शनिवार, १७ ऑक्टोबर, २०१५

प्रपोज करण्याचे प्रकार -भाग 6- चाचू मुझे पसीने क्यू आ रहे है

प्रपोज करण्याचे प्रकार -भाग 6- चाचू मुझे पसीने क्यू आ रहे है


एखाद्या ठिकाणी आपण वर्षोन वर्षे राहतो पण परत तिथे आलो कि वाटत कि ते दिवस किती वेगळे होते. आता माझ असाच झाल. अमरावतीतल्या त्या भागामध्ये मी २-३ वर्ष राहिलो तेव्हा वाटल कि ह्या आठवणी मनात साठवतोय पण या कधीच मनातून जायच्या नाहीत. पण आज जवळपास १० वर्षाने इथे आलो तेव्हा लक्षात आल कि फक्त काही गोष्टीच नेहमीसाठी मनाच्या कप्प्यात राहतात, बाकीच्या गोष्टी काळानुसार हवेत विरून जातात.
मी राहायचो तिथे एक भास्कर वतनदार राहायचे. त्यांचे घर अजून तिथेच आणि तसेच होते म्हणून मी त्यांच्याकडे जाण्याचे ठरवले. तसाही माझा जास्त वेळ मी माझ्या घरी आणि  त्यांच्या घरीच घालवायचो. कारण विभा ताई -त्यांची मुलगी ! ती माझ्यापेक्षा 3 वर्षाने मोठी होती. पण अभ्यासात  खूप हुशार होती आणि  जवळपासच्या मुलांना अभ्यासात थोडी गोडी यावी म्हणून classes घ्यायची. त्यामुळे मी पण तिला ताई म्हणायचो.  तिचे लग्न आमच्याच घरासमोर एक अधिकारी कुटुंब राहायचं त्यांच्या स्वानंदशी झालय.

मी सहज गेलो तर काय नशीब ! विभा आणि स्वानंद दोघेही आले होते. मग गप्पांच फड रंगला. पहिले मी विभाताई आणि काकाच होतो गप्पा मारत आणि मग  स्वानंदपण आला आमच्या मधे .

काका लगेच उठले आणि त्यांनी पंखा चालू केला -
जावई बाप्पुंना घाम येईन . असे म्हणून दोघे ही हसले. मी याच्या आधीपण काकांनी असा विनोद करतांना बघितलं होत. मी काकांना विचारलं सुद्धा हे पंख्याच काय प्रकरण आहे. तुह्मी स्वानंदला एक दोन वेळा पंख्यावरून आणि घामावरून चिडवले हे माझ्या लक्षात आहे. काका आणि  स्वानंदला बाहेर जायचं होत म्हणून ते गडबडीत निघालेत. विभाताई आणि मी बऱ्याच वेळ गप्पा मारत बसलो. माझी नोकरी, नव शहर यासगळ्या गोष्टी चर्चून झाल्यात पण मला अजूनही याच उत्तर मिळालं नाही कि ती पंख्याची आणि घामाची गोष्ट काय आहे. विभाताईने माझ्या चेहर्यावरून माझ्या मनातल्या प्रश्नांची कल्पना आली असावी.

विभाताई हसली आणि गोष्ट सांगू लागली
अधिकारी कुटुंब आपल्या भागात shift  झालेत, आमच्या घरच्यांशी ओळख झाली येण- जाण चालू झाल, परीचय वाढला मग कळल कि अधिकारी काका पत्रिका बघायचे आणि लग्न जुळवायचेत. त्यावेळी माझ लग्न करायचं अस चालल  होत. स्वानंदशी ओळख झाली होती पण माझ्यासाठी तो एक शेजारी होता पण आजकाल तो जास्त वेळा भेटत होता. माझ्यासाठी आलेल्या प्रत्येक "ठिकाणा" ची माहिती आली कि बाबा ती अधिकारी काकांकडे पाठवायची. काका ती माहिती आणि पत्रिका बऱ्याचदा स्वानंदच्या हातून पाठवायचे . मग एखादी माहिती पडताळण्यासाठी अधिकारी काका कधी कधी स्वानंदलाच पाठवायचे. प्रत्येक वेळी स्वानंद घरी यायचा तेव्हा घामाने लदबदलेला असायचा. स्वानंद घरात आल्याबरोबर पहिले पंखा लावावा लागायचा. आम्ही सगळे आतल्या खोलीमधून त्याची हि गम्मत बघायचो आणि हसायचो. एक दोनदा तर बाबा घरी नसल्यामुळे मी एकटीच त्याच्या बऱ्याच श्या प्रश्नांची उत्तरे द्यायची. एकदा मी त्याला विचारले पण कि अरे तुला इतका घाम का येतो ??
काही न बोलता घाम पुसत निघून जायचा.
 BSc नंतर मला पुढे शिकायचं होत . बाबांनी खुप आग्रह नव्हता धरला पण जमायला 1-2 वर्ष लागतात अस ग्रुहित धरून मी देखील होकार दिला. पण लगेच ठरू नये असे मनात पक्क केल होतं.  आलेल्या स्थळाला नकार देण्यासाठी मला काहीना काही कारण मिळायचं आणि मी प्रत्येक वेळी लग्नाला नकार द्यायची. 

मी सांगितलेल्या सगळ्या सबबी माझ्यावर एकदा उलटल्या. आता अधिकारी काकांनाही कळले होते कि मी कोणती proposal  नाकारते मग त्यांनी ती सगळी जुळवा जुळव करून एक अस स्थळ सुचवाल कि नाही म्हणायला scope  नाही.
सगळे तपशील स्वानंद ला सांगून काकांनी त्याला आमच्याकडे पाठवले. डिसेंबरचे दिवस होते आणि  कडाक्याची थंडी होती पण स्वानंद घरी आला तेव्हा घामाने न्हावून निघाला होता. मी आश्चर्य चकीत झाले होते घरात दुसर कोणीच नाहीय हे त्याला माहित नव्हत म्हणून तो बिचारा मला सगळ सांगू लागला कि हे स्थळ खूप चांगल आहे आणि पत्रिका पण जुळते. मी थोडी लाजली . स्वानंद घामाने माखला होता आणि मला काय करावे ते सुचत नव्हते त्याच्या बोलण्यामागे भीती पण होती की ह्या स्थळाला नकार देता येणार नाही असे अधिकारी काका म्हणत होते. 

मी सवयीने पंखा लावला आणि स्वानंदसाठी पाणी आणले. मला त्याला विचारायची इच्छा होती की तुला घाम का येतो रे पण आज तो जरा गंभीर दिसत होता. मी पण तो समोर बसलाय हे विसरून स्वतः शी बोलत बसले, "किती विचीत्र आहे.  नाही?  पत्रिका बघून, जुजबी माहिती पडताळून कुणाला सोबत आयुष्य घालवायच.  आणि या  process  वर विश्वास ठेवायचा कारण आपल्या आई-बाबा , आजी- आजोबा सगळ्यांनी हेच केल .
यात कुठेच प्रेम,  जिव्हाळा एकमेकांना ओळखणे ??  हे सगळ मिथ्थ्या वाटत. 
बोलता बोलता माझ्या लक्षात आल कि स्वानंद तिथेच शांतपणे सगळ ऐकत होता. आणि त्याचा घाम  देखील सुकला होता !!

तो म्हणाला कि कधी कधी प्रेम अगदी जवळपास असत पण आपल्याला दिसत नाही, जाणवत नाही.
तो म्हणाला कि कधी कधी प्रेम समोर असत पण आपल्याला दिसत नाही, कळत नाही. मी त्याच्या असल्या बोलण्याने अवाक् झाली होती. 
त्याने बहुदा माझा चेहरा वाचला हवा आणि बोलला कि आता हेच बघ ना तुझ्या लग्न आता जुळणारच असा बाबांना विश्वास असतो आणि तू मात्र काही ना काही  कारण काढते. मला जाम वैताग येतो पण वाटत एकदा मी हिंमत करेन आणि एकदा माझी पत्रिका पण जुळते का ते बघेन पण शब्द बाहेर येण राहिल बाजुला नुसता घामच येतो. 

मला हसू पण येतो होत आणि आश्चर्य याचं वाटत होत कि त्याने ते सगळ बोलुन पण दाखवल. मला impress व्हायला आणि थोडा लाजायला हे पुरेसे होत . तो तेवढ बोलून निघून गेला आणि मी बाबांची वाट बघत बसले. त्यांना कधी सांगते अस झालं होत मला.  पुढे सगळ्या गोष्टी जुळून आल्यात. आमच लग्न ठरलं आणि झाल देखील.

 पण अजूनही स्वानंद आला कि आम्ही त्याला घाम आणि पंख्यावरून चिडवतो.
अशी ती आगळी वेगळी गोष्ट विभा - स्वानंदची !!

१५ ऑक्टोबर २०१५

शनिवार, १० ऑक्टोबर, २०१५

प्रेमाची पहिली शिकवण


आज अचानक एक गोष्ट आठवली. साधारण तीन चार महिन्यांपूर्वी आमच एक गेट टुगेदर झाल होत. आमची  college ची मित्र मैत्रिणींची gang भेटली होती त्यावेळी college मध्ये कोणाला कोण आवडायचं याची यादी निघाली. विषय आवडीचा असल्यामुळे सगळ्यांनाच त्यात रस होता. कृतिकाचा नवरा जास्त लक्ष देवून ऐकत होता हे माझ्या लक्षात आल. मी त्याचा ताण हलका करण्यासाठी बोललो कि कृतिका कुठल्याच लिस्ट मध्ये नव्हती. ती पण उत्साहात बोलत होती कि माझ्या terror मुळे माझ्या मागे कधी कोणी लागल नाही. कृतिका पुढे म्हणाली कि मला हे प्रेम वगैरे जमल नाही पण समीर सोबत आहे म्हणून आमचा संसार चालू आहे.
बाकीच्या बऱ्याच गोष्टी झाल्यात पण मला तिचं ते वाक्य खूप बोचल. तिने प्रेम आणि संसार वेगळे ठेवलेत !!

आज हे सगळ आठवायच कारण अवनी . तिला नुकताच भेटून आलो आणि जवळपास दोन तास आणि चाळीस मिनिटे तिच्याशी वाद-संवाद झालेत. अवनी माझ्या एका मित्राची मुलगी. १७ -१८ वर्षाची पण माझी खास मैत्रीण. पहिल्या नोकरीच्या ठिकाणी अभय आणि माझी ओळख झाली. अभय पुण्याचा असला तरी घरी येण्याच आमंत्रण तो मनापासून देत असे आणि अश्याच त्याच्या एका आमंत्रणाला आम्ही नुकत्याच join झालेल्यांच्या group  ने मनावर घेतल. अभयने खूप छान बेत केला, नवीन office आणि नवीन शहर असल्यामुळे आम्हाला घरी असल्यासारखं वाटलं. त्यावेळी आमची ओळख एका छोट्या परिशी झाली - अवनी. अभय आणि वासंती ची मुलगी. तेव्हा अवनी ४-५ वर्षाची असेन. पण आमच्या मध्ये ती लगेच रुळली. माझ्याशी तिची खास गट्टी जमली. मग अभयकडे वरचेवर जाणं वाढल. अवनीला माझा लळा लागायला तेवढ पुरस होत. 
अवनीचा वाढदिवस असो वा त्याच्याकडचे कुठलेही function असो मी अभयच्या घरचा permanent सदस्य झालो. माझ्या shopping च्या लिस्ट मध्ये अवनी साठी काही ना  काही वस्तू असायची. माझ्या लग्नाच्या वेळी बायको आणि तिचे घराचे रडत असतांना आमच्याकडून अवनीने भोकाड पसरलं होत. तिला कोणीतरी सांगितलं कि आता काका तुझ्याकडे लक्ष देणार नाही आणि फक्त काकुचेच लाड करणार. अवनीला समजावणे कठीण झाले. अशी माझी आणि अवनीची मैत्री.

