषय बदलला.

मग येण  वाढल, गप्पा वाढल्या, रुचिता कळली, तिचे प्रोब्लेम्स कळलेत. अनिकेत हा एक परावलंबी माणूस आहे हे कळल. फक्त ऑफिस  मध्ये जावून पगार आणतो कारण शिकलाय ! बाकी व्यवहार नाही कि शिष्टाचार नाही काही काही त्याला जमत नाही. आधी आईच्या म्हणण्यानुसार सगळ करायचा आता बायकोच्या फक्त त्याच्या घरच्यांना तो बायकोच ऐकतो यावर आक्षेप नाही कारण त्याचा निभाव लागतोय हे समाधान !!
मी तिला विचारले," तू सहन कस करतेस ? सगळी काम तुझ्यावर पडतात."
ती म्हणाली, " काय करणार? त्याच्याशी बोलणार तरी काय ? त्याला विचार करायची सवयच नाहीय. त्याने पण कधी करून घेतली नाही . निभावलं ते निभल बाकीच माझ्या नशिबी !!"
"काही दिवसांपूर्वी माझ एक operation  झाल. तपशील देवू शकत नाही सगळे  पण एकच गोष्ट सांगते मला आधार देण्या ऐवजी हा स्वत: रडत बसला होता."
मी त्याला बोलले देखील कि -

"लग्न म्हणजे एखाद खेळणं नाहीय. आधी तीन चाकी मग दोन चाकी cycle घेण्यासारखं अगदी वयाला साजेस !!फक्त वडिलांची ऎपत आहे म्हणून तुला खूप गोंडस खेळण मिळेल अस नाहीय आणि मिळालं  तरी तुला त्याचं  जतन करायची जवाबदारी झटकता येणार नाही . .  जवाबदारी . . बाप रे काय कठीण आहे तुझ्यासाठी !!!
 एका समजूतदार व्यक्ती सोबत राहण्याचा हक्क आहे मला ! गळ्यात हार घातले ते कुठल्याची परिस्थितीत हार न मानण्यासाठी !! अस भेकडासारख रडण्या साठी नाही . .

हे सगळे बोलले रे मी पण …. पण त्यामुळे फक्त त्याची रडण्याची गती वाढली, maturity  नाही !!"


" काय कराव तेच कळतच  नाही ? स्व:ताच्या पायावर उभी राहिलेली मी असला अधू नवरा घेवून जगावं लागणार या विचाराने कोमुजून जाते. आणि शरीराने अधू असता तर खपून घेतलं असत रे पण मनाने  कमकुवत असलेल्याला किती आणि काय धीर देवू. मी खचले तर आमच घरच बुडून जाईन."

मला तिला समजावणे कठीण झाले होते. काहीच सुचत नव्हते, काही बोलायला जमत नव्हत ! काय सांगू तिला ? काही हि न बोलता निघून आलो.

थोड्या वेळात आईचा फोन आला कि कधी office  मधून आलास ?जेवलास का ? थकलास का ?? तब्येतीला जप हा !! मी तिला दिनक्रम सांगितला आणि म्हणालो कि इतकी काळजी नको करून. तू मला स्वावलंबी बनवलं आहेस.

"हो ते तर आहेच तुझ्या तब्येतीची काळजी वाटते मनाने तर तू आमच्यापेक्षा सक्षम आहेस, कणखर आहेस!!"

मी फक्त thanks  म्हणालो आणि फोन ठेवून रडू लागलो.

- अमित जहागीरदार
  ८ मे  २०१६
  Mother's  Day
 (काल्पनिक कथा आणि पात्र -  कथेशी, कुणाचाही संबंध नाहीय. असला तरी बोलून दाखवू नका !)

जवळची मैत्रीण

जवळची मैत्रीण

वेळ संध्याकाळची होती. आकाशात ढग दाटले होते पण सकाळी या असल्या वातावरणाची पुसटशी देखील कल्पना नव्हती. सकाळी स्वच्छ ऊन पडून एका दिवसाचा जन्म झाला होता पण दुपारी ढगांनी गर्दी करून अवेळी पावसाची वर्दी दिली होती. आवेश रोज च्या प्रमाणे office  मधून निघायची तयारी ७ वाजल्या पासून करत होता पण कामाच्या गर्दी मुळे त्याला निघायला उशीर होत होता. बाहेर पडे पर्यंत पावसाने  त्याचे स्वागत केल. घरी जायला गाडी असल्यामुळे पावसात भिजायला मिळणार नाही याच त्याला खरतर दु:ख वाटत होत. खरच किती कमाल असते - ज्या वेळी आवेश दुचाकीने फिरायचा तेव्हा पावसात भिजण्याचा कंटाळा यायचा आणि त्याला नेहमी वाटायचं कि चारीचाकी कधी घेईन  आणि या भिजण्यापासून  मुक्त होईन. पण आज अचानक त्याला आठवले कि पावसाचा स्पर्श किती दिवसाने झालाय . ज्याला आपण मोठे होणे म्हणतो ते कधी कधी आयुष्यातल्य छोट्या छोट्या  गोष्टी पासून आपल्याला खूप दूर नेत.

या विचारामधून बाहेर पाडण्यासाठी एक कारण म्हणून गाडीने काही तरी आवाज काढला. गाडीची काच खाली करून आवेश बाहेर बघू लागला. त्याच्या लक्षात आल  कि समोरचं चाक  पंक्चर झालाय !! म्हणजे आवेश ला आज पावसाचा आनंद जबरदस्ती घ्यावा लागणार !! बस stop च्या आडोशाला गाडी घेवून तो बाहेर निघाला पावसाचा जोर थोडा कमी झाला होता त्यामुळे भिजण्याची भीती नव्हती.

गाडीचे काम करता करता त्याच्या लक्षात आले कि bus stop वर एक सुंदर मुलगी उभी होती. पावसापासून स्वताला वाचवत होती आणि बसच्या प्रतिक्षेत असलेली ती अजून सुंदर दिसत होती. आवेश ने स्वताला सावरल आणि विचारातून बाहेर आला आणि गाडीच्या कामात लक्ष देवू लागला. पण त्याच्या मनात वेगळाच विचार आला. इतक्या पावसात आणि इतक्या उशिरा बिचारी एकटीच थांबली अहे.

गाडीचे काम करून त्याने एक कटाक्ष तिच्यावर टाकला. ती अजूनही भांबावलेली दिसत होती आणि थोडी चिंतातूर हि. आवेश ने थोडी  हिम्मत केली आणि तिला विचारले कि तुमची हरकत नसेल तर मी सोडून देतो.

एकदम अनोळखी माणसासोबत कस जायचं हा विचार तिच्यापण मनात येईल हे हेरून आवेश ने तिला कंपनीचे आइ कार्ड दाखवले आणि मोबाईल नंबर पण दिला . माझा फोटो काढून घराच्या कोणातरी पाठवून द्या हि कल्पना आपल्याला सुचली याच आवेशला कौतुक वाटलं. पण सुचेता ला हे सगळ ऐकून हसू येत होत. हो तीच नाव सुचेता होत . ती अवेशच्या गाडीत बसली आणि आपला फोन बंद झाल्यामुळे तिने आवेशाच्या मोबाईल  वरून नवऱ्याला  फोन केला. होय नवऱ्याला !!
आवेश थोडा हिरमुसला आणि मग त्याला आठवल कि आपण हि घरी फोन करून सांगाव कि निघालो म्हणून !!