कुठल्याहि गोष्टीसाठी पहिले माझ्याकडे हट्ट  करणारी, सगळ पहिले मला सांगणारी आणि माझं ऐकणारी अवनी. अभय आणि वासंती वाहिनीने कधी यावर आक्षेप घेतला नाही कि अवनी माझ्याशी सगळ share  करते. फक्त कधी कधी त्यांची मत विचारात घेण्याची ताकीद मिळायची आम्हाला. तिचे छंद, शाळेच्या सहली, आवडी जपण्यासाठी तिला लागणारी मदत आणि घरच्यांकडून अपेक्षित स्वतंत्र ती माझ्या जोरावर मिळवायची.  पण आता थोडी मोठी झाली होती. तिला पण तीच मत होत आणि ते प्रदर्शित करण्याचा स्वतंत्राचा लढा तिने माझ्यापासून चालू केला.
पण गेल्या एक दोन महिन्यात प्रकरण जरा वेगळ वळण घेत होत. वासंती वाहिनी तिच्या चिडचिड्या स्वभावाची नेहमी तक्रार करत असायची. मला घरी येवून तिच्याशी बोलण्याची गरज आहे अस त्याचं मत होत. पण मला जमल नाही. शेवटी एके दिवशी मी वेळ काढून गेलो अवनीला माहित नव्हते मी कशा साठी आलो होतो ते. अवनी ने college च्या गप्पा चालू केल्या. नवे मित्र मैत्रिणी त्यांचे किस्से नवे नवे modern  विचार बराच काही. मग ती हळूच नाजूक विषयांकडे वळली.
अवनी- "काका, आमच्या क्लास मध्ये ३ couples  पण आहेत."
मी - "?"
"म्हणजे GF - BF रे. मी तुझ्या वयानुसार couple  म्हटलं. तुला कळव म्हणून. " तेवढ्यात तिने मला चिमटा काढला.
"अरे काका, आज काळ college मध्ये हाच माहोल असतो. हेच विषय असतात चघळायला."
मी - "गुड. मग तू शोधतेय तुझ्यासाठी एखादा BF ??"
अवनी- " काहीपण रे तुझ काका ?? मला अजून तसली गरज नाही आहे. आणि ते सगळ बोरिंग असत. fashion म्हणून करतात हे सगळ. fad असत फक्त. नुसता timepass. "

मला तिच्या बोलण्यात थोडा राग पण जाणवत होता आणि थोडी हि जाणीव कि मला हे सगळ आवडत
मला त्यात काही वावग वाटल नाही. बऱ्याच वेळा आपण ज्या गोष्टीच्या मागे लागतो पण ती मिळत नाही, ती आपल्याला नकोच आहे अस सांगत राहतो. ते सांगण दुसऱ्यांसाठी नसून आपल्याच मनासाठी असत. अवनीच पण हेच झाल होत. मी मात्र संभ्रमात होतो. अभय-वासंतीशी या विषयावरती काहीच चर्चा झाली नव्हती त्यामुळे मला या विषयावरती बोलायला कठीण झाले होते. त्यांच मत काय आहे याची मला पुसटशी पण कल्पना नव्हती. तसे मला ते orthodox कधी वाटले नाही.
पण हा विषय नाजुक होता.
आणि मी अवनीला काय सांगतो यावर तिचं जोडीदारच (एक अथवा त्यापेक्षा जास्त )आयुष्य अवलंबून होत. मी गोंधळून गेलो होतो पण मला त्यावेळी " मैरा नाम जोकर" मधला जॉनी आठवला जो त्याला तरुण पणाच्या गोष्टी विचारल्यावर म्हणतो मै भी कभी जवान था !! मला वाटत मँचुरिटी यालाच म्हणत असावे.

मी अवनीला विचारल, " आपण या विषयावर थोड बौलायच का? "
अवनी- " अरे बिनधास्त काका."

मी - "आणि फक्त तू आणि मी. ते पण मित्र आणि मैत्रीण म्हणून.सुरूवात मी करतो म्हणजे तुला पटेल की तुझा मित्रच बोलतोय." 

अवनी- "चालेल रे काका"

मी - "अवनी, प्रेम आयुष्यमधली सगळ्याच सुंदर आणि आवश्यक गोष्ट  आहे. ते अस ठरवून करता येत नाही आणि ठरवल तरी टाळता येत नाही. गमतीदार संदर्भ द्यायचा असेल तर ते अपघातासारख असत, पण अपघातात आपल्याला दुखापत होउ नये म्हणून जपतो. इथे मात्र ते दुःख देत नाही, हव हवस वाटत.

अवनी शांत पणे ऐकत होती.
"पण जेव्हा आपण प्रेम करतांना चुकतो तेव्हा त्रास आपल्यालाच होतो."

अवनी- "आणि चुकीच्या माणसावर ?. . "

मी हसलो, " आवनी प्रेम करताना समोरचा माणूस कसा आहे हा प्रश्नच नसतो. फायदा आणि तोटा हो व्यवहार झाला, ते लग्न. आणि...

अवनी- "म्हणजे तुला म्हणायचं आहे की प्रेम आणि लग्न वेगवेगळ्या गोष्टी आहेत??"

मी - "हो खुप वेगळ्या!! प्रेम होवून जात कळत नाही विचार करता येत नाही पण लग्न विचार करुन कराव लागत. ती कमिटमेंट असते आणि प्रेम डेडीकेशन् .
प्रेमाला व्यवहार कळत नाही. पण तुला आत्ता लग्न नाही तर प्रेम समजावून घ्यायचय."

अवनी- "काका पण प्रेम लग्नामधे कन्व्हर्ट झाल पाहिजे ना??"

मी - "लग्न म्हणजे सफल प्रेमाच प्रतिक नाही. तो यशस्वी संसार झाला. नियमांचे चोख पालन केलेला. पण प्रेमात नियम नाहीत. " 

अवनी- " काका थेअरी कळली पण हे सांग आता करायच काय? कॉलेज मधे गेल्यापासुन हेच बघतेय की प्रेम म्हणजे एक फँशन्. कम्पल्सरी विषय कॉलेज मधला." 

मी - "पण तुला अडवतेय कोण? होणार असेल तर होवू दे. पण तु ज्या लेव्हलच प्रेम करू शकते ते समजु शकणारा व्यक्ती पाहिजे ना. "

अवनी- "म्हणजे निवड आली ना काका??"

मी - "अग पण दान देताना सुद्धा देणाऱ्या एवधीच घेणाऱ्याची लायकी बघायची असते. त्याला ते सांभाळता पण आल पाहीजे ना? तू मनापासून प्रेम करशील तर समोरच्या व्यक्तीला तसच  प्रेम करता आल पाहिजे. आणि त्याची लायकी हि looks, धमाकेदार व्यक्तिमत्व, सगळ्याच्या गळ्यातला ताईत असणे हे गुण नकोत. हे सगळ fashin किंवा fad असू शकते. खऱ्या प्रेमाला लुक्स ची नाही हूक्सची गरज असते. "

अवनी- "आता हा काय नवीन फंडा ??"

मी - "हूक्स म्हणजे मनाला अडकणारे हूक्स. मनाला connect करणारे, जोडणारे हूक्स. ते जास्त महत्वाचे. एकाद्या सुंदर मुलासोबत चार चौघांमध्ये फिरताना खूप अभिमान वाटेलाही स्व: ताचा, पण एकांतात त्या सुंदर मुलाने  तुला चांगलं वागवल पण पाहिजे ना. तुझ्या मनातल त्याला कळल पाहिजे, मनाला जपता आला पाहिजे. "
अवनी- "काका तू मला एक वेगळाच विचार दिलाय. मी असा विचार केला नाही कधी. आणि आजूबाजूला हे सगळ इतक विचित्र पद्धतीत present केल्या जात आणि परत घरात काही बोलता येत नाही . मनमोकळ बोलता येत नाही, आई-बाबांना सतत जाणून घ्यायचं असत कि माझे मित्र कोण? आम्ही कुठे जातो? मला कळत  नाही कि त्यांना माझ्याकडून सगळ काढण घ्यायचं असत कि माझे मित्र म्हणून ते सहज विचारत असतात."
मी - "अवनी, आई बाबा मित्र होण्याचा प्रयत्न करतील च पण प्रश्न हा आहे कि तुझे विचार काय आहेत? प्रेम अस fashion म्हणून करू नकोस, प्रेम अस college मधला compulsary विषय म्हणून करू नकोस, कोणाशी पैज लागली म्हणून करू नकोस, कोणाला दाखवायचं कि माझा पण BF आहे म्हणून करू नकोस. ते जेव्हा होईल तेव्हा होऊ दे.  ठरवून नको करून. ते जेव्हा अनुभवता येईल तेव्हा अनुभव घे घाई नको करू."

अवनी- "आई बाबा तुला पुढल्या वेळी घरात घेणार नाही. मला प्रेमाची महती सांगतोय."

मी - "अवनी ज्या गोष्टी मुळे संपूर्ण आयुष्य सुंदर होत  गोष्ट चुकीची अस कस सांगू तुला ?? लग्न झाल कि प्रेम करायला शिक अस सांगायला मी काही मूर्ख नाही. प्रेमावर आत्ता पासूनच विश्वास असला पाहिजे ते जेव्हा भेटेल तेव्हा भेटो !!!"

अवनी- "काका, हे तुझे विचार. मला वाटत नाही आई-बाबा पण इतके मोकळ्या स्वभावाचे असतील. "
मी - "प्रेम याबद्दल तुझे विचार जाणण्यासाठी आणि माझ मत सांगण्यासाठी मी तुला बोलत केल. मी तुझा काका होवून हे बोलू शकत नाही पण मित्राच्या वेशात येवून काकाचे विचार ऐकवू शकत नाही. तू प्रेम कर अस मी म्हणत नाही, करू नकोस अस पण नाही. माझ म्हणण एकच आहे कि प्रेम सुंदर असत आणि ठरवून करता येत नाही."
अवनी- "काका !! " अवनी मला येवून बिलगली. तिच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या . पण तिच्या cool  स्वभावामध्ये बसत नसल्याने ती रडत नव्हती. आणि प्रेम काय हे कळल म्हणून डोळे ओले होण्यापेक्षा प्रेम ऊमजल म्हणून तिने आनंदी व्हाव हि माझी पण इच्छा होती.

तिच्या आई बाबांना मला हेच सांगायचं होत कि तिच्या वयाला साजेसा सल्ला देण्याच्या नादात तिला प्रेम वाईट असत अस सांगू नका, प्रेम सुंदर असत आणि ते करण्याची ताकद तिला द्यायला हवी.

तिच्या वयात नाही पण अभय-वासंतीच्या वयात तर प्रेमाच महत्व आणि किंमत नक्कीच कळायला हवी. हो ना ??


अमित जहागीरदार
पुणे
ऑगस्ट २०१५

सोमवार, ५ ऑक्टोबर, २०१५

प्रपोज करण्याचे प्रकार -भाग ५ - कांदा पोहे

प्रपोज करण्याचे प्रकार -भाग ५ - कांदा पोहे

आता मात्र अति झालय. म्हणजे रोज रोज जर तेच होणार असेल तर मी शांत पणे बघू शकत नाही. मला याबद्दल काहीतरी कराव लागणारच. पण एकदम विषय तक्रारीचा नाही होऊ शकत पण मी सहन सुद्द्धा करू शकत नाही. स्वराली शी बोलाव कि नाही असा विचार करत मी जवळ पास २-३ आठवडे घालवलेत. पण मी हे रोज रोज बघत होतो आणि आणि माझ्या वागण्यातून तिला कदाचित कळलंच असेल.