काहीपण असो पावसात एक छान मुलगी आपल्या गाडीत बसली  आहे याचा त्याला उगाच अभिमान वाटत होता . नाव, गाव, पत्ते, कामच ठिकाण आणि स्वरूप याची देवाण  घेवाण झाली आणि ४० मिनिटांचा तो प्रवास संपला. सुचेताला तिच्या घराजवळ सोडून आवेश घरी आला. बायकोला सगळी हकीकत सांगितली सुचेता सहित ! फक्त ती गाडीत बसल्यावर झालेला आनंद सांगितला नाही पण त्याच्या बायकोने त्याला चिडवले कि लग्नानंतर तसाही तुला दुसऱ्या  कुणाला लिफ्ट देण्याची गरज पडली नाही.
आवेशने अवंतीला सगळ सांगितलं काही लपवल नाही.
सुचेता आणि आवेश आता नियमित पणे  भेटू लागले, कधी दुपारचे जेवण तरी कधी संध्याकाळची coffee !! कधी office  गप्पा तर कधी आवडीचे विषय छंद सगळे बोलून झाले मग घराच्या गोष्टी !! नवऱ्याबद्दल अगदी आदराने बोलणारी सुचेता हळू हळू त्याच्या स्वभावातले कंगोरे उघडपणे दर्शवू लागली. आवेश आणि सुचेता ला हि जाणीव जरूर होती कि आपण फार जवळ आलोय पण यात प्रेम वगैरे काही नव्हत म्हणजे आवेश तर त्यांच्या भेटीतल्या सगळ्या गोष्टी अवंती ला सांगत असे. त्यांनी कधी असले बंधन ठेवले नाही

सुचेताने मात्र कधी आवेश आणि त्याच्या सोबतच्या भेटींचे कुठलेच तपशील नवऱ्याला  सांगितले नाहीत.
बोलता बोलता  हि गोष्ट जेव्हा आवेशला कळली तर त्याने तिला विचारले सुद्धा तू त्याला काहीच का सांगितले नाही.
सुचेताने त्याला समजावले कि एका लग्न झालेल्या मुलीने दुसऱ्या कुणाशी केलेली मैत्री समजावून घेण्या इतके त्याचे मन मोठे नाही आणि त्यासाठी मी तुझ्या सोबत ची मैत्री सोडू शकत नव्हते. आपल्या मैत्रीत कसलीही अशुद्धता नव्हती म्हणून मी पण त्याला उगाच सांगण्याच्या आणि समजावण्याच्या चक्रात अडकले नाही.

ते बोलणे तसेच सोडून आवेश घरी आला, कामात गढून गेलेल्या अवंतीला मिठीत घेतले आणि म्हणाला कि, " सगळ्यात छान आणि जवळची मैत्रीण तर तू आहेस !!"

- अमित जहागीरदार
  ८ मे २०१६

शनिवार, १७ ऑक्टोबर, २०१५

प्रपोज करण्याचे प्रकार -भाग 6- चाचू मुझे पसीने क्यू आ रहे है

प्रपोज करण्याचे प्रकार -भाग 6- चाचू मुझे पसीने क्यू आ रहे है


एखाद्या ठिकाणी आपण वर्षोन वर्षे राहतो पण परत तिथे आलो कि वाटत कि ते दिवस किती वेगळे होते. आता माझ असाच झाल. अमरावतीतल्या त्या भागामध्ये मी २-३ वर्ष राहिलो तेव्हा वाटल कि ह्या आठवणी मनात साठवतोय पण या कधीच मनातून जायच्या नाहीत. पण आज जवळपास १० वर्षाने इथे आलो तेव्हा लक्षात आल कि फक्त काही गोष्टीच नेहमीसाठी मनाच्या कप्प्यात राहतात, बाकीच्या गोष्टी काळानुसार हवेत विरून जातात.
मी राहायचो तिथे एक भास्कर वतनदार राहायचे. त्यांचे घर अजून तिथेच आणि तसेच होते म्हणून मी त्यांच्याकडे जाण्याचे ठरवले. तसाही माझा जास्त वेळ मी माझ्या घरी आणि  त्यांच्या घरीच घालवायचो. कारण विभा ताई -त्यांची मुलगी ! ती माझ्यापेक्षा 3 वर्षाने मोठी होती. पण अभ्यासात  खूप हुशार होती आणि  जवळपासच्या मुलांना अभ्यासात थोडी गोडी यावी म्हणून classes घ्यायची. त्यामुळे मी पण तिला ताई म्हणायचो.  तिचे लग्न आमच्याच घरासमोर एक अधिकारी कुटुंब राहायचं त्यांच्या स्वानंदशी झालय.

मी सहज गेलो तर काय नशीब ! विभा आणि स्वानंद दोघेही आले होते. मग गप्पांच फड रंगला. पहिले मी विभाताई आणि काकाच होतो गप्पा मारत आणि मग  स्वानंदपण आला आमच्या मधे .

काका लगेच उठले आणि त्यांनी पंखा चालू केला -
जावई बाप्पुंना घाम येईन . असे म्हणून दोघे ही हसले. मी याच्या आधीपण काकांनी असा विनोद करतांना बघितलं होत. मी काकांना विचारलं सुद्धा हे पंख्याच काय प्रकरण आहे. तुह्मी स्वानंदला एक दोन वेळा पंख्यावरून आणि घामावरून चिडवले हे माझ्या लक्षात आहे. काका आणि  स्वानंदला बाहेर जायचं होत म्हणून ते गडबडीत निघालेत. विभाताई आणि मी बऱ्याच वेळ गप्पा मारत बसलो. माझी नोकरी, नव शहर यासगळ्या गोष्टी चर्चून झाल्यात पण मला अजूनही याच उत्तर मिळालं नाही कि ती पंख्याची आणि घामाची गोष्ट काय आहे. विभाताईने माझ्या चेहर्यावरून माझ्या मनातल्या प्रश्नांची कल्पना आली असावी.

विभाताई हसली आणि गोष्ट सांगू लागली
अधिकारी कुटुंब आपल्या भागात shift  झालेत, आमच्या घरच्यांशी ओळख झाली येण- जाण चालू झाल, परीचय वाढला मग कळल कि अधिकारी काका पत्रिका बघायचे आणि लग्न जुळवायचेत. त्यावेळी माझ लग्न करायचं अस चालल  होत. स्वानंदशी ओळख झाली होती पण माझ्यासाठी तो एक शेजारी होता पण आजकाल तो जास्त वेळा भेटत होता. माझ्यासाठी आलेल्या प्रत्येक "ठिकाणा" ची माहिती आली कि बाबा ती अधिकारी काकांकडे पाठवायची. काका ती माहिती आणि पत्रिका बऱ्याचदा स्वानंदच्या हातून पाठवायचे . मग एखादी माहिती पडताळण्यासाठी अधिकारी काका कधी कधी स्वानंदलाच पाठवायचे. प्रत्येक वेळी स्वानंद घरी यायचा तेव्हा घामाने लदबदलेला असायचा. स्वानंद घरात आल्याबरोबर पहिले पंखा लावावा लागायचा. आम्ही सगळे आतल्या खोलीमधून त्याची हि गम्मत बघायचो आणि हसायचो. एक दोनदा तर बाबा घरी नसल्यामुळे मी एकटीच त्याच्या बऱ्याच श्या प्रश्नांची उत्तरे द्यायची. एकदा मी त्याला विचारले पण कि अरे तुला इतका घाम का येतो ??
काही न बोलता घाम पुसत निघून जायचा.
 BSc नंतर मला पुढे शिकायचं होत . बाबांनी खुप आग्रह नव्हता धरला पण जमायला 1-2 वर्ष लागतात अस ग्रुहित धरून मी देखील होकार दिला. पण लगेच ठरू नये असे मनात पक्क केल होतं.  आलेल्या स्थळाला नकार देण्यासाठी मला काहीना काही कारण मिळायचं आणि मी प्रत्येक वेळी लग्नाला नकार द्यायची. 

मी सांगितलेल्या सगळ्या सबबी माझ्यावर एकदा उलटल्या. आता अधिकारी काकांनाही कळले होते कि मी कोणती proposal  नाकारते मग त्यांनी ती सगळी जुळवा जुळव करून एक अस स्थळ सुचवाल कि नाही म्हणायला scope  नाही.
सगळे तपशील स्वानंद ला सांगून काकांनी त्याला आमच्याकडे पाठवले. डिसेंबरचे दिवस होते आणि  कडाक्याची थंडी होती पण स्वानंद घरी आला तेव्हा घामाने न्हावून निघाला होता. मी आश्चर्य चकीत झाले होते घरात दुसर कोणीच नाहीय हे त्याला माहित नव्हत म्हणून तो बिचारा मला सगळ सांगू लागला कि हे स्थळ खूप चांगल आहे आणि पत्रिका पण जुळते. मी थोडी लाजली . स्वानंद घामाने माखला होता आणि मला काय करावे ते सुचत नव्हते त्याच्या बोलण्यामागे भीती पण होती की ह्या स्थळाला नकार देता येणार नाही असे अधिकारी काका म्हणत होते. 

मी सवयीने पंखा लावला आणि स्वानंदसाठी पाणी आणले. मला त्याला विचारायची इच्छा होती की तुला घाम का येतो रे पण आज तो जरा गंभीर दिसत होता. मी पण तो समोर बसलाय हे विसरून स्वतः शी बोलत बसले, "किती विचीत्र आहे.  नाही?  पत्रिका बघून, जुजबी माहिती पडताळून कुणाला सोबत आयुष्य घालवायच.  आणि या  process  वर विश्वास ठेवायचा कारण आपल्या आई-बाबा , आजी- आजोबा सगळ्यांनी हेच केल .
यात कुठेच प्रेम,  जिव्हाळा एकमेकांना ओळखणे ??  हे सगळ मिथ्थ्या वाटत. 
बोलता बोलता माझ्या लक्षात आल कि स्वानंद तिथेच शांतपणे सगळ ऐकत होता. आणि त्याचा घाम  देखील सुकला होता !!

तो म्हणाला कि कधी कधी प्रेम अगदी जवळपास असत पण आपल्याला दिसत नाही, जाणवत नाही.
तो म्हणाला कि कधी कधी प्रेम समोर असत पण आपल्याला दिसत नाही, कळत नाही. मी त्याच्या असल्या बोलण्याने अवाक् झाली होती. 
त्याने बहुदा माझा चेहरा वाचला हवा आणि बोलला कि आता हेच बघ ना तुझ्या लग्न आता जुळणारच असा बाबांना विश्वास असतो आणि तू मात्र काही ना काही  कारण काढते. मला जाम वैताग येतो पण वाटत एकदा मी हिंमत करेन आणि एकदा माझी पत्रिका पण जुळते का ते बघेन पण शब्द बाहेर येण राहिल बाजुला नुसता घामच येतो. 

मला हसू पण येतो होत आणि आश्चर्य याचं वाटत होत कि त्याने ते सगळ बोलुन पण दाखवल. मला impress व्हायला आणि थोडा लाजायला हे पुरेसे होत . तो तेवढ बोलून निघून गेला आणि मी बाबांची वाट बघत बसले. त्यांना कधी सांगते अस झालं होत मला.  पुढे सगळ्या गोष्टी जुळून आल्यात. आमच लग्न ठरलं आणि झाल देखील.

 पण अजूनही स्वानंद आला कि आम्ही त्याला घाम आणि पंख्यावरून चिडवतो.
अशी ती आगळी वेगळी गोष्ट विभा - स्वानंदची !!

१५ ऑक्टोबर २०१५

शनिवार, १० ऑक्टोबर, २०१५

प्रेमाची पहिली शिकवण


आज अचानक एक गोष्ट आठवली. साधारण तीन चार महिन्यांपूर्वी आमच एक गेट टुगेदर झाल होत. आमची  college ची मित्र मैत्रिणींची gang भेटली होती त्यावेळी college मध्ये कोणाला कोण आवडायचं याची यादी निघाली. विषय आवडीचा असल्यामुळे सगळ्यांनाच त्यात रस होता. कृतिकाचा नवरा जास्त लक्ष देवून ऐकत होता हे माझ्या लक्षात आल. मी त्याचा ताण हलका करण्यासाठी बोललो कि कृतिका कुठल्याच लिस्ट मध्ये नव्हती. ती पण उत्साहात बोलत होती कि माझ्या terror मुळे माझ्या मागे कधी कोणी लागल नाही. कृतिका पुढे म्हणाली कि मला हे प्रेम वगैरे जमल नाही पण समीर सोबत आहे म्हणून आमचा संसार चालू आहे.
बाकीच्या बऱ्याच गोष्टी झाल्यात पण मला तिचं ते वाक्य खूप बोचल. तिने प्रेम आणि संसार वेगळे ठेवलेत !!

आज हे सगळ आठवायच कारण अवनी . तिला नुकताच भेटून आलो आणि जवळपास दोन तास आणि चाळीस मिनिटे तिच्याशी वाद-संवाद झालेत. अवनी माझ्या एका मित्राची मुलगी. १७ -१८ वर्षाची पण माझी खास मैत्रीण. पहिल्या नोकरीच्या ठिकाणी अभय आणि माझी ओळख झाली. अभय पुण्याचा असला तरी घरी येण्याच आमंत्रण तो मनापासून देत असे आणि अश्याच त्याच्या एका आमंत्रणाला आम्ही नुकत्याच join झालेल्यांच्या group  ने मनावर घेतल. अभयने खूप छान बेत केला, नवीन office आणि नवीन शहर असल्यामुळे आम्हाला घरी असल्यासारखं वाटलं. त्यावेळी आमची ओळख एका छोट्या परिशी झाली - अवनी. अभय आणि वासंती ची मुलगी. तेव्हा अवनी ४-५ वर्षाची असेन. पण आमच्या मध्ये ती लगेच रुळली. माझ्याशी तिची खास गट्टी जमली. मग अभयकडे वरचेवर जाणं वाढल. अवनीला माझा लळा लागायला तेवढ पुरस होत. 
अवनीचा वाढदिवस असो वा त्याच्याकडचे कुठलेही function असो मी अभयच्या घरचा permanent सदस्य झालो. माझ्या shopping च्या लिस्ट मध्ये अवनी साठी काही ना  काही वस्तू असायची. माझ्या लग्नाच्या वेळी बायको आणि तिचे घराचे रडत असतांना आमच्याकडून अवनीने भोकाड पसरलं होत. तिला कोणीतरी सांगितलं कि आता काका तुझ्याकडे लक्ष देणार नाही आणि फक्त काकुचेच लाड करणार. अवनीला समजावणे कठीण झाले. अशी माझी आणि अवनीची मैत्री.

कुठल्याहि गोष्टीसाठी पहिले माझ्याकडे हट्ट  करणारी, सगळ पहिले मला सांगणारी आणि माझं ऐकणारी अवनी. अभय आणि वासंती वाहिनीने कधी यावर आक्षेप घेतला नाही कि अवनी माझ्याशी सगळ share  करते. फक्त कधी कधी त्यांची मत विचारात घेण्याची ताकीद मिळायची आम्हाला. तिचे छंद, शाळेच्या सहली, आवडी जपण्यासाठी तिला लागणारी मदत आणि घरच्यांकडून अपेक्षित स्वतंत्र ती माझ्या जोरावर मिळवायची.  पण आता थोडी मोठी झाली होती. तिला पण तीच मत होत आणि ते प्रदर्शित करण्याचा स्वतंत्राचा लढा तिने माझ्यापासून चालू केला.
पण गेल्या एक दोन महिन्यात प्रकरण जरा वेगळ वळण घेत होत. वासंती वाहिनी तिच्या चिडचिड्या स्वभावाची नेहमी तक्रार करत असायची. मला घरी येवून तिच्याशी बोलण्याची गरज आहे अस त्याचं मत होत. पण मला जमल नाही. शेवटी एके दिवशी मी वेळ काढून गेलो अवनीला माहित नव्हते मी कशा साठी आलो होतो ते. अवनी ने college च्या गप्पा चालू केल्या. नवे मित्र मैत्रिणी त्यांचे किस्से नवे नवे modern  विचार बराच काही. मग ती हळूच नाजूक विषयांकडे वळली.
अवनी- "काका, आमच्या क्लास मध्ये ३ couples  पण आहेत."
मी - "?"
"म्हणजे GF - BF रे. मी तुझ्या वयानुसार couple  म्हटलं. तुला कळव म्हणून. " तेवढ्यात तिने मला चिमटा काढला.
"अरे काका, आज काळ college मध्ये हाच माहोल असतो. हेच विषय असतात चघळायला."
मी - "गुड. मग तू शोधतेय तुझ्यासाठी एखादा BF ??"
अवनी- " काहीपण रे तुझ काका ?? मला अजून तसली गरज नाही आहे. आणि ते सगळ बोरिंग असत. fashion म्हणून करतात हे सगळ. fad असत फक्त. नुसता timepass. "