रोज सकाळी स्वराली आली कि मी उत्सुकतेने तिच्या … … … डब्याकडे बघायचो आणि तिने आज काय आणल असेल हा विचार करायचो. सकाळी ८ वा आम्ही office मध्ये यायचो म्हणजे संध्याकाळी लवकर निघता  येईन मग नाश्ता office  मधेच करावा लागायचा. स्वराली माझ्या बाजूला बसायची म्हणून कधी कधी आम्ही डबा share  पण करायचो . पण मला हे कळायला फार जास्त दिवस लागले नाहीत कि स्वराली ६ पैकी ४ दिवस फक्त पोहेच आणते. मला जरा  कंटाळा यायला लागला होता. मी तिच्यासोबत नाश्ता करणे पण टाळू लागलो होतो.

हो हे अगदी खर आहे. स्वराली फक्त कांदा पोहेच आणते डब्यामध्ये आणि मला का ते कळत नाही. कुणाच्या डब्यात काय असावं याच्याशी मला काहीच देणे घेणे नाहीय पण रोज रोज तोच पदार्थ आणण्यामागे काय हेतू असावा हे मला शेजारी बसतो म्हणून कळायला हव ना !! मी आज हट्टाला पेटलो होतो.
" स्वराली रोज कांदा पोहेच कसे असतात ग ! तुला दुसर काही येत नाही कि काय ??"
" अरे अमित !! मला सगळ येत रे पण सकाळची सुरुवात आम्ही कांदा पोह्यानेच करतो"
" म्हणजे तुझा नवरा पण रोज हेच खातो ??"
" मी तरी एखाद्या दिवशी दुसर काही तरी आणते पण तो तर गेले ५-६ महिने म्हणजे लग्न झाल्यापासून तेच खातोय "
डोक्याकडे हात नेवून मी screw  धिल्ला झाल्याची खुण  केली तर ती लाडिक चिडली आणि बोलली कि आता गडबडीत आहे . lunch सोबत करू मी सगळ सांगते. मला कधी एकदा lunch  time  होतोय अस झाल होत.  पुष्कळ काम असल्यामुळे lunch  time  ने यायला जास्त वेळ घेतला नाही स्वराली direct  कॅण्टीन मध्ये आली.
कदाचित माझ्या चेहऱ्यावर उत्सुकता खूप ओथम्बुन वाहत होती. काही आढेवेढे न घेत ती बोलू लागली.

मी आणि सौमित्र एकाच college मधले, एकाच क्लास मधले. सौमित्र खूप लाजरा बुजरा होता पण माझ्याशी जरा जास्त जुळायच त्याच्याशी !! पहिल्या दोन वर्षात एकदाही नजरेशी नजर न भिडवणारा तो thrid  year पासून माझ्याशी बोलू लागला म्हणजे मीच त्याला बोलत केल.  कधी notes  घेण्याच्या बहाण्याने तर कधी एखाद्या program  च्या coordination निम्मिताने. सहसा अश्या लोकांचे दोनच प्रकार असू शकतात . एक म्हणजे खरोखर लाजरे किंवा खूप चालू पण सोज्वळ असल्याचा आव आणणारे. मला एक दोन भेटीतून कळल कि तो दुसऱ्या प्रकारातला नाहीय. एक छान सुंदर मैत्री करायला तेवढ पुरेस असत !!

मी ऐकत होतो स्वराली सोबत अगदी तिच्या college  मध्ये जावून त्यांच्या class  चा एक भाग झालो होतो मी !!

" सौमित्र आणि मी वरचे वर भेटू लागलो, वेळ घालवू लागलो, गप्पा वाढू लागल्या. घरात खूप कोड-कौतुक झाल्यामुळे तो खूप लाजरा झाला होता आणि मुलींशी स्वताहून ओळख करणे म्हणजे तर त्याला डोंगरा एवढ कठीण वाटायचं. माझ्याशी ओळख झाली आणि त्याचा तो confidence  थोडा वाढला मग त्याने त्याचे एक दोन प्रयोग पण केलेत. तरी माझ्याशी त्याची खूप खास मैत्री झाली. एकदम वाळवंटातून हिरव्यागार जंगल्यात आल्यासारखं झाल त्याच्या बाबतीत . मला नेहमी वाटायचं कि तो वाहवत जाईन आणि एक दिवस मला propose  करेल. फायनलला jobs  लागलेत तेव्हा तर जोडया लावा हा college  मधला सामूहीक खेळ झाला होता . अगदी betting व्हायचं यावर माझी जोडी कधी सौमित्रशी लागते याची सगळ्यांना घाई झाली होती पण आमच्या दोघांमध्ये असा काहीच नव्हतं. सौमित्र पण तस कधी बोलला नाही किंवा मला जाणवलं नाही."

"college  संपल्यावर घरी जात असतांना तो मला स्टेशन वर सोडायला आला होता. मग मीच त्याला विचारलं कि तू काही निवड केली नाहीस का कुणाची girlfriend म्हणून  ?? तो हसला आणि म्हणाला कि मला मैत्रीच  इतक सुंदर नात आत्ता कुठे उमगलंय. हेच enjoy  करू दे. प्रेम काय भेटेल जेव्हा भेटायचं तेव्हा. त्याच्या नादात  मला मैत्रीच नात गमवायच नाहीय .
इतके दिवस मी कधी विचार केला नाही पण त्याच्या त्या बोलण्याने आणि मैत्रीविषयी असलेल्या  मनातल्या शुद्ध भक्ती मुळे  मला त्याच्याबद्दल खूप वेगळा  विचार यायला लागले. शेवटी प्रेम म्हणजे तरी काय ?? एक उत्कट भावना आणि नंतर मैत्रीच ना. "
" मी नोकरी शोधण्यासाठी पुण्यात आली कारण सैमित्र पण पुण्यात होता . त्याची मदत होईल हा हेतू आणि माझ्या मनात त्याच्या बद्दल ओढ पण होती. तो मला सकाळी interview च्या ठिकाणी सोडायचा. सकाळी घाई झाली कि तो कधी कधी माझ्या साठी खायला बिस्कीट वगैरे घेवून यायचा. एक असाच खास दिवस होता तो सौमित्र ला सुट्टी होती म्हणून तो माझ्या सोबत आला होता. interview  च्या घाई मध्ये त्याने दिलेला डबा  मी खावू शकले नाही.  आणि दुपारी interview  झाल्यावर तो आणि मी एका निवांत जागी बसलो आणि मी डबा  बाहेर काढला. त्यात पोहे होते ते पण त्याने बनवलेले. मी डबा  खाल्ला नाही म्हणून तो थोडा  चिडला होता.
मी पोह्यांच कौतुक करत म्हणाले मला जर असे पोहे रोज  मिळणार असतील तर मी आयुष्यभर interview  देईन."
तो चिडला आणि म्हणाला कि  तुला नोकरी मिळावी अशी मी रोज प्रार्थना करतो आणि तू हे काय बोलतेय??
मी म्हणाले कि मला तर हे पोहे आयुष्यभर खावेसे वाटतात.
तो थोडा गंभीर झाला आणि बोलला कि आयुष्यभर थोडीच खाणार ?? आता मी देईन पण मग तुला तुझ्या नवऱ्याकडून खावे लागतील.
"मी थोड्या लाडिकपणे  म्हणाली कि मग मला पोहे आयुष्यभर खावू घालण्यासाठी तूच माझा नवरा हो ना. कठीण आहे का ?? "
"मी केलेलं अस भन्नाट proposal त्याच्या पचनी पडायला खूप वेळ लागला. पण तो लगेच राजी झाला. प्रेमाची भेट म्हणून मी त्याला पोह्याचा घास भरवला.

अशी आमची स्टोरी कांदा पोह्यांची . "


स्वराल्ली सांगून दमली नव्हती पण मी ऐकून थकलो होतो. पण एकदम तिच्या डब्यातल्या गरम गरम पोह्याचा सुवास आठवला आणि मन प्रसन्न झाल !!

खर तर कांदा पोहे म्हणजे arrange  marriage वाल्यांचा trademark. पण त्याची अशी सुंदर, मसालेदार आणि रंजक propose करण्याची गोष्ट मला कळली होती. आता मी स्वरालीच्या डब्यात पोहे बघून चिडत नाही पण तिला चिडवतो. तरी अजून मी तिच्या घरी येण्याच्या हट्टाला बळी पडलो नाही. अहो त्याच प्रेम जमल म्हणून  ते रोज पोहे खावू शकतात पण मला थोडीच जमणार आहे !!!! आमच्या प्रेमाला आणि संसाराला इडली, उपमा, थालीपीठ किंवा अगदी sandwich पण चालत !!!


अमित जहागीरदार
०२-०३ ऑक्टोबर २०१५
पुणे

रविवार, २६ जुलै, २०१५

तेरा साथ है तो ….

तेरा साथ है तो ….

शामलचा फोन आला जेव्हा आवेश meeting मध्ये होतो आणि मोठ्या तावातावाने काहीतरी बोलत होता. पण शामलचा फोन बऱ्याच दिवसांनी आला त्यामुळे त्याला घ्यावा लागला.
"तुला भेटायचं होत . संध्याकाळी office सुटल्यावर येते !"
"अग माझी meeting चालू होती आणि मी माझ वाक्य सुद्धा अर्धवट सोडून आलो. सगळ्यांना वाटत कि बायकोला हा इतका घाबरतो आणि बघतो तर तुझा फोन " आवेश  जरा चिडून बोलला
"जावू दे रे ! मैत्रिणीचा फोन घेतला तर इतका काय चिडतो ? आणि तशी पण मी तुला जवळ पास ३-४ आठवड्यांनी फोन करतेय"
"काम काय आहे ते सांगा madam !"
"ते संध्याकाळी बोलू ना यार !!"
"आता फोन ठेव आणि हो ऑफिस मधल्या वेळेतच ये ग बाई !!"
"बर साहेब "

शामलची त्याला तशी बऱ्याच दिवसांनी भेटणार होती. आवेश आणि शामल एकाच college मधले. काही common मित्रांच्या ओळखीने त्यांची भेट झाली होती. अभ्यासाचे विषय वेगळे, college च्या वेळा वेगळ्या आणि दोघांमध्ये हुशार कोण याची परीक्षा नसल्यामुळे ते बऱ्याच गप्पा मारायचेत . डिग्रीचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर आवेश पुण्याला नोकरीसाठी आला. शामल काही महिन्यांनी नोकरी शोधण्यासाठी आली आणि पुन्हा भेटी होऊ लागल्या. काही वर्षात तीच लग्न झाल पण नशिबाने तिचा नवरा पुण्याचाच होता. त्यांच्या भेटींची frequency कमी झाली पण mail ने काही न काही तरी संवाद व्हायचा.

संध्याकाळी शामल आली तेव्हा ती दोघे जवळच्या एका coffee shop  मध्ये गेले . गप्पांचा फड रंगणार कि लग्न झालेली मैत्रीण तिच्या संसारातल्या अडचणी सांगणार कि सासू चे गाऱ्हाणे सांगणार ? पण इतक्या दिवसांनी भेटणार असल्यामुळे काही तरी serious  असणार असा विचार आवेश ने केला .