मला तिच्या बोलण्यात थोडा राग पण जाणवत होता आणि थोडी हि जाणीव कि मला हे सगळ आवडत
मला त्यात काही वावग वाटल नाही. बऱ्याच वेळा आपण ज्या गोष्टीच्या मागे लागतो पण ती मिळत नाही, ती आपल्याला नकोच आहे अस सांगत राहतो. ते सांगण दुसऱ्यांसाठी नसून आपल्याच मनासाठी असत. अवनीच पण हेच झाल होत. मी मात्र संभ्रमात होतो. अभय-वासंतीशी या विषयावरती काहीच चर्चा झाली नव्हती त्यामुळे मला या विषयावरती बोलायला कठीण झाले होते. त्यांच मत काय आहे याची मला पुसटशी पण कल्पना नव्हती. तसे मला ते orthodox कधी वाटले नाही.
पण हा विषय नाजुक होता.
आणि मी अवनीला काय सांगतो यावर तिचं जोडीदारच (एक अथवा त्यापेक्षा जास्त )आयुष्य अवलंबून होत. मी गोंधळून गेलो होतो पण मला त्यावेळी " मैरा नाम जोकर" मधला जॉनी आठवला जो त्याला तरुण पणाच्या गोष्टी विचारल्यावर म्हणतो मै भी कभी जवान था !! मला वाटत मँचुरिटी यालाच म्हणत असावे.

मी अवनीला विचारल, " आपण या विषयावर थोड बौलायच का? "
अवनी- " अरे बिनधास्त काका."

मी - "आणि फक्त तू आणि मी. ते पण मित्र आणि मैत्रीण म्हणून.सुरूवात मी करतो म्हणजे तुला पटेल की तुझा मित्रच बोलतोय." 

अवनी- "चालेल रे काका"

मी - "अवनी, प्रेम आयुष्यमधली सगळ्याच सुंदर आणि आवश्यक गोष्ट  आहे. ते अस ठरवून करता येत नाही आणि ठरवल तरी टाळता येत नाही. गमतीदार संदर्भ द्यायचा असेल तर ते अपघातासारख असत, पण अपघातात आपल्याला दुखापत होउ नये म्हणून जपतो. इथे मात्र ते दुःख देत नाही, हव हवस वाटत.

अवनी शांत पणे ऐकत होती.
"पण जेव्हा आपण प्रेम करतांना चुकतो तेव्हा त्रास आपल्यालाच होतो."

अवनी- "आणि चुकीच्या माणसावर ?. . "

मी हसलो, " आवनी प्रेम करताना समोरचा माणूस कसा आहे हा प्रश्नच नसतो. फायदा आणि तोटा हो व्यवहार झाला, ते लग्न. आणि...

अवनी- "म्हणजे तुला म्हणायचं आहे की प्रेम आणि लग्न वेगवेगळ्या गोष्टी आहेत??"

मी - "हो खुप वेगळ्या!! प्रेम होवून जात कळत नाही विचार करता येत नाही पण लग्न विचार करुन कराव लागत. ती कमिटमेंट असते आणि प्रेम डेडीकेशन् .
प्रेमाला व्यवहार कळत नाही. पण तुला आत्ता लग्न नाही तर प्रेम समजावून घ्यायचय."

अवनी- "काका पण प्रेम लग्नामधे कन्व्हर्ट झाल पाहिजे ना??"

मी - "लग्न म्हणजे सफल प्रेमाच प्रतिक नाही. तो यशस्वी संसार झाला. नियमांचे चोख पालन केलेला. पण प्रेमात नियम नाहीत. " 

अवनी- " काका थेअरी कळली पण हे सांग आता करायच काय? कॉलेज मधे गेल्यापासुन हेच बघतेय की प्रेम म्हणजे एक फँशन्. कम्पल्सरी विषय कॉलेज मधला." 

मी - "पण तुला अडवतेय कोण? होणार असेल तर होवू दे. पण तु ज्या लेव्हलच प्रेम करू शकते ते समजु शकणारा व्यक्ती पाहिजे ना. "

अवनी- "म्हणजे निवड आली ना काका??"

मी - "अग पण दान देताना सुद्धा देणाऱ्या एवधीच घेणाऱ्याची लायकी बघायची असते. त्याला ते सांभाळता पण आल पाहीजे ना? तू मनापासून प्रेम करशील तर समोरच्या व्यक्तीला तसच  प्रेम करता आल पाहिजे. आणि त्याची लायकी हि looks, धमाकेदार व्यक्तिमत्व, सगळ्याच्या गळ्यातला ताईत असणे हे गुण नकोत. हे सगळ fashin किंवा fad असू शकते. खऱ्या प्रेमाला लुक्स ची नाही हूक्सची गरज असते. "

अवनी- "आता हा काय नवीन फंडा ??"

मी - "हूक्स म्हणजे मनाला अडकणारे हूक्स. मनाला connect करणारे, जोडणारे हूक्स. ते जास्त महत्वाचे. एकाद्या सुंदर मुलासोबत चार चौघांमध्ये फिरताना खूप अभिमान वाटेलाही स्व: ताचा, पण एकांतात त्या सुंदर मुलाने  तुला चांगलं वागवल पण पाहिजे ना. तुझ्या मनातल त्याला कळल पाहिजे, मनाला जपता आला पाहिजे. "
अवनी- "काका तू मला एक वेगळाच विचार दिलाय. मी असा विचार केला नाही कधी. आणि आजूबाजूला हे सगळ इतक विचित्र पद्धतीत present केल्या जात आणि परत घरात काही बोलता येत नाही . मनमोकळ बोलता येत नाही, आई-बाबांना सतत जाणून घ्यायचं असत कि माझे मित्र कोण? आम्ही कुठे जातो? मला कळत  नाही कि त्यांना माझ्याकडून सगळ काढण घ्यायचं असत कि माझे मित्र म्हणून ते सहज विचारत असतात."
मी - "अवनी, आई बाबा मित्र होण्याचा प्रयत्न करतील च पण प्रश्न हा आहे कि तुझे विचार काय आहेत? प्रेम अस fashion म्हणून करू नकोस, प्रेम अस college मधला compulsary विषय म्हणून करू नकोस, कोणाशी पैज लागली म्हणून करू नकोस, कोणाला दाखवायचं कि माझा पण BF आहे म्हणून करू नकोस. ते जेव्हा होईल तेव्हा होऊ दे.  ठरवून नको करून. ते जेव्हा अनुभवता येईल तेव्हा अनुभव घे घाई नको करू."

अवनी- "आई बाबा तुला पुढल्या वेळी घरात घेणार नाही. मला प्रेमाची महती सांगतोय."

मी - "अवनी ज्या गोष्टी मुळे संपूर्ण आयुष्य सुंदर होत  गोष्ट चुकीची अस कस सांगू तुला ?? लग्न झाल कि प्रेम करायला शिक अस सांगायला मी काही मूर्ख नाही. प्रेमावर आत्ता पासूनच विश्वास असला पाहिजे ते जेव्हा भेटेल तेव्हा भेटो !!!"

अवनी- "काका, हे तुझे विचार. मला वाटत नाही आई-बाबा पण इतके मोकळ्या स्वभावाचे असतील. "
मी - "प्रेम याबद्दल तुझे विचार जाणण्यासाठी आणि माझ मत सांगण्यासाठी मी तुला बोलत केल. मी तुझा काका होवून हे बोलू शकत नाही पण मित्राच्या वेशात येवून काकाचे विचार ऐकवू शकत नाही. तू प्रेम कर अस मी म्हणत नाही, करू नकोस अस पण नाही. माझ म्हणण एकच आहे कि प्रेम सुंदर असत आणि ठरवून करता येत नाही."
अवनी- "काका !! " अवनी मला येवून बिलगली. तिच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या . पण तिच्या cool  स्वभावामध्ये बसत नसल्याने ती रडत नव्हती. आणि प्रेम काय हे कळल म्हणून डोळे ओले होण्यापेक्षा प्रेम ऊमजल म्हणून तिने आनंदी व्हाव हि माझी पण इच्छा होती.