शामल आली आणि बोलत सुटली. तिच्या बोलण्याच्या छंदापायी कधी कधी वाटत कि शामल ला जर limited talktime मिळाला असेल बोलण्याचा तर हा तिचा तिसरा lifetime recharge असेल.

office  चे तीन चार विषय चघळून झाल्यावर तिला आवेश ने आठवण करून दिली कि काही तरी महत्वाच बोलाण्यासाठी ती आलीय.
" तुला आठवत का आपण लास्ट टाईम कुठल्या नाटकाला गेलो होतो? किंवा एखादा गाण्याचा program ??
सांगलीला असतांना किती enjoy  करायचो ना आपण . नाटक काय, गाण्याचेप्रोग्राम काय,  कवितांच्या मैफिली काय ? नुसती धम्माल. लग्नानंतर एकदा गेलो तर माझा नवरा तर आलाच नव्हता आणि तुझ्या बायकोने एका गाण्यामध्ये १०० रुपये याप्रमाणे तुझ्याकडून २३०० रुपयांची shopping करून घेतली .

हे अगदी खर होत त्यामुळे आवेश पण थोडा ओशाळल्या सारखा झाला. आवेशच्या बायकोला संगीताचा गंध नाही. मग तिने हा असा सौदा केला होता. पण आवेश ला या विषयावर बोलायचे नव्हते.
"बर हा विषय आहे का आपल्या भेटीचा?? "

"नाही रे !! कधी कधी वाटत किती सोप्प असत ना सगळ ?? माझ्या नवऱ्याला यातलं काहीच आवडत नाही म्हणून तो माझ्या सोबत कधीच येत नाही. मी एकटी हे enjoy करू शकत नाही म्हणून मला जायलाच मिळत नाही . साथीदार म्हणून त्याची साथ फक्त संकटात नाही तर आपल्याला जे मनापासून आवडत ते करण्यात पण मिळावी ना. माझी हि अपेक्षा नाही कि त्याने माझ्या level  ला येवून ते enjoy कराव पण कमीत कमी  सोबत असावं. मला कविता आवडतात म्हणून एक कवितांच छान पुस्तक द्यावं, गाण्याच्या program  चे तिकीट काढून छान रविवारचा बेत करावा पण नाही. "

आवेश मनातल्या मनात विचार करत होता  कि आज बहुदा नवरा या विषयावर मोठ्ठ पुराण लिहिल्या जाणार. पण शेवटी ती बोलणार तरी कुणाकडे . असले विषय नातेवाईकांमध्ये काढता येत नाहीत. उगाच बोभाटा होतो.  मैत्रिणी असल्या कथा kitty पार्टी मध्ये सौस ला लावून खातात त्यामुळे आवेशसारखा नुरुपद्रावी मित्र बरा नवऱ्याचे  गाऱ्हाणे सांगायला. पण आज शामल जास्त जोमाने बोलत होती. तिच्या मनावरचा घाव तर जास्त खोल होता अथवा संसारातल्या नेहमीच्या घडणीचा घाव असावा . एकाच ठिकाणी वर्षोन वर्षे टोचणारी सुई एवढे वार कधी कधी एकाद्या चाकूच्या जखमे समोर जास्त वाटतात.

आवेशने गंभीर व्हायचं ठरवलं आणि तीच बोलण ऐकू लागला.
"तुझ्या नवऱ्याला  माहित आहे तू इकडे आलीस ते ??"
"हो मग मी सांगून आलेय आणि कदाचित त्याला कल्पना पण असेन कि मी हेच बोलणार आहे!"
"अरे व्वा , म्हणजे आग already  लागलीय आम्ही फक्त बंब घेवून जायचं !! शामल , तुला जे हवाय ते रास्त आहे नवऱ्याने तुझ्या सोबत यायला हव अगदी नाटकाला सुद्धा. मला मान्य आहे अग पण त्याला ते enjoy पण करता अल पाहिजे ना. त्याच मन त्या सगळ्या मध्ये गुंतलं पाहिजे ना."
"अरे पण माझ्या साठी आला तर काय बिघडत ?"
"शामल विषय त्याच्या आवडीचा आहे आहे त्याच्या  वेळेचा नाही. आणि तुला आठवत असेल तो आला पण होता आपण दोघे एका कविता वाचनाच्या कार्यक्रमाला त्याला घेवून गेलो होतो. काहीही गंध नसतांना तो आला होता आणि त्याने पूर्ण वेळ तुला दिला होता
पण कार्यक्रम संपल्यानंतर तुला बोलला होता कि हा कदाचित शेवटचा प्रोग्राम असेल माझा. आणि घरी येतांना त्याने माझी खूप थट्टा  पण केली होती .

"शामल, साहित्य हा त्याच्या आवडीचा विषय नाहीय हे तुला काबुल कराव लागेल पण त्यानंतर आपण एक दोन कार्यक्रम attend केलेत तो आपल्यासोबत आला नाही पण त्याने तुला कधी अडवलं पण नाही. हो पण आता तुझा हा हट्ट असेल कि त्याने याव आणि सोबत बसून स्वतावर अत्याचार करून घावे तर मग हा अन्याय आहे ना. आणि त्याने तुला कधी थांबवले नाही ना !!"

शामल शांत झाली होती तरी पण तिच्या मनातले विचारांचे वादळ शांत झाले नव्हते.
आवेशने मी उगाच तिला चिडवण्यासाठी बोलत होतो, " काय मग आज काल  facebook ची profile  कुठली ??
आणि हो आज च्या आपल्या coffee चे update  नको हा टाकुस fb  वर. मला घरी explaination द्यावं लागत.
" काही पण ? मी तुझ्या बायको ला ओळखते. तिला सांग न मी आले होते भेटायला म्हणून. "
अग बाई अस काही करू नको. मी तिला सांगितलं नाहीय कि मी तुला भेटायला आलोय. "

खर तर आवेशाला स्पष्ट सांगितलं सांगायचं होत कि त्याच्या  बायकोला शामलशी तिच्याशी अथवा कोणताही मैत्रिणीला भेटायला आवडत नाही. आवेशने विचार केला कि एक चांगली comparison पण सापडली.

"शामल, कधी अभयने तुला अडवलं का ग माझ्या शी भेटायला ?? मला आठवत कि लग्न झाल्यावर पहिल्यांदा तुम्ही दोघे माझ्याकडे आले होते. अभयने भरपूर गप्पा मारल्या होत्या अगदी मनमोकळ्या. त्याला काहीच प्रोब्लेम नव्हता या गोष्टी चा कि मी तुझा मित्र आहे. त्याला आपण कितीतरी गोष्टी सांगितल्या - आपण बघितलेले pictures , नाटकं, गाण्याचे प्रोग्राम्स, shopping….  पण कुठेही अभयच्या चेहऱ्यावरून वाटल नाही कि त्याला या कशात काही वावग वाटत होत."

"--"
"अग कधीतरी हा पण विचार करून बघ कि जर अभयला हे सगळ पटल नसत मग तू काय केल असत ?? लग्ननंतर त्याने जर मित्रांशी बोलण, त्यांच्या contact मध्ये राहू  नकोस असले नियम केले असते तर तू काय केल असत. आणि direct त्याने नाही म्हटलं असत तर वेगळी गोष्ट पण मनातल्या मनात हे ठेवून तो फक्त तुला judge करत बसला असता तर तू काय केल असत. मी हे म्हणत नाहीय कि असा स्वभाव असणे हि चांगली गोष्ट आहे पण फक्त या कारणासाठी तुमचे releations बनायला वेळ लागला असता. अभय तसा नाहीय ही  खूप चांगली गोष्ट आहे . तू त्याला सांगून मला भेटायला येवू शकते, माझ्यासोबत नाटकाला जावू शकते या गोष्टी कडे बघ. तो तुझ्या सोबत नाटकाला  येत नाही हा प्रोब्लेम नाहीय."
"मी असा विचार कधी केला नाही "
"मला माझ्या बायकोला सांगता पण येत नाही कि  मी आत्ता तुझ्या सोबत आहे. तिला संशय येईल फक्त हि भीती नाहीय पण ती अस्वस्थ होते तिला सगळ सांगाव लागत मग तिला थोडं हायस वाटत. याला प्रेम पण म्हणता येईल किंवा मला मिळणाऱ्या स्पेस बद्दल दु :ख पण करता येईल. मुख्य प्रश्न तिच्या comfort चा आहे. "

एक प्रकारे आवेशच पण मन मोकळ झाल. शामल शांत झाली होती. अभय सोबत येत नाही पण आपले छंद जोपासायचे स्वातंत्र त्याने आपल्याला दिलाय याची जाणीव तीला पहिल्यांदा झाली. आणि या एका गोष्टीसाठी  अभय वाईट किंवा चुकीचा ठरत नाही. आवेश तर त्याला space  मिळत नसताना सुद्धा कधी complaint करतांना दिसत नाही. ती विचारात गढून गेली आणि वाफाळलेली coffee त्यांनी cold coffee म्हणून घेतली.

बऱ्याचदा आपण फक्त याचा विचार करतो कि आपला जोडीदार कसा नाहीय ? तो अजून काय करू शकतो ज्याने आपल्याला छान वाटेल पण जिकडे आपण compare करतो त्या प्रांतांत कमी पडणारा आपला जोडीदार एकाद्या वेगळ्या प्रांतात मोठ्ठी मजल मारतो. फक्त आपल्याला कळत नाही. विश्वास ठेवावा लागतो आणि वेळ पण द्यावा लागतो. थोडीशी possesive वाटणारी बायको पण  घरच्या जवाबदार्या आणि तिची नोकरी सांभाळते. आणि बरेच काहि. प्रश्न हा आहे कि बायकोवर अपेक्षांचं ओझ लादाव कि जे ओझ ती आधीच वाहतेय त्यात तिला मदत करावी ?? आपले छंद जोपासता येतात याचा आनंद मानावा कि त्यावेळी आपला जोडीदार सोबत असावा , मग अगदी त्याला ते आवडो अथवा न आवडो !! हट्ट कशाचा करावा हा प्रश्न आहे.

प्रश्न फक्त आवेश आणि शामलचा आहे का ???


अमित जहागीरदार
२६ जुलै २०१५
पुणे

( संपूर्ण काल्पनिक कथा )

शनिवार, १८ जुलै, २०१५

प्रपोज करण्याचे प्रकार -भाग ४ - फरक स्पष्ट करा

प्रपोज करण्याचे प्रकार -भाग ४ - फरक स्पष्ट करा

गोष्ट तशी बरीच  जुनी आहे. मी चिंचवडला आपल्या मित्रांसोबत राहायचो. मी, आशिष आणि प्रणव !! आमच्या flat वर नुस्ता धिंगाणा चालायचा. सोबत बाहेर भटकण असो वा picture बघण असो सगळ्यांची फक्त धमाल  असायची. एक वेगळी धुंदी असायची नुस्ती वयाची नाही तर या उमेदीची लहर पण असायची कि आता पुढली  आयुष्याची पायरी चढायची आहे. आणि पुढल्या पायरी नंतर सगळ सगळ आपल्या पायावरती लोळण घालेल अशी भाबडी आशा !! आता मागे वळून पाहिलं कि  वाटत सगळ खरच इतक सोप्प असत तर??आयुष्य म्हणजे बर्फावर घसरण्या सारख ! त्यात एक वेगळी नशा त्या वेगाची, पण शीतल वाटणारा हाच बर्फ भाजण्या इतकाच दाह देवू शकतो. पण तेही वय असतच ना  बागडायचं !!
आम्ही पण तसेच होतो, आपल्या आपल्या कामांमधून वेळ काढून धम्माल करायचो. flat  वर येणाच्या वेळा  जरी वेगवेगळ्या असल्या तरी मिळेल तो वेळ आम्ही मनसोक्त enjoy केलाय. मला गुरुवारी सुट्टी असायची आणि बाकीच्यांना रविवारी त्यामुळे flat वर दोनदा "सेलिब्रेशन" व्हायचं.