तिच्या आई बाबांना मला हेच सांगायचं होत कि तिच्या वयाला साजेसा सल्ला देण्याच्या नादात तिला प्रेम वाईट असत अस सांगू नका, प्रेम सुंदर असत आणि ते करण्याची ताकद तिला द्यायला हवी.

तिच्या वयात नाही पण अभय-वासंतीच्या वयात तर प्रेमाच महत्व आणि किंमत नक्कीच कळायला हवी. हो ना ??


अमित जहागीरदार
पुणे
ऑगस्ट २०१५

सोमवार, ५ ऑक्टोबर, २०१५

प्रपोज करण्याचे प्रकार -भाग ५ - कांदा पोहे

प्रपोज करण्याचे प्रकार -भाग ५ - कांदा पोहे

आता मात्र अति झालय. म्हणजे रोज रोज जर तेच होणार असेल तर मी शांत पणे बघू शकत नाही. मला याबद्दल काहीतरी कराव लागणारच. पण एकदम विषय तक्रारीचा नाही होऊ शकत पण मी सहन सुद्द्धा करू शकत नाही. स्वराली शी बोलाव कि नाही असा विचार करत मी जवळ पास २-३ आठवडे घालवलेत. पण मी हे रोज रोज बघत होतो आणि आणि माझ्या वागण्यातून तिला कदाचित कळलंच असेल.

रोज सकाळी स्वराली आली कि मी उत्सुकतेने तिच्या … … … डब्याकडे बघायचो आणि तिने आज काय आणल असेल हा विचार करायचो. सकाळी ८ वा आम्ही office मध्ये यायचो म्हणजे संध्याकाळी लवकर निघता  येईन मग नाश्ता office  मधेच करावा लागायचा. स्वराली माझ्या बाजूला बसायची म्हणून कधी कधी आम्ही डबा share  पण करायचो . पण मला हे कळायला फार जास्त दिवस लागले नाहीत कि स्वराली ६ पैकी ४ दिवस फक्त पोहेच आणते. मला जरा  कंटाळा यायला लागला होता. मी तिच्यासोबत नाश्ता करणे पण टाळू लागलो होतो.

हो हे अगदी खर आहे. स्वराली फक्त कांदा पोहेच आणते डब्यामध्ये आणि मला का ते कळत नाही. कुणाच्या डब्यात काय असावं याच्याशी मला काहीच देणे घेणे नाहीय पण रोज रोज तोच पदार्थ आणण्यामागे काय हेतू असावा हे मला शेजारी बसतो म्हणून कळायला हव ना !! मी आज हट्टाला पेटलो होतो.
" स्वराली रोज कांदा पोहेच कसे असतात ग ! तुला दुसर काही येत नाही कि काय ??"
" अरे अमित !! मला सगळ येत रे पण सकाळची सुरुवात आम्ही कांदा पोह्यानेच करतो"
" म्हणजे तुझा नवरा पण रोज हेच खातो ??"
" मी तरी एखाद्या दिवशी दुसर काही तरी आणते पण तो तर गेले ५-६ महिने म्हणजे लग्न झाल्यापासून तेच खातोय "
डोक्याकडे हात नेवून मी screw  धिल्ला झाल्याची खुण  केली तर ती लाडिक चिडली आणि बोलली कि आता गडबडीत आहे . lunch सोबत करू मी सगळ सांगते. मला कधी एकदा lunch  time  होतोय अस झाल होत.  पुष्कळ काम असल्यामुळे lunch  time  ने यायला जास्त वेळ घेतला नाही स्वराली direct  कॅण्टीन मध्ये आली.
कदाचित माझ्या चेहऱ्यावर उत्सुकता खूप ओथम्बुन वाहत होती. काही आढेवेढे न घेत ती बोलू लागली.

मी आणि सौमित्र एकाच college मधले, एकाच क्लास मधले. सौमित्र खूप लाजरा बुजरा होता पण माझ्याशी जरा जास्त जुळायच त्याच्याशी !! पहिल्या दोन वर्षात एकदाही नजरेशी नजर न भिडवणारा तो thrid  year पासून माझ्याशी बोलू लागला म्हणजे मीच त्याला बोलत केल.  कधी notes  घेण्याच्या बहाण्याने तर कधी एखाद्या program  च्या coordination निम्मिताने. सहसा अश्या लोकांचे दोनच प्रकार असू शकतात . एक म्हणजे खरोखर लाजरे किंवा खूप चालू पण सोज्वळ असल्याचा आव आणणारे. मला एक दोन भेटीतून कळल कि तो दुसऱ्या प्रकारातला नाहीय. एक छान सुंदर मैत्री करायला तेवढ पुरेस असत !!

मी ऐकत होतो स्वराली सोबत अगदी तिच्या college  मध्ये जावून त्यांच्या class  चा एक भाग झालो होतो मी !!

" सौमित्र आणि मी वरचे वर भेटू लागलो, वेळ घालवू लागलो, गप्पा वाढू लागल्या. घरात खूप कोड-कौतुक झाल्यामुळे तो खूप लाजरा झाला होता आणि मुलींशी स्वताहून ओळख करणे म्हणजे तर त्याला डोंगरा एवढ कठीण वाटायचं. माझ्याशी ओळख झाली आणि त्याचा तो confidence  थोडा वाढला मग त्याने त्याचे एक दोन प्रयोग पण केलेत. तरी माझ्याशी त्याची खूप खास मैत्री झाली. एकदम वाळवंटातून हिरव्यागार जंगल्यात आल्यासारखं झाल त्याच्या बाबतीत . मला नेहमी वाटायचं कि तो वाहवत जाईन आणि एक दिवस मला propose  करेल. फायनलला jobs  लागलेत तेव्हा तर जोडया लावा हा college  मधला सामूहीक खेळ झाला होता . अगदी betting व्हायचं यावर माझी जोडी कधी सौमित्रशी लागते याची सगळ्यांना घाई झाली होती पण आमच्या दोघांमध्ये असा काहीच नव्हतं. सौमित्र पण तस कधी बोलला नाही किंवा मला जाणवलं नाही."

"college  संपल्यावर घरी जात असतांना तो मला स्टेशन वर सोडायला आला होता. मग मीच त्याला विचारलं कि तू काही निवड केली नाहीस का कुणाची girlfriend म्हणून  ?? तो हसला आणि म्हणाला कि मला मैत्रीच  इतक सुंदर नात आत्ता कुठे उमगलंय. हेच enjoy  करू दे. प्रेम काय भेटेल जेव्हा भेटायचं तेव्हा. त्याच्या नादात  मला मैत्रीच नात गमवायच नाहीय .
इतके दिवस मी कधी विचार केला नाही पण त्याच्या त्या बोलण्याने आणि मैत्रीविषयी असलेल्या  मनातल्या शुद्ध भक्ती मुळे  मला त्याच्याबद्दल खूप वेगळा  विचार यायला लागले. शेवटी प्रेम म्हणजे तरी काय ?? एक उत्कट भावना आणि नंतर मैत्रीच ना. "
" मी नोकरी शोधण्यासाठी पुण्यात आली कारण सैमित्र पण पुण्यात होता . त्याची मदत होईल हा हेतू आणि माझ्या मनात त्याच्या बद्दल ओढ पण होती. तो मला सकाळी interview च्या ठिकाणी सोडायचा. सकाळी घाई झाली कि तो कधी कधी माझ्या साठी खायला बिस्कीट वगैरे घेवून यायचा. एक असाच खास दिवस होता तो सौमित्र ला सुट्टी होती म्हणून तो माझ्या सोबत आला होता. interview  च्या घाई मध्ये त्याने दिलेला डबा  मी खावू शकले नाही.  आणि दुपारी interview  झाल्यावर तो आणि मी एका निवांत जागी बसलो आणि मी डबा  बाहेर काढला. त्यात पोहे होते ते पण त्याने बनवलेले. मी डबा  खाल्ला नाही म्हणून तो थोडा  चिडला होता.
मी पोह्यांच कौतुक करत म्हणाले मला जर असे पोहे रोज  मिळणार असतील तर मी आयुष्यभर interview  देईन."
तो चिडला आणि म्हणाला कि  तुला नोकरी मिळावी अशी मी रोज प्रार्थना करतो आणि तू हे काय बोलतेय??
मी म्हणाले कि मला तर हे पोहे आयुष्यभर खावेसे वाटतात.
तो थोडा गंभीर झाला आणि बोलला कि आयुष्यभर थोडीच खाणार ?? आता मी देईन पण मग तुला तुझ्या नवऱ्याकडून खावे लागतील.
"मी थोड्या लाडिकपणे  म्हणाली कि मग मला पोहे आयुष्यभर खावू घालण्यासाठी तूच माझा नवरा हो ना. कठीण आहे का ?? "
"मी केलेलं अस भन्नाट proposal त्याच्या पचनी पडायला खूप वेळ लागला. पण तो लगेच राजी झाला. प्रेमाची भेट म्हणून मी त्याला पोह्याचा घास भरवला.