माझी आणि प्रणवची office  म्हधून येण्याची वेळ जरा सारखी असायची त्यामुळे कुठे फिरायला जाणे छोटे मोठे शोप्पिंग आम्ही सोबत करायचो. पण गोष्ट तेव्हा रंग बदलू लागली जेव्हा प्रणव थोडा उशिरा यायला लागला. office मध्ये जास्त वेळ बसून खुर्च्या "गरम" करणे यावर यथेच्छ टीका करणारा प्रणव यायला बराच उशीर करू लागला. मी त्याला एक दोन वेळा विचारले पण मला काही उत्तर मिळाले नाही. मोघम उत्तर देवून त्याने वेळ मारून नेली. मी पण जास्त पाठपुरावा केला नाही. पण office मधल काम वाढल असा निष्कर्ष माझ्या मनाला पटत नव्हता.

काही दिवसांनी  J M रोड वर फिरतांना संभाजी parkच्या प्रवेश दाराशी प्रणव मला दिसला. ऑफिसचे काही मित्र आणि "मैत्रिणीं" सोबत !! मी मुद्दाम जावून त्याला तिथे भेटायला गेलो. त्याने माझी ओळख करून दिली. सगळ्या मैत्रिणींमधून एका गोड हसणाऱ्या आणि उगाच थोड लाजणाऱ्या मुलीची ओळख त्याने मैत्रीण म्हणून करून दिली- गीतिका. मी त्याच्या कडे बघून थोडस हसलो पण त्याने चेहऱ्यावरचे भाव बदलू दिले नाहीत.बाकीच्या मित्र-मैत्रीणींनी मला अवांतर विषयावरती प्रश्न विचारले पण गीतिका शांत होती.
माझ्या सोबत माझ्या college  एक मित्र होता मी त्याला म्हटले सुद्धा कि प्रणवची गाडी रुळावर धावणार.
त्याला पटत नव्हत पण मी त्याला सांगितले कि माझ्या प्रदीर्घ अनुभवावर विश्वास ठेव. आम्ही पैज वगैरे लावण्याचा विचार नाही केला, पण थोडे दिवस थांबण्याचे ठरवले. सगळ्या मुलींची नुसती नावं  सांगितली आणि त्या एका मुलीची ओळख मैत्रीण म्हणून करून दिली हा संदेश माझ्यासाठी नव्हता तर तिच्यासाठी होता एवढ न कळायला मी काही कच्चा लिंबू तेव्हाही नव्हतो !!

रात्री flat  वर पोहोचलो पण मी प्रणव कडे हा विषय काढला नाही किंवा त्याला चिडवायचे म्हणून बाकींच्या partners ला देखील काही सांगितले नाही. पण त्याच्या वागण्यात बरेच अमुलाग्र बदल जाणवत होते. स्वतः साठी चार वस्तु घेण्याचा बेत करून shopping ला जाणारा आणि एकही वस्तु न घेता परत येणारा प्रणव मोठ मोठ्या bags घेवून घरी येवू लागला. आरश्या समोरचा वेळ वाढला, पर्फूमस्च्या बाटल्या वाढल्या, "बाकीच्या" बाटल्यांमधला रस कमी झाला. फोनवरची संभाषण वाढले आणि असले वार्तालाप बाहेर होवू लागले. प्रणव office मधे थांबला की किती काम असत याचे तपशील देऊ लागला, कुणी मागितले नसताना. मला माहीत असलेल्या गोष्टीचा बभ्रा न केल्यामुळे त्याला कोणी चिडवत पण नव्हत. पण अश्यावेळी मित्रांनी केलेली थट्टामस्करी छान वाटते. पण प्रणवला हे सगळं अनुभवता नाही आल माझ्या "मुसुद्दीपणाच्या" भुमिकेमुळे.

 आणि एके दिवशी flat आम्ही दोघेच असतांना त्याने मला एक प्रश्न विचारला.
" अम्या, आवडणे आणि प्रेम यामधला फरक काय??
मला संदर्भ कळला होता पण मी प्रश्नावर फोकस करायचे ठरवले.
" प्रणव, अगदी परीक्षे मधला प्रश्न वाटतोय. फरक स्पष्ट करा .
"सांगणार आहेस का ??"
" प्रयत्न करतो सांगण्याचा. एखादी व्यक्ती आवडते तर आपल्याला ती छान वाटते आपण तिच्या कडे बघत बसतो. म्हणजे उदाहरण द्यायचं असेल तर सिनेमा मधली heroine ! आपल्याला ती आवडते आपण तिचे pictures कित्येकदा बघतो पण ती एखाद्या हिरो सोबत नाचते, प्रेम करते याच आपल्याला दु:ख होत नाही.
पण प्रेम असाल कि आपल्याला वाटत कि आपल्या जवळ असावी आपल्या आयुष्यात असावी आणि आपण तिच्या !! मला तुला हाच फरक सांगता येईल. "
मी एवढ बोलून विषय संपवला, आणि तो पण झोपी गेला.

साधारण एखाद्या आठवड्यानंतर त्याने मला ती धक्कादायक बातमी सांगितली . ती गोड हसणारी मुलगी त्याच्या आयुष्याचा एक भाग होती . मनमुराद मिठी मारून त्याने मला धन्यवाद दिलेत.
मी अचंबित झालो आणि म्हटले, " अरे मला कसले thanks  म्हणतोय ?? मी तर तुम्हा दोघांना कधी भेटलो पण नाही. एकदाच तू माझी ओळख करून दिली… . "
" ती ओळख आणि मग तू सांगितलेला प्रेम - आवडणे हा फरक. त्यासाठी thanks . आधी मी खूप गोंधळलो होतो- मला ती आवडते कि माझ तिच्यावर प्रेम आहे. आणि या दोन्ही गोष्टींमधील सीमारेषा खूप पुसट असल्यामुळे मला काही  कळत नव्हते. मलाच माझं उत्तर सापडत नव्हत. एकदा आम्ही सगळे canteen मधे बसलो होतो. गप्पांच्या ओघात पुढल्या आयुष्याचे plans, लग्न , जोडीदार हे सगळे विषय निघालेत. त्यावर सगळे बोलत होते  आणि गीतिकाने तिच्या लग्नाचा विषय घरी निघतोय हे सांगितले आणि मी अस्वस्थ झालो. आवडणे आणि प्रेम यामधला तू सांगितलेला फरक मला जाणवला.  मी त्या संध्याकाळीच तिला propose केले. तीने मलाच विचारले की मी तुला आवडते की फक्त एक सवय झालीय माझ्या असण्याची. मी आवडणे- प्रेम मधला फरकाचा फंडा सांगितला. मला तू आवडतेस हे तुला पण माहित आहे पण तू माझी व्हावी असा विचार मनात येवू लागलाय. याला प्रेम म्हणतात अस मला वाटत.  तुला काय वाटत ?? तिने उत्तर दिल नाही फक्त घरी येण्याच आमंत्रण दिल."
" अरे वा म्हणजे आमची शिकवणी कामास पडली."
" मग . ती पण आयुष्यभरासाठी !!"

त्याने propose  कसे केले याचा किस्सा साधा होता पण  "फरक स्पष्ट करा" हा उसना घेतलेला फंडा वापरून केलेलं हे propose थोड वेगळ होत. प्रेम तर फुललेल होतच पण त्याचा बहर दोघांना दिसायचा बाकी होता. कधी कधी दोघांच्या  मनातल्या गोष्टी बाहेर यायला फक्त एक क्षण हवा असतो. त्या क्षणाला  कसे सजवायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. प्रेम असेल तर ते वाट शोधून बाहेर येणारच फक्त तो क्षण जपण्यासाठी त्याला काहीतरी नाट्यमय गोष्टींमध्ये गुंफून ठेवावं लागत. मग आयुष्य भर ते क्षण जपता येतात !!


शाळेतल्या प्रश्नपत्रिकेमधला नेहमीचा प्रश्न - फरक स्पष्ट करा असा कामास पडेल अस कधी वाटल नाही.

- अमित जहागीरदार
१८ जुलै २०१५
पुणे 

गुरुवार, २ जुलै, २०१५

पहिली मैत्री(ण)

पहिली मैत्री(ण)

आता हा blog  वाचल्यावर माझे सगळे मित्र माझ्यावर धावून येणार. म्हणजे आम्ही तुझ्यासाठी मैत्रीच्या व्याख्येमधे बसत नाही का? आणि फक्त मैत्रिणीवर तुला लिहिता येत !! पण खुलासा आधीच केलेला बरा. मित्रांनो, तुमच्याशी झालेली मैत्री ठरवून केली नाही. अगदी तुम्हाला पण कळल नाही कि आपण कधी मित्र झालो आणि तेही इतके जवळचे !!असो मूळ गोष्ट मैत्रिणीची आहे. त्यामुळे तिकडे वळू या. 

मला सगळे तपशील देता येतील याची शाश्वती नाही. हि गोष्ट माझ्या college च्या वेळेची. मुलींशी मैत्री हा माझ्यासाठी "तेव्हा" कठीण विषय होता. मला जमले पण नाही आणि मी वेळ घालवला पण नाही . असली मजल मित्रांनी पण कधी मारली नाही तेव्हा आमचा द्रुष्टी"कोन " एकच  होता.

शमा साहनी !! नाव आज पण लक्ख आठवत. तसं सगळच आठवत पण कथा ह्या एका गोष्टीचीच होऊ शकते. थोडीशी modern, खडूस, दिसायला smart पण नुसत्या रंगांच्या नाही तर ढंगाच्या जोरावर मनाला भिडणार व्यक्तिमत्व !! आमची मजल कधी बोलण्या पर्यंत गेलीच नाही आणि आम्ही इतके प्रसिद्ध नव्हतो कि स्वताहून कोणी बोलायला येइल. आमच्या ख्यातीच्या गप्पा इथे नकोच मुळी.
शमा आणि माझी गाठ parking मध्ये पडली.  तिच्या गाडीवर बसून ( ती तिथे नसतांना) आम्ही टिंगल टवाळी करत होतो. तिच्या अचानक तिथे येण्याने आम्ही शांत झालो आणि तिने आमच्यावर काहीतरी joke केला. आमच्यातले तेज जागृत व्हायला तेवढ पुरेस होत. मग ठरलं कि आता या कन्येला थोड seriously घ्यायचं. त्या नंतर तिच्या घराचा पत्ता, येण्याच्या-बाहेर पडण्याच्या वेळा, यांची तपशीलवार माहिती गोळा  करण्यात आली. तिचा पाठलाग करण्याचे  plan आखण्यात आलेत. अश्याच एका महत्वाच्या मोहिमेची तयारी करतांना माझे आणि माझ्या परम मित्राचे बोलणे माझ्या "आजीने" ऐकले. आजी म्हणजे- बहिण. पण असले विषय असले कि आणि माझ्यावर लक्ष ठेवणे हा मुद्दा असेल तर मी तिला आजी म्हणणे पसंत करतो.

आम्ही code words मधेच बोलत होतो. जहाज, सावज, पाठलाग, मोहीम, मुहूर्त वगैरे वगैरे. पण समवयस्क असल्यामुळे आणि माझी सगळी जवाबदारी तिच्यावर सोडून आई बाबा office ला जात असल्यामुळे तिला हे सगळ कळायला जास्त वेळ लागला नाही. पुन्हा घरात आल्यावर मी अगदी निष्पाप मनाने माझी कामं करायला लागलो. बराच वेळ मला धास्ती होती कि तो विषय निघेल पण तसे झाले नाही. संध्याकाळी मी terrace वर गेलो तेव्हा ती चोरपावलांनी मागे आली. आता हा विषय निघणार आणि सगळा अहवाल जेवणाआधीच आई-बाबांपर्यंत पोहोचणार. मला संध्याकाळी जेवण मिळणार नाही अस मला वाटलं. नंतर तो long term म्हणतात तसा विचार केला तर घरातून बाहेर घालवणारा आघात पण होवू शकतो. मी सरळ जावून ताईला सगळ सांगणार होतो पण थोडी कूटनीती ते काय असते ना करूया असा विचार आला.
 
"तू दुपारी मित्राशी काय बोलत होतास ?"
"काही नाही. असेच college चे विषय होते." 
"काय सावज?मोहिम?"
मी खिंडीत तर सापडलोच होतोच पण रस्ता अरूंद आणि निसरडा होत चालला होता.

ताईने आत्मविश्वासाने पुढला आरोप केला.
"पोरीचा विषय वाटतोय."
मी अजुनही पळवाटा शोधत होतो. मी काहि उत्तर देणार त्याआधीच दुसरा प्रश्नाचा वाग्बाण भात्यातून निघाला होता. शरपंजरीवर किती बाणांवर निद्रीस्त व्हायच हाच विकल्प माझ्यासमोर होता. माझ्या मनात असेच जडत्वाचे विचार येत होते.
तू काय केलेस माहित नाही. मी तुला याबद्दल दोष पण देणार नाही. या वयात अस वाटण स्वाभाविक आहे. पण हे प्रेम आहे की नुसत attraction ? की फक्त एखादी शर्यत किंवा अजुन काही. याला काही अंत आहे आहे का? एकदा मैत्री म्हणून जे छान नात असत तुही try कर. सगळीकडे फक्त एकच ध्येय नको.
पटवून पटवून किती पटवशिल?- १,२,३.....मैत्री मधे असे बंधन नाही. तुटण्याची भीती नाही. Impression मारायची गरज नाही. छान स्वच्छ निष्पाप मैत्री !!! 

हा असला विचार माझ्यासाठी नवा होता. पचायला पण कठीण होता. मी अवाक झालो होतो. 
काही दिवसांनी college चा एक समारंभात निवेदक म्हणून माझी निवड झाली आणि मुलींकडून शमा  होती. तिला तो पार्किंग मधला प्रसंग आठवला नाही पण माझ्या मनात त्या प्रसंगाच सावट अजूनही होत. कार्यक्रमाची तयारी नीट झाली, आमचं coordination  पण छान  होत. सगळ्यांनी त्याच कौतुक केल. मी जरा  सांभाळून बोलत होतो आणि मी वागण्यात कधीच तिला impress  करण्याचा प्रयत्न केला नाही. मग college  च्या गप्पा, छंद, घराच्या गोष्टी बरच काही share  केल.  त्यातलं सारख आणि वेगळ यावर चर्चा झाल्यात.  भेटी वाढल्या आणि जवळीक वाढली. सोबतचे सगळे चिडवायला लागले पण माझ्यावर त्याचा फरक पडला नाही. अशीच एक अफवा तिच्या कानावर आली आणि मग ती खूप चिडली. पण जेव्हा मी तिला पटवून दिले कि मी फक्त तुझ्याकडे मैत्रीण म्हणून बघतोय आणि बघणार मग तिला पटले. आमची मैत्री फुलली आणि दिवसागणिक बहरली. 
मग नंतर एकदा शमा मला भेटायला  घरी आली होती तेव्हा ताईने सहज विचारल प्रगती काय पूढे? मी तिला सांगितलं हो आहे ना ! आम्ही खूप चांगले मित्र  आहोत. ती माझी शुद्ध मैत्रीण आहे ! पहिली  मैत्रीण ! Thanks ताई. तु चार खडे बोल सुनावले म्हणून मी खूप वेगळा विचार केला. यानंतर कुठली पण छान मैत्री फुलली कि मी ताईला फोन करून सांगतो. त्यावेळी जर ताई मैत्रीण होवून वागली असती तर मला या विषयात मदत केली असती. पुढली story ने कुठले वळण घेतले असते माहित नाही. पण ताईने वेगळा पर्याय सुचवला. त्याने माझा द्रुष्टीकोन बदलला.

सगळेच बोधामृताचे धडे आयुष्य घडवण्यासाठी नसतात काही आयुष्य सुंदर बनवितात. आणि मैत्री शिवाय सुंदर गोष्ट नाही. मैत्री आयुष्यभर पुरते !!

(ताईने दिलेला "डोस" आणि एक शुद्ध मैत्री(ण ) हे खर आहे बाकी संदर्भ नावासहित जुळवले आहेत. शोध घेवू नका. आताच्या ढीगभर मैत्रिणींमध्ये मधून शोधता येणार नाही.)
 
अमित जहागिरदार
२७-०६-२०१५
मुंबई -पुणे प्रगती एक्सप्रेस्

ता क - माझ्या बायकोला हि गोष्ट अजून detail मध्ये माहित आहे म्हणून तिला काही विचारू नये !!
 

सामुहिक काडीमोड

सामुहिक काडीमोड

मस्त पाऊस पडतोय , डोंगर ढगांनी माखून गेलेत, नद्या नाले पाण्याने नाहून गेलेत आणि अश्या romantic वातावरणात मला हाच विषय सुचवा ?? कारण हेच तसं !  बर हा विषय सध्या दिसणाऱ्या घटस्फोटाच्या trends शी संबधित नाही.

मागल्या आठवड्यात नागपूरहून येतांना train मध्ये एक तरुण तरुणींचा मोठ्ठा group होत. साधारण ६०-६२ वयाचे असतील पण एकंदरीत उत्साहावरून असे वाटत होते की अगदी collegeची एखादी सहल असावी. ६ आजोबा आणि ७ आजी होत्या. आमच्या दोघांच्या seats त्यांनी काबिज केलेल्या दोन कुपेमधेच होत्या. एका आजोबांनी होणाऱ्या त्रासाबद्दल अगदी प्रवास चालू झाल्यावरच दिलगिरी व्यक्त केली.
"अहो आजोबा तसं काही नाही. तुम्ही enjoy करा आणि त्रास  कुठे होतोय !!"
आजोबा म्हणाले, " अरे आम्ही अजून दंगा चालू कुठे केलाय ??"
त्यांच्या असल्या बोलण्याने खर तर आम्हाला खूप काळजी वाटत होती. दिवसभराच्या दगदगीमुळे आता कधी झोपतोय असं झाल होत.
पुढल्या संभाषणातून कळल की हा group नागपूरच्या एका शाळेचा आहे.  १९७१-७२ ला दहावी पास झालेल्या मुला मुलींचे गेट-टुगेदर पुण्याला plan केल होत. नागपूर, मुंबई आणि अजून एक दोन शहरातून हि फौज उद्या पुण्याला पोहोचून २ दिवस मस्त धम्माल करणार. कुणी त्या वर्गाचे विद्यार्थी होते तर कुणी आपल्या जोडीदार बरोबर आले होते. आता आमची चांगली गट्टी जमली होती. वयाने म्हातारे असूनही कुठेही तब्येतीच्या तक्रारी आणि आमची-तुमची पिढी या विषयांना थारा नव्हता. पण जशी रात्र होत होती तसे विषय बदलत होते. आता मी आजोबांच्या group मध्ये आणि बायकोने आजींच्या group मध्ये गप्पांचा रतीब चालू केला होता. विषय बायको वर येवून ठेपला आणि सगळे आजोबा एक साथ पेटून उठले. जो तो बायको या विषयावर तोंड भरून बोलत होते.
जोशी काका खूप गप्प होते, ते आधी पण बोलले नाही आणि बायको या विषयावर पण नाही बोलले. सगळ्यांची निजानीज झाल्यावर मी आणि जोशी काकाचं जागे होतो. बिछाना टाकून झाल्यावर मी आणि काका बोलायला लागलो. मी मगाशी त्यांना observe करत होतो हे काकांना कळल होत. आता काका बोलायला लागले होते. बायको या विषयावर झालेला परिसंवाद काकांना आवडला नसावा असा कयास होता. अनोळखी व्यक्ती सोबत आपण काही खासगी आणि विशेष बोलायला मनावर दडपण येत नाही. काका बोलायला लागले.

" माझं लग्न २३ व्या वर्षी झाल, बायकोच वागण घरच्यांना पटायचं नाही म्हणून  मी दुसऱ्या गावात बदली करून घेतली. तरी पण तिच्या वागण्यात जास्त फरक पडला नाही. मुले झालीत संसार म्हणायला पुढे सरकत होता पण तिच्या वागण्यात जास्त फरक पडला नाही."
"- "
" थोडासा पण वाद झाला कि माहेरी जायचं आणि घरच्यांना काही पण कारण सांगायची. अगदी माझ बाहेर काही प्रेम प्रकरण आहे या पासून ते मी वेशिपार जातो ……
आधी मी जोमाने भांडायचो मग ती घरी यायला अजून उशीर करायची. दिवसांच्या गोष्टी आठवड्यामध्ये आणि मग महिन्यांमध्ये गेल्यात. मुल लहान असतांना सुद्धा हे प्रकार घडलेत. दुध पिण्याऱ्या बाळाचे हाल बघूनही कधी  तिच्या मनाला पाझर फुटला नाही."
" हे सगळ मी निमूट पणे सहन केल. माझ मन, माझे छंद, माझ आयुष्य, माझे ध्येय ह्या सगळ्या गोष्टी अस्तित्वात पण होत्या असे कधी वाटले नाही. दिवस न रात्र एक संघर्ष होता जो मी अनुभवत होतो. "

" काका हे खूप भयंकर आहे !! तुम्ही सहन … "

" सहन करण्याशिवाय काय पर्याय होता?? मुले असतांना कुठे जाणार ?? आई जरी आईच कर्तव्य पार पाडत नव्हती मी बाप म्हणून सगळ बघायला हव ना !! मी आई आणि बाप दोन्ही झालो पण माझ्या तला नवरा कधीच धारातीर्थी पडला होता. संसार फुलायायाची स्वप्न बघितली पण रात्रीला गंध देणारी ती फुले शृंगाराची नव्हती तर माझ्यातल्या प्रियकराच्या प्रेतावर टाकलेली होती."

"-"
" पण ती गेली तेव्हा मी सुटलो. आता जोडीदाराची गरजच नाही पण मन प्रसन्न ठेवायला खूप कारण आहेत. त्यामुळे मी बायको या विषयवार काहीच बोललो नाही."

मी सुन्न होईल ऐकले पण मला बऱ्याच वेळ झोप आली नाही. सकाळी पुण्याला उतरून घरी जातांना बायकोला हि गोष्ट सांगणार तर taxi मध्ये बसल्या बसल्या बायकोने खांद्यावर डोके ठेवले. मला वाटले थकली असेन प्रवासाने.
" काय झाले ? थकली का ??"
" तू खूप छान आहेस"
" बाप रे काय झाले ?? शोप्पिंग ला जायचं का ??
" नाही रे !! तू माझी खूप काळजी घेतो. "
" नीट सांग !! कौतुक करतांना पण दाखले दे , बाकीच्या वेळी देतेस तसे !!"
" गाडी मध्ये त्या हिरव्या साडीतल्या आज्जी आठवतात ?? त्यांनी तुला लोणचे आणि चटणीचा आग्रह केला होता ??"
" हो पण त्यांचा आणि माझ्या चांगल असण्याचा काय संबंध?? "

"त्या पटवर्धन आजी !! काका आले नाहीत कारण त्यांना अस गेट टुगेदर ला जाणे पटत नाही. आजींना गाण्याची वाचनाची खूप आवड ! त्यांच्या लहानपणी त्या गाण शिकल्या आणि शाळा -college मध्ये सगळ्या समारंभात गायच्या पण ! आजोबांनी लग्न झाल्याबरोबर आजींनी सोबत आणलेली पेटी दुसऱ्यादिवशी भंगार मध्ये विकली. गाणे बंद झाले , इतकेच नाही तर गुणगुणणे पण बंद झाले. स्वर रुसलेत शब्द पण हरवले. संसार पुढे ढकलायचा म्हणून काकूंनी सगळं सोडले. तरी पटवर्धन आजोबा बदलले नाहीत. मन जुळण्यासाठी इच्छा आकांक्षा आणि संवेदनांची आहुती देवूनही संसाराचा तो  दाह सहन करत आजी आज पर्यंत जगत आल्यात. पण खर जगल्या की श्वास घेवून दिवस काढले. आज सगळ्या जवाबदाऱ्यातून मुक्त होवूनही त्या नवरा या पाशात गुरफटतल्या आहेत. समाज काय म्हणेल हा विचार नसता तर गाण्याच्या साहित्याची बोली होण्याचा वेळेत मी निघून आली असती अस म्हणाल्या. मुले मोठी झाली कि त्यांची लग्ने झालीत कि अथवा संसार मार्गी लागली कि मग सोडून जावू. खर्जातला का होई ना पण एक सूर लावून बघू असा विचार केला. पण आता तेही शक्य नाही. सहवासात नि:प्राण वस्तूंमध्ये जीव जडतो. इथे तर एक माणूस आहे - जन्मभराच्या सोबतीचा !!"