अशी आमची स्टोरी कांदा पोह्यांची . "


स्वराल्ली सांगून दमली नव्हती पण मी ऐकून थकलो होतो. पण एकदम तिच्या डब्यातल्या गरम गरम पोह्याचा सुवास आठवला आणि मन प्रसन्न झाल !!

खर तर कांदा पोहे म्हणजे arrange  marriage वाल्यांचा trademark. पण त्याची अशी सुंदर, मसालेदार आणि रंजक propose करण्याची गोष्ट मला कळली होती. आता मी स्वरालीच्या डब्यात पोहे बघून चिडत नाही पण तिला चिडवतो. तरी अजून मी तिच्या घरी येण्याच्या हट्टाला बळी पडलो नाही. अहो त्याच प्रेम जमल म्हणून  ते रोज पोहे खावू शकतात पण मला थोडीच जमणार आहे !!!! आमच्या प्रेमाला आणि संसाराला इडली, उपमा, थालीपीठ किंवा अगदी sandwich पण चालत !!!


अमित जहागीरदार
०२-०३ ऑक्टोबर २०१५
पुणे

रविवार, २६ जुलै, २०१५

तेरा साथ है तो ….

तेरा साथ है तो ….

शामलचा फोन आला जेव्हा आवेश meeting मध्ये होतो आणि मोठ्या तावातावाने काहीतरी बोलत होता. पण शामलचा फोन बऱ्याच दिवसांनी आला त्यामुळे त्याला घ्यावा लागला.
"तुला भेटायचं होत . संध्याकाळी office सुटल्यावर येते !"
"अग माझी meeting चालू होती आणि मी माझ वाक्य सुद्धा अर्धवट सोडून आलो. सगळ्यांना वाटत कि बायकोला हा इतका घाबरतो आणि बघतो तर तुझा फोन " आवेश  जरा चिडून बोलला
"जावू दे रे ! मैत्रिणीचा फोन घेतला तर इतका काय चिडतो ? आणि तशी पण मी तुला जवळ पास ३-४ आठवड्यांनी फोन करतेय"
"काम काय आहे ते सांगा madam !"
"ते संध्याकाळी बोलू ना यार !!"
"आता फोन ठेव आणि हो ऑफिस मधल्या वेळेतच ये ग बाई !!"
"बर साहेब "

शामलची त्याला तशी बऱ्याच दिवसांनी भेटणार होती. आवेश आणि शामल एकाच college मधले. काही common मित्रांच्या ओळखीने त्यांची भेट झाली होती. अभ्यासाचे विषय वेगळे, college च्या वेळा वेगळ्या आणि दोघांमध्ये हुशार कोण याची परीक्षा नसल्यामुळे ते बऱ्याच गप्पा मारायचेत . डिग्रीचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर आवेश पुण्याला नोकरीसाठी आला. शामल काही महिन्यांनी नोकरी शोधण्यासाठी आली आणि पुन्हा भेटी होऊ लागल्या. काही वर्षात तीच लग्न झाल पण नशिबाने तिचा नवरा पुण्याचाच होता. त्यांच्या भेटींची frequency कमी झाली पण mail ने काही न काही तरी संवाद व्हायचा.

संध्याकाळी शामल आली तेव्हा ती दोघे जवळच्या एका coffee shop  मध्ये गेले . गप्पांचा फड रंगणार कि लग्न झालेली मैत्रीण तिच्या संसारातल्या अडचणी सांगणार कि सासू चे गाऱ्हाणे सांगणार ? पण इतक्या दिवसांनी भेटणार असल्यामुळे काही तरी serious  असणार असा विचार आवेश ने केला .

शामल आली आणि बोलत सुटली. तिच्या बोलण्याच्या छंदापायी कधी कधी वाटत कि शामल ला जर limited talktime मिळाला असेल बोलण्याचा तर हा तिचा तिसरा lifetime recharge असेल.

office  चे तीन चार विषय चघळून झाल्यावर तिला आवेश ने आठवण करून दिली कि काही तरी महत्वाच बोलाण्यासाठी ती आलीय.
" तुला आठवत का आपण लास्ट टाईम कुठल्या नाटकाला गेलो होतो? किंवा एखादा गाण्याचा program ??
सांगलीला असतांना किती enjoy  करायचो ना आपण . नाटक काय, गाण्याचेप्रोग्राम काय,  कवितांच्या मैफिली काय ? नुसती धम्माल. लग्नानंतर एकदा गेलो तर माझा नवरा तर आलाच नव्हता आणि तुझ्या बायकोने एका गाण्यामध्ये १०० रुपये याप्रमाणे तुझ्याकडून २३०० रुपयांची shopping करून घेतली .

हे अगदी खर होत त्यामुळे आवेश पण थोडा ओशाळल्या सारखा झाला. आवेशच्या बायकोला संगीताचा गंध नाही. मग तिने हा असा सौदा केला होता. पण आवेश ला या विषयावर बोलायचे नव्हते.
"बर हा विषय आहे का आपल्या भेटीचा?? "

"नाही रे !! कधी कधी वाटत किती सोप्प असत ना सगळ ?? माझ्या नवऱ्याला यातलं काहीच आवडत नाही म्हणून तो माझ्या सोबत कधीच येत नाही. मी एकटी हे enjoy करू शकत नाही म्हणून मला जायलाच मिळत नाही . साथीदार म्हणून त्याची साथ फक्त संकटात नाही तर आपल्याला जे मनापासून आवडत ते करण्यात पण मिळावी ना. माझी हि अपेक्षा नाही कि त्याने माझ्या level  ला येवून ते enjoy कराव पण कमीत कमी  सोबत असावं. मला कविता आवडतात म्हणून एक कवितांच छान पुस्तक द्यावं, गाण्याच्या program  चे तिकीट काढून छान रविवारचा बेत करावा पण नाही. "

आवेश मनातल्या मनात विचार करत होता  कि आज बहुदा नवरा या विषयावर मोठ्ठ पुराण लिहिल्या जाणार. पण शेवटी ती बोलणार तरी कुणाकडे . असले विषय नातेवाईकांमध्ये काढता येत नाहीत. उगाच बोभाटा होतो.  मैत्रिणी असल्या कथा kitty पार्टी मध्ये सौस ला लावून खातात त्यामुळे आवेशसारखा नुरुपद्रावी मित्र बरा नवऱ्याचे  गाऱ्हाणे सांगायला. पण आज शामल जास्त जोमाने बोलत होती. तिच्या मनावरचा घाव तर जास्त खोल होता अथवा संसारातल्या नेहमीच्या घडणीचा घाव असावा . एकाच ठिकाणी वर्षोन वर्षे टोचणारी सुई एवढे वार कधी कधी एकाद्या चाकूच्या जखमे समोर जास्त वाटतात.

आवेशने गंभीर व्हायचं ठरवलं आणि तीच बोलण ऐकू लागला.
"तुझ्या नवऱ्याला  माहित आहे तू इकडे आलीस ते ??"
"हो मग मी सांगून आलेय आणि कदाचित त्याला कल्पना पण असेन कि मी हेच बोलणार आहे!"
"अरे व्वा , म्हणजे आग already  लागलीय आम्ही फक्त बंब घेवून जायचं !! शामल , तुला जे हवाय ते रास्त आहे नवऱ्याने तुझ्या सोबत यायला हव अगदी नाटकाला सुद्धा. मला मान्य आहे अग पण त्याला ते enjoy पण करता अल पाहिजे ना. त्याच मन त्या सगळ्या मध्ये गुंतलं पाहिजे ना."
"अरे पण माझ्या साठी आला तर काय बिघडत ?"
"शामल विषय त्याच्या आवडीचा आहे आहे त्याच्या  वेळेचा नाही. आणि तुला आठवत असेल तो आला पण होता आपण दोघे एका कविता वाचनाच्या कार्यक्रमाला त्याला घेवून गेलो होतो. काहीही गंध नसतांना तो आला होता आणि त्याने पूर्ण वेळ तुला दिला होता
पण कार्यक्रम संपल्यानंतर तुला बोलला होता कि हा कदाचित शेवटचा प्रोग्राम असेल माझा. आणि घरी येतांना त्याने माझी खूप थट्टा  पण केली होती .

"शामल, साहित्य हा त्याच्या आवडीचा विषय नाहीय हे तुला काबुल कराव लागेल पण त्यानंतर आपण एक दोन कार्यक्रम attend केलेत तो आपल्यासोबत आला नाही पण त्याने तुला कधी अडवलं पण नाही. हो पण आता तुझा हा हट्ट असेल कि त्याने याव आणि सोबत बसून स्वतावर अत्याचार करून घावे तर मग हा अन्याय आहे ना. आणि त्याने तुला कधी थांबवले नाही ना !!"

शामल शांत झाली होती तरी पण तिच्या मनातले विचारांचे वादळ शांत झाले नव्हते.
आवेशने मी उगाच तिला चिडवण्यासाठी बोलत होतो, " काय मग आज काल  facebook ची profile  कुठली ??
आणि हो आज च्या आपल्या coffee चे update  नको हा टाकुस fb  वर. मला घरी explaination द्यावं लागत.
" काही पण ? मी तुझ्या बायको ला ओळखते. तिला सांग न मी आले होते भेटायला म्हणून. "
अग बाई अस काही करू नको. मी तिला सांगितलं नाहीय कि मी तुला भेटायला आलोय. "

खर तर आवेशाला स्पष्ट सांगितलं सांगायचं होत कि त्याच्या  बायकोला शामलशी तिच्याशी अथवा कोणताही मैत्रिणीला भेटायला आवडत नाही. आवेशने विचार केला कि एक चांगली comparison पण सापडली.

"शामल, कधी अभयने तुला अडवलं का ग माझ्या शी भेटायला ?? मला आठवत कि लग्न झाल्यावर पहिल्यांदा तुम्ही दोघे माझ्याकडे आले होते. अभयने भरपूर गप्पा मारल्या होत्या अगदी मनमोकळ्या. त्याला काहीच प्रोब्लेम नव्हता या गोष्टी चा कि मी तुझा मित्र आहे. त्याला आपण कितीतरी गोष्टी सांगितल्या - आपण बघितलेले pictures , नाटकं, गाण्याचे प्रोग्राम्स, shopping….  पण कुठेही अभयच्या चेहऱ्यावरून वाटल नाही कि त्याला या कशात काही वावग वाटत होत."

"--"
"अग कधीतरी हा पण विचार करून बघ कि जर अभयला हे सगळ पटल नसत मग तू काय केल असत ?? लग्ननंतर त्याने जर मित्रांशी बोलण, त्यांच्या contact मध्ये राहू  नकोस असले नियम केले असते तर तू काय केल असत. आणि direct त्याने नाही म्हटलं असत तर वेगळी गोष्ट पण मनातल्या मनात हे ठेवून तो फक्त तुला judge करत बसला असता तर तू काय केल असत. मी हे म्हणत नाहीय कि असा स्वभाव असणे हि चांगली गोष्ट आहे पण फक्त या कारणासाठी तुमचे releations बनायला वेळ लागला असता. अभय तसा नाहीय ही  खूप चांगली गोष्ट आहे . तू त्याला सांगून मला भेटायला येवू शकते, माझ्यासोबत नाटकाला जावू शकते या गोष्टी कडे बघ. तो तुझ्या सोबत नाटकाला  येत नाही हा प्रोब्लेम नाहीय."
"मी असा विचार कधी केला नाही "
"मला माझ्या बायकोला सांगता पण येत नाही कि  मी आत्ता तुझ्या सोबत आहे. तिला संशय येईल फक्त हि भीती नाहीय पण ती अस्वस्थ होते तिला सगळ सांगाव लागत मग तिला थोडं हायस वाटत. याला प्रेम पण म्हणता येईल किंवा मला मिळणाऱ्या स्पेस बद्दल दु :ख पण करता येईल. मुख्य प्रश्न तिच्या comfort चा आहे. "

एक प्रकारे आवेशच पण मन मोकळ झाल. शामल शांत झाली होती. अभय सोबत येत नाही पण आपले छंद जोपासायचे स्वातंत्र त्याने आपल्याला दिलाय याची जाणीव तीला पहिल्यांदा झाली. आणि या एका गोष्टीसाठी  अभय वाईट किंवा चुकीचा ठरत नाही. आवेश तर त्याला space  मिळत नसताना सुद्धा कधी complaint करतांना दिसत नाही. ती विचारात गढून गेली आणि वाफाळलेली coffee त्यांनी cold coffee म्हणून घेतली.

बऱ्याचदा आपण फक्त याचा विचार करतो कि आपला जोडीदार कसा नाहीय ? तो अजून काय करू शकतो ज्याने आपल्याला छान वाटेल पण जिकडे आपण compare करतो त्या प्रांतांत कमी पडणारा आपला जोडीदार एकाद्या वेगळ्या प्रांतात मोठ्ठी मजल मारतो. फक्त आपल्याला कळत नाही. विश्वास ठेवावा लागतो आणि वेळ पण द्यावा लागतो. थोडीशी possesive वाटणारी बायको पण  घरच्या जवाबदार्या आणि तिची नोकरी सांभाळते. आणि बरेच काहि. प्रश्न हा आहे कि बायकोवर अपेक्षांचं ओझ लादाव कि जे ओझ ती आधीच वाहतेय त्यात तिला मदत करावी ?? आपले छंद जोपासता येतात याचा आनंद मानावा कि त्यावेळी आपला जोडीदार सोबत असावा , मग अगदी त्याला ते आवडो अथवा न आवडो !! हट्ट कशाचा करावा हा प्रश्न आहे.

प्रश्न फक्त आवेश आणि शामलचा आहे का ???


अमित जहागीरदार
२६ जुलै २०१५
पुणे

( संपूर्ण काल्पनिक कथा )

शनिवार, १८ जुलै, २०१५

प्रपोज करण्याचे प्रकार -भाग ४ - फरक स्पष्ट करा

प्रपोज करण्याचे प्रकार -भाग ४ - फरक स्पष्ट करा

गोष्ट तशी बरीच  जुनी आहे. मी चिंचवडला आपल्या मित्रांसोबत राहायचो. मी, आशिष आणि प्रणव !! आमच्या flat वर नुस्ता धिंगाणा चालायचा. सोबत बाहेर भटकण असो वा picture बघण असो सगळ्यांची फक्त धमाल  असायची. एक वेगळी धुंदी असायची नुस्ती वयाची नाही तर या उमेदीची लहर पण असायची कि आता पुढली  आयुष्याची पायरी चढायची आहे. आणि पुढल्या पायरी नंतर सगळ सगळ आपल्या पायावरती लोळण घालेल अशी भाबडी आशा !! आता मागे वळून पाहिलं कि  वाटत सगळ खरच इतक सोप्प असत तर??आयुष्य म्हणजे बर्फावर घसरण्या सारख ! त्यात एक वेगळी नशा त्या वेगाची, पण शीतल वाटणारा हाच बर्फ भाजण्या इतकाच दाह देवू शकतो. पण तेही वय असतच ना  बागडायचं !!
आम्ही पण तसेच होतो, आपल्या आपल्या कामांमधून वेळ काढून धम्माल करायचो. flat  वर येणाच्या वेळा  जरी वेगवेगळ्या असल्या तरी मिळेल तो वेळ आम्ही मनसोक्त enjoy केलाय. मला गुरुवारी सुट्टी असायची आणि बाकीच्यांना रविवारी त्यामुळे flat वर दोनदा "सेलिब्रेशन" व्हायचं.

माझी आणि प्रणवची office  म्हधून येण्याची वेळ जरा सारखी असायची त्यामुळे कुठे फिरायला जाणे छोटे मोठे शोप्पिंग आम्ही सोबत करायचो. पण गोष्ट तेव्हा रंग बदलू लागली जेव्हा प्रणव थोडा उशिरा यायला लागला. office मध्ये जास्त वेळ बसून खुर्च्या "गरम" करणे यावर यथेच्छ टीका करणारा प्रणव यायला बराच उशीर करू लागला. मी त्याला एक दोन वेळा विचारले पण मला काही उत्तर मिळाले नाही. मोघम उत्तर देवून त्याने वेळ मारून नेली. मी पण जास्त पाठपुरावा केला नाही. पण office मधल काम वाढल असा निष्कर्ष माझ्या मनाला पटत नव्हता.

काही दिवसांनी  J M रोड वर फिरतांना संभाजी parkच्या प्रवेश दाराशी प्रणव मला दिसला. ऑफिसचे काही मित्र आणि "मैत्रिणीं" सोबत !! मी मुद्दाम जावून त्याला तिथे भेटायला गेलो. त्याने माझी ओळख करून दिली. सगळ्या मैत्रिणींमधून एका गोड हसणाऱ्या आणि उगाच थोड लाजणाऱ्या मुलीची ओळख त्याने मैत्रीण म्हणून करून दिली- गीतिका. मी त्याच्या कडे बघून थोडस हसलो पण त्याने चेहऱ्यावरचे भाव बदलू दिले नाहीत.बाकीच्या मित्र-मैत्रीणींनी मला अवांतर विषयावरती प्रश्न विचारले पण गीतिका शांत होती.
माझ्या सोबत माझ्या college  एक मित्र होता मी त्याला म्हटले सुद्धा कि प्रणवची गाडी रुळावर धावणार.
त्याला पटत नव्हत पण मी त्याला सांगितले कि माझ्या प्रदीर्घ अनुभवावर विश्वास ठेव. आम्ही पैज वगैरे लावण्याचा विचार नाही केला, पण थोडे दिवस थांबण्याचे ठरवले. सगळ्या मुलींची नुसती नावं  सांगितली आणि त्या एका मुलीची ओळख मैत्रीण म्हणून करून दिली हा संदेश माझ्यासाठी नव्हता तर तिच्यासाठी होता एवढ न कळायला मी काही कच्चा लिंबू तेव्हाही नव्हतो !!

रात्री flat  वर पोहोचलो पण मी प्रणव कडे हा विषय काढला नाही किंवा त्याला चिडवायचे म्हणून बाकींच्या partners ला देखील काही सांगितले नाही. पण त्याच्या वागण्यात बरेच अमुलाग्र बदल जाणवत होते. स्वतः साठी चार वस्तु घेण्याचा बेत करून shopping ला जाणारा आणि एकही वस्तु न घेता परत येणारा प्रणव मोठ मोठ्या bags घेवून घरी येवू लागला. आरश्या समोरचा वेळ वाढला, पर्फूमस्च्या बाटल्या वाढल्या, "बाकीच्या" बाटल्यांमधला रस कमी झाला. फोनवरची संभाषण वाढले आणि असले वार्तालाप बाहेर होवू लागले. प्रणव office मधे थांबला की किती काम असत याचे तपशील देऊ लागला, कुणी मागितले नसताना. मला माहीत असलेल्या गोष्टीचा बभ्रा न केल्यामुळे त्याला कोणी चिडवत पण नव्हत. पण अश्यावेळी मित्रांनी केलेली थट्टामस्करी छान वाटते. पण प्रणवला हे सगळं अनुभवता नाही आल माझ्या "मुसुद्दीपणाच्या" भुमिकेमुळे.

 आणि एके दिवशी flat आम्ही दोघेच असतांना त्याने मला एक प्रश्न विचारला.
" अम्या, आवडणे आणि प्रेम यामधला फरक काय??
मला संदर्भ कळला होता पण मी प्रश्नावर फोकस करायचे ठरवले.
" प्रणव, अगदी परीक्षे मधला प्रश्न वाटतोय. फरक स्पष्ट करा .
"सांगणार आहेस का ??"
" प्रयत्न करतो सांगण्याचा. एखादी व्यक्ती आवडते तर आपल्याला ती छान वाटते आपण तिच्या कडे बघत बसतो. म्हणजे उदाहरण द्यायचं असेल तर सिनेमा मधली heroine ! आपल्याला ती आवडते आपण तिचे pictures कित्येकदा बघतो पण ती एखाद्या हिरो सोबत नाचते, प्रेम करते याच आपल्याला दु:ख होत नाही.
पण प्रेम असाल कि आपल्याला वाटत कि आपल्या जवळ असावी आपल्या आयुष्यात असावी आणि आपण तिच्या !! मला तुला हाच फरक सांगता येईल. "
मी एवढ बोलून विषय संपवला, आणि तो पण झोपी गेला.

साधारण एखाद्या आठवड्यानंतर त्याने मला ती धक्कादायक बातमी सांगितली . ती गोड हसणारी मुलगी त्याच्या आयुष्याचा एक भाग होती . मनमुराद मिठी मारून त्याने मला धन्यवाद दिलेत.
मी अचंबित झालो आणि म्हटले, " अरे मला कसले thanks  म्हणतोय ?? मी तर तुम्हा दोघांना कधी भेटलो पण नाही. एकदाच तू माझी ओळख करून दिली… . "
" ती ओळख आणि मग तू सांगितलेला प्रेम - आवडणे हा फरक. त्यासाठी thanks . आधी मी खूप गोंधळलो होतो- मला ती आवडते कि माझ तिच्यावर प्रेम आहे. आणि या दोन्ही गोष्टींमधील सीमारेषा खूप पुसट असल्यामुळे मला काही  कळत नव्हते. मलाच माझं उत्तर सापडत नव्हत. एकदा आम्ही सगळे canteen मधे बसलो होतो. गप्पांच्या ओघात पुढल्या आयुष्याचे plans, लग्न , जोडीदार हे सगळे विषय निघालेत. त्यावर सगळे बोलत होते  आणि गीतिकाने तिच्या लग्नाचा विषय घरी निघतोय हे सांगितले आणि मी अस्वस्थ झालो. आवडणे आणि प्रेम यामधला तू सांगितलेला फरक मला जाणवला.  मी त्या संध्याकाळीच तिला propose केले. तीने मलाच विचारले की मी तुला आवडते की फक्त एक सवय झालीय माझ्या असण्याची. मी आवडणे- प्रेम मधला फरकाचा फंडा सांगितला. मला तू आवडतेस हे तुला पण माहित आहे पण तू माझी व्हावी असा विचार मनात येवू लागलाय. याला प्रेम म्हणतात अस मला वाटत.  तुला काय वाटत ?? तिने उत्तर दिल नाही फक्त घरी येण्याच आमंत्रण दिल."
" अरे वा म्हणजे आमची शिकवणी कामास पडली."
" मग . ती पण आयुष्यभरासाठी !!"

त्याने propose  कसे केले याचा किस्सा साधा होता पण  "फरक स्पष्ट करा" हा उसना घेतलेला फंडा वापरून केलेलं हे propose थोड वेगळ होत. प्रेम तर फुललेल होतच पण त्याचा बहर दोघांना दिसायचा बाकी होता. कधी कधी दोघांच्या  मनातल्या गोष्टी बाहेर यायला फक्त एक क्षण हवा असतो. त्या क्षणाला  कसे सजवायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. प्रेम असेल तर ते वाट शोधून बाहेर येणारच फक्त तो क्षण जपण्यासाठी त्याला काहीतरी नाट्यमय गोष्टींमध्ये गुंफून ठेवावं लागत. मग आयुष्य भर ते क्षण जपता येतात !!


शाळेतल्या प्रश्नपत्रिकेमधला नेहमीचा प्रश्न - फरक स्पष्ट करा असा कामास पडेल अस कधी वाटल नाही.

- अमित जहागीरदार
१८ जुलै २०१५
पुणे