खूप बोलल्या आजी !! त्याचं दु:ख बघून मला रात्रभर झोप नाही लागली . किती भयंकर आहे हे ??

मी पण सुन्न झालो !! मी बायकोला जोशी आजोबांची गोष्ट सांगितली. आज जेव्हा कुठल्या तरी शुल्लक कारणावरून घटस्फोटाच्या गोष्टी ऐकायला मिळतात आणि ही लोक आयुष्यभर नुसती सहन करतात. वाटत त्यांना अस वेगळ होण्याची गरज पण होती !!

आता वाटायला लागलाय कि असे किती जण असतील ज्यांना सोबत राहण म्हणजे मरणप्राय यातना असतील आणि फक्त लोक काय म्हणतील किंवा
 जवाबदाऱ्या या गाष्टींमुळे ते फक्त एका छताखाली राहत असतील !! फक्त मनातल एकदा ओठावर येण्याची ती काय वाट पहावी लागेल !! ती हिम्मत आणि आपल स्वतःच आयुष्य  जगण्याच्या अधिकाराची जाणीव.उगाच समाजाने टाकून दिलेल्या बेडी मध्ये आयुष्यभर अडकून बसायच. आणि दुर्भाग्य म्हणजे तो समाज नंतर सगळ सावरायला येतोही पण संसाराची नाही तर शरीराची राख!! 
जन्मभर नवरा आणि त्याच्या घरच्यांसाठी अविरत झडणारी स्री असो वा बायकोने कधी साथ दिली नाही म्हणून कुढणारा पुरूष असो. प्रश्न का सोडायच जोडीदाराला हा नाहीय. कारण नाही तर सोसल्याची भावना पराकोटीला गेली की आणि सोबत राहण म्हणजे फक्त एका छताखाली राहण झाल की विचार करावा. संवादच होत नसेल तर वाद न होणारा संसार हा आदर्श संसार होवू शकत नाही. वेगळ्या वाटा शोधायला काय हरकत आहे मग???

सामुहिक काडीमोड असा एक program करायला पाहिजे अश्या सर्वांसाठी!!
एखाद मैदान मिळेल का भाड्याने ??


अमित जहागीरदार
०२-०७-२०१५
पुणे

शुक्रवार, १९ जून, २०१५

त्या काकांचे उपकार

त्या काकांचे उपकार

मागल्या आठवड्यात भाचाआणि पुतण्याच्या दहावीचा निकाल लागला आणि मग ताई-वाहिनीशी बऱ्याच वेळ गप्पा झाल्यात  कुठला course करायला पाहिजे कशाला जास्त scope  आहे . आणि आमच्यावेळी जो प्रश्न विचारल्या जायचा नाही तो पण चर्चिल्या गेल्या. मुलांना काय आवडते ?? हा प्रश्न आमच्या वेळी नव्हताच  syllabus मधे. मार्क्सच्या नुसार कोणी काय करायचं ते ठरलेलं असायचं.

माझ मन भूतकाळात रमत माझ्या दहावीच्या रिझल्ट भोवती रेंगाळत होत. माझा result हा माझ्यासाठी ठीक ठाक होता. ना ख़ुशी ना गम . पण पुढे काय करायचं याचा  खरच विचार नव्हता केला.
" तू आयुष्यात पुढे काय करणार ??" हा प्रश्न कितीवेळा विचारल्या गेला असेल देव जाणे. interview मधला तर ठरलेला प्रश्न आणि त्यावर तुम्ही किती आत्मविश्वासाने नितांत खोट उत्तर देवू शकतात यावर तुमच select होण ठरलेलं असत. अरे आयुष्य किती मोठ ?? आणि खरच मोठ का ते पण माहित नाही. पण काय करणार ? ह्याचा विचार करत आयुष्याची मजा घालवायला नको.
मला हा प्रश्न अगदी आयुष्याच्या level  ला पडला नव्हता. पण दहावी  नंतर काय ?? हा प्रश्न होता. पुढला प्रश्न तिथे पोहोचल्यावर ठरवलं असत. दिशा ठरवली कि बर असत . प्रवासच ठिकाण अगदी  आत्ता पासून ठरवायला हा काही दिवसांचा प्रवास नाही ना !!!! असो  विषय phillosophy  चा नाहीच मुळी.

माझ्या result नंतर मला सल्ले देण्याऱ्या हितचिंतकांची रांग लागली होती. जे जवळचे कळकळीने सांगणारे होते त्यांनी मला काय जमेल, झेपेल आणि परवडेल याचा विचार करून सगळ्या options ची यादी तयार केली. आणि त्यातला निवडायला मदत पण केली. चांगली आर्थिक परिस्थिती खूप सारे प्रश्न आपोआप सोडवते पण तीच परिस्थिती चांगली नसेल तर आपल्या जवळ प्रश्न सोडवणारी किती आपली  लोकं असतात हे कळत. मला याचा प्रत्यय आला. जो तो आपल्या परीने मदत करत होता.
माझ्या समोर बरेच options होते पण सोप्पा म्हणून ११-१२ चा form भरून मोकळा झालो होतो. मोकळा कसला खूप साऱ्या विकल्पाचा वेढा पडला होता. डिप्लोमा करण्याचा पर्याय समोर होता जो बऱ्याच लोकांनी सुचवला होता. काही दिवसात science ची यादी आली आणि त्यात अगदी शेवटून दुसरा number  आला. माझ्या नंतरचा विद्यार्थी दुसऱ्या शहरात जाणार होता म्हणजे तसा मीच शेवटचा होतो.

एके दिवशी घरातले सगळे विषय चहासोबत चघळत होतो. चर्चा करता करता कधी ११ वाजले कळले नाही. बाबांचे एक मित्र घरी आलेत त्यांच्या मुला सोबत. तो मुलगा - आवेश माझ्या batch चाच होता दुसऱ्या शाळेतला. माझ्या पेक्षा एक टक्का कमी होता त्याचा पण काकांनी त्याच्या भविष्याचा विचार आधीच केला होता. commerce ला जायचं ठरलं होतं त्याचं, म्हणजे काकांनीच ठरवलं होत. त्यांच्या बोलण्यावरून आवेशचा या decision मध्ये मोठ्ठा सहभाग होता आणि तो म्हणजे ते follow करायचं. असो.

काकांनी आपले विचार प्रकट केलेत. माझ्या वरच्या जवाबदारीचे  विश्लेषण केले आणि माझ्या समोरच्या सर्व पर्यायांचे  पृथःकरण. मी डिप्लोमा केल्याने मला होण्याऱ्या फायद्यांची इतकी मोठी यादी माझ्या समोर कोणीच  ठेवली नव्हती. आणि आवेशसाठी पण हाच पर्याय निवडला असता असे म्हणून तर काकांनी आम्हाला निर्णयाजवळ जाण्यास मदत केली. मी काकांचे आभार मानले आणि विचार केला कि किती कळकळीने आलेत ते आणि समजवले पण !! मी त्यांना आयुष्यभरासाठी लक्षात ठेवीन असा मनाशी निर्धार केला.

काही महिन्यांनी अकोल्याला आलो.  डिप्लोमाला 
admission झाल्यानंतरची माझी पहिली चक्कर. मित्रांची जत्रा जमली. माझ्या नव्या शहराच्या गमती, त्यांच्या नव्या tuitions च्या वेळा आणि जागा यावर मनसोक्त गप्पा झाल्यात. कुणीतरी आवेश चा विषय काढला. त्याला science मध्ये जागा मिळाली. मी जरा आश्चर्य चकित झालो, " अरे तो तर commerce  घेणार होता ना ??" 

" नाही रे. तू डिप्लोमा ला गेलास. आणि List मधे तुझ्या नंतरचा candidate अकोला सोडून जाणार होता. Waiting list मधे आवेशचा number पहिला होता त्यामुळे तुम्ही  दोघांनी admission न घेतल्यामुळे त्याला admission मिळाली ना तिकडे !!"

बाप रे !! मला काकांच्या उपकारांच ओझ जास्त वेळ वाहाव लागल नाही. पण त्याच्या अश्या वागण्याचा राग नाही आला, भीती वाटली.  आपण या पुढे कोणाच्या सल्ल्यामध्ये  स्वार्थ शोधण्याचा प्रयत्न नक्कीच होईल. आश्चर्य आवेशच पण वाटल त्याला असली मानसिकता पटली पण आणि निमूटपणे तो त्याचाच भाग झाला !!!!

आयुष्यात पुढे काय करणार यापेक्षा काय करायचे नाही याचे हे असे नि:शुल्क शिकवणी वर्ग असतात, फक्त डोळे उघडे ठेवून शिकायचं !!! Thanks Kaka !!!!

(सत्य घटनेवर आधारित )

अमित जहागीरदार
१९ जून २०१५

मंगळवार, २ जून, २०१५

प्रपोज करण्याचे प्रकार -भाग 2- रांगेचा फायदा सर्वांना !!

रांगेचा फायदा सर्वांना !!


रांगेत उभे राहून निर्माण झालेली एखादी प्रेम कथा असावी असा साधा simple कयास बांधू नका.
नाजूक मनावर आघात पण होऊ शकतो कारण हि रांग आणि तिचा केलेला उपयोग खूप unique  आहे.....

खूप दिवसांनी सुहासला रेवती सोबत J M  रोडवर फिरतांना बघितलं. आणि college चे दिवस आठवले. college   मध्ये सुहास topper  असायचा आणि रेवती त्याला आवडायची हे सगळ्या college माहित होतं. पण त्याने तिला propose केलं नव्हत. college मधली  ती love story आता फुलून आलेली दिसतेय असा विचार करून मी संध्याकाळी सुहासला गाठल आणि सुरुवात केली.
" अरे रेवती सोबत बघितलं तुला आज"
" अ ...अरे तसं  काही नाही बाबा.. बर चल बाहेर जरा निवांत बसून जुन्या college गोष्टीत बुडून जावू."

मी आणि सुहास बाहेर आलो शहराच्या गर्दीतून थोडं दूर ..एक चांगली जागा शोधून तिथे बिअरच्या सोबतीला बसलो.
सुहास सांगू लागला ..college च्या गप्पा झाल्यात आणि मग विषयाने सगळ्यात romantic  वळण घेतलं. सुहासच्या बोलण्यात रेवती यायला लागली आणि माझी उत्कंठा शिगेला पोहोचली.
थोडासा गालातल्या गालात हसत त्याने तिचा उल्लेख करायला सुरुवात केली.

" मला रेवती आवडायची हे सगळ्या college ला जस  माहित होत तसं तिला पण चांगल माहित होत. पण नेहमी first आल्यावर ती wish करायला यायची. मला काही दिवसांनी वाटायला लागले कि तिच्या एका wish  साठी top  कराव  आणि परीक्षा सहा महिन्यांनी नाही तर दर महिन्यात यावी. ( मला थोडी भीती वाटायला लागली त्याच्या अश्या अपेक्षांची )
पण कधी तिच्याशी बोलण्याची हिम्मत  कधी झाली नाही. शेवटच्या वर्षाला जेह्वा सगळे जण जास्त अभ्यास करण्याचे plans  बनवत होते तेह्वा मी रेवतीशी कधी आणि काय बोलायचे याचा प्लान करत होतो.  अभ्यासातल्या कुठल्याही problem कधी इतका घाबरलो नव्हतो. वेगवेगळ्या  क्लुप्ता मनात  येत होत्या पण कोणतीच प्रत्यक्षात येईल असे वाटत नव्हते . february तला valentine  day पण मदतीला धावून आला नाही। पण तिच्या मार्चमधल्या वाढदिवसाला काही तरी करण्याचे प्लान झालेत.

प्लान तयार झाला - तिच्या साठी एक छान ग्रीटिंग कार्ड घेतलं  आणि काय काय बोलायचं याचा सराव केला. college मध्ये आल्या आल्या तिला wish  केल आणि नंतर बोलू या अस तिला सांगून मी क्लास  मधे गेलो. पहिल्यांदा अस घडल कि  शिकवण्याकडे लक्ष नव्हत. खिडकीमधून सारखं बाहेर बघावस वाटत होत .  गुलमोहोराच्या झाखालच्या  एका बाकाकडे लक्ष गेलं . मनात आल आता काही दिवसांनी हा बाक एकटा नसेल, त्या बाकावर कितीतरी प्रेमाच्या गोष्टी माझ्या आणि रेवती सोबत गर्दी करतील . असे बरेचसे विचार  मनात गोंगावत असतांना अचानक रेवती तिथे दिसली.  ते माझं स्वप्न आहे कि काय याची शहनिशा करण्याची थोडी गरज वाटली असंतांना हा विचार नाहीसा  झाला . रेवती सोबत तिच्या क्लास मधला रोहित दिसला. तिचा birthday असल्यामुळे wish  करत असेल असा विचार करून मी क्लास मध्ये काय चालू आहे याकडे  लक्ष देण्याचा प्रयत्न केला.

lecture संपल  आणि तसाच  गुलमोहोराकडे पळालो . रोहितने पण अगदी छान timing साधाल होत मी तिकडे निघालो आणि तो पण क्लास कडे वळला. मी पूर्ण शक्ती एकवटून तिला सांगितलं कि मला तुझ्याशी काही तरी बोलायचं आहे. मनातले भाव बोलून दाखवले आणि तिच्या उत्तरासाठी थांबलो. ती हसली गालातल्या गालात आणि मला वाटले कि आता ते ऐकायला मिळेल ज्याची मी वाट बघत होतो.

ती म्हणाली, " तू थोडा उशीरा आलास."
".?."

मला  काहीच कळले नाही.
" आत्ता रोहित ने मला प्रपोज केले.  तो तुझ्या आधी माझ्याकडे हे बोलून गेला आणि  मी त्याला 'हो' म्हणले. "
".."
मी मनातल्या मनात डोक्यावर हात मारला आणि तिथून पळ काढला."

त्याच बोलणं संपल पण माझ हसण थांबत नव्हत.
पण आता ती परत कशी आणि कुठे भेटली  हे मला ऐकण्याची खूप उत्सुकता होती. त्याला ते कळले असावे.
" 7 दिवसांनी पूवी ती पुण्यात आली आणि मला contact  केला. भेटल्यावर म्हणाली कि रांग पुढे सरकायला काही हरकत नाही."
" तसाही दुसरा number तुझा होता."

मी त्याला टाळी देत म्हटलं "चला म्हणजे रेवतीने तुला परीक्षेत मिळणारा पहिला number इथे पळवला म्हणायचं .

म्हणतात ना  रांगेचा फायदा सर्वांना !!!!!



अमित जहागीरदार
२०१२
पुणे 

बुधवार, २० मे, २०१५

फक्त पुरुषांसाठी

लहानपणी जरा समजायला लागल्यापासुन आणि डोक्यावरील केस कापणासारखे झाल्यापासून मला सलून या ठिकाणाचं खूप अप्रूप आहे. माझ्या  स्वभावासारख्याच सरळ वळणांच्या केसांमुळे मला कुठलेही केशकर्तनालय चालायचे.
पण तिथे गेल्यावरच माझ आकर्षण थंड  पाण्याचा फवारा नसुन भला मोठा आरसा असतो. एक दोनदा मानेचे अवघड कोन करुन झालेत की बाकीचा पूर्ण  वेळ आरश्यात बघायला मिळत.
पुरुषांच्या नशिबी हे भाग्य फार कमी वेळा येतं.

पण मला ते १५-२० मिनीटं खूप मोलाचे वाटतात. कुणीही टोकणार नाही, कुणी आरश्यासमोर बसलाय म्हणून चिडवणार नाही. हक्काचे क्षण ज्यावर फक्त आपलाच अधिकार आहे.

मला तिथे स्वतः कडे बघून मनातले भाव वाचायला आवडत. नव्या आयुष्यातल्या बेतांवर चर्चा करायला आवडत. आपण पुढल्या आयुष्यात कुठे असु काय करु याचे मनोरथ बांधायला आवडतात.
कधी कधी पडीकडला माणूस अनोळखी पण वाटतो. हा सगळा अगाध विचार करायला ती १५-२० मिनीट पुरी असतात. कधी एखादा प्रगल्भ व्यक्ती अथवा बालिश बालक पण दिसतो.

स्वतःकडे खुप निरखून , ओळखीच्या वा अनोळखी नजरेन बघण्याची ती संधी आसते. स्मार्ट तर दिसणारच थोडे परिचीत पण वाटाल स्वतः लाच!!!!

-अमित जहागीरदार
२० मे २०१५
मुंबई

बुधवार, १३ मे, २०१५

परीघ नात्यांचा

रविवारची रम्य सकाळ मराठी इंग्रजी newspaper मधून रेंगाळत पुढे सरकत होती. मागल्या वीकएंडला बायकोला आवडेल इतकी आणि खिश्याला परवडेल इतकी शॉपिंग झाली होती. त्यामुळे हा रविवार घरी TV समोर लोळून काहिही बघण्याची मुभा मिळाली होती. अश्या निवांत क्षणी जवळच्या मित्राची आठवण यावी  साहाजिक आहे पण त्याचा फोन यावा हा योगायोग.
अभिने १० वा फोन केला. नव्या रिवाजानुसार घरीच आहेस ना, कुठे  जाणार का?  असले प्रश्न झालेत. मी खडसावलो तेव्हा "येतोच! " अस म्हणून फोन ठेवला. नंतर परत एकदा फोन केला १५ मिनीटांनी. पार्कींग मिळत नाही म्हणून चिडलेला होता.
"अरे पुण्यात कुठे आलं व्हीजीटर पार्किंग?? पाहुणे आलेले चालत नाहीत." मी त्याला ऊगाच चिडवत होतो. 

हश्श हुश्श करत स्वारी घरात आली. वैताग काही कमी नव्हता झाला. मी जरा अवांतर विषय चघळले. तोपर्यत चहा घेवून बायको पण आमच्यात सामिल झाली.
एव्हाना तोही विषयाकडे सरकला होता. एरंडवण्यात त्याच्या बायकोचा भाऊ राहतो तिकडे आला होता. बायकोच्या माहेरी आलाय म्हणूनच चिडचिड करतोय अस म्हणून मी देखील चिमटा काढला.
"अरे तस नाही रे. पण तिथे आज एक गेट-टुगेदर आहे. बायकोचे मामा-माऊशी, त्यांची मुलं, जावई, आत्या -काका त्याची वंशावळ. आणि फक्त सख्खे नाही. चुलत, आत्ये, मामै सगळे. जवळपास ५०-६० जण आहेत. सोसायटीच्या क्लबहाउस माधे धूमाकुळ आहे आज."
"छान आहे की मग. सगळ्यांच्या गाठीभेटी होतील." बायकोला त्यात काही वावग दिसत नव्हतं.
"की बायकोच्या माहेरचे......"
"वहिनी तस नाही. प्रश्न बायकोच्या माहेरच्यांचा नाहीये.पण इतका पसारा हवाच कशाला.२-३ वर्षातून होणाऱ्या  एखाद्या लग्नात भेटीगाठी होतातच की. आणि आमच्या कडे नाही का आम्ही भावंड भेटतं वर्षातून २-३ वेळा."
मी तोच धागा पकडला " अरे हा. दादा कुठे असतो आणि कसा आहे??"
दादा गेली १० वर्ष झालीत गुरगावला आहे एका मोठ्या कंपनीमध्ये. गणपती आणि दिवाळीला येतो  पुण्याला अगदी न चुकता ! त्याच्या मोठ्या मुलाला माझी खूप आठवण येते."
"बर आहे. वरच्यावर भेटी होतात सगळ्यांच्या "
" आपल्या मुलांनी हि सगळी नाती समजावित म्हणून अस भेटण गरजचं  आहे  ना."
"  अभि, तुमची  next generation थोडीच हे सगळ समजू शकणार ना !!"
" अरे म्हणूनच तर आम्ही नेहमी कटाक्षाने भेटतो. मोठा भाऊ आणि धाकटी बहिण न चुकता येतात. सगळ्या भावंडांची भेट होते आणि त्यांना नातीगोती कळतात. 
" मला वाटत काहीतरी चुकतंय अभि. अरे  त्यांना फक्त हेच कळतंय कि सख्खी नाती कशी पाळायची. मामेभाऊ व बहिण, आत्याची मुलं भेटतात पण नंतर हि नाती खूप दूरची वाटतील कारण तुम्ही पण ती जोपासली नहित. आणि आज कालच्या काळात बऱ्याच लोकांना एकच अपत्य असत. मग तर नाती पुढे कळतील कुठे ??"

"…"
" अभि, त्यांनी ही  नाती जोपासावी अस वाटत असेल तर पहिले तुम्हाला जोपासावी लागतील, ती महत्वाची आहेत अस पहिले तुम्हाला वाटलं पाहिजे ना."
अभिचा चेहरा बदल होता तो खूप गंभीर वाटत होता. त्याला पटलं की नाही माहित नव्हत पण तो बऱ्याच वेळ शांत बसला. काही बोलणार तेवढ्यात त्याचा mobile खणखणला. त्याच्या तुटकश्या बोलण्यावरून आणि चौकशीला सामोरे जाणाऱ्या माणसाचा चेहरा असतो तश्या चेहऱ्यावरून नक्कीच बायकोचा फोन होता हे पटलं.
 
तो फक्त एवढंच म्हणाला की सगळे नातेवाईक भेटताहेत म्हणून काहीतरी गोड पदार्थ आणायला टिळक बागेत आलो होतो. 
फोन बंद करून थोडा शून्यात बघत इतकच बोलला की नाती समजावयाला आधी ती जोपासावी लागतील आणि नात्यांचा परीघ वाढवायला हवा . वसुधैव कुटुंबम मानणारी आपली संस्कृती एका घरात गुदमरून जायला नको !!!

अभिला कळल फक्त थोडा वेळ लागला !!!!

- अमित जहागीरदार 
२० एप्रिल २०१